यावर्षीचा आमचा "स्वातंत्र्यदिन"

Submitted by जिप्सी on 16 August, 2012 - 13:59

गेल्या दोनवर्षाप्रमाणेच याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला. पहिल्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक राज्य दिले होते आणि त्या राज्याची संस्कृती सादर करावयाची होती. दुसर्‍या वर्षी प्रत्येक टिमला एक एक सण दिला होता आणि त्याचे सादरीकरण करावयाचे होते. यावर्षीही अशीच काही हटके थीम आम्ही घेतली होती आणि ती म्हणजे भारतातील ऐतिहासिक्/पुरातन वास्तु सादर करायची. यात आठ टिम होत्या आणि त्यातील एक एक टिमला ताजमहाल, लाल किला, सांची स्तूप, सुवर्णमंदिर, हावडा ब्रीज, महाराष्ट्रातील किल्ला, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया अशी नावे आली होती. याच बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातील एक नाट्य सादर करावयाचे होते. सर्वच टिमने अत्यंत कमी वेळात (फक्त ३ दिवसात) हा सारा देखावा (रोजचे काम सांभाळुन) सादर केला. यातील सगळी कलाकुसर ऑफिस कामाच्या तासानंतर केली आहे. ताजमहालचे सगळे डिटेल्स त्या टिमने रेडिमेड न आणता स्वत: केल्या आहेत.माझ्या टिमने लाल किल्ला उभारला होता. Happy अशा तर्‍हेने गेल्या तीन वर्षाप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा झाला.

गेल्यावर्षीच्या फोटोंची लिंक इथे पहा. Happy

आमचा लाल किल्ला Happy
(यात थर्माकॉल विकत आणुन कटिंग करून ब्रशने रंगवला आहे. कुठेही स्प्रे पेंटिंग नाही. :-))
प्रचि ०१

प्रचि ०२
हावडा ब्रीज
(आईस्क्रीम स्टिकपासुन बनवलेला)
प्रचि ०३

प्रचि ०४
ताजमहाल
(सगळी कलाकृती टिम मेंबर्सनी हातानेच केली आहे.)
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
इंडिया गेट
प्रचि ०९

प्रचि १०
सांची स्तूप
प्रचि ११

प्रचि १२
गेटवे ऑफ इंडिया
प्रचि १३
सुवर्णमंदिर (अमृतसर)
प्रचि १४
किल्ला
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
लोकमान्य टिळक
प्रचि २१
झांशीची राणी
प्रचि २२
दांडी यात्रा
प्रचि २३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो!!! सगळ्याच कलाकृती आवडल्या. लाल किल्ला, हावडा ब्रिज आणि ताजमहाल विशेष आवडले.

१९व्या फोटोत वीगमधले गागाभट्ट(?!) सॉलिड विनोदी दिस्तात! Happy

वा जिप्सि खुप छान सिन आहेत. तुमच्या ऑफिसमधली लोक हौशी आहेत सगळी. तुझा फोटो नाही तो ह्यात ?

ऑस्सम!!!

काय सही आहेत सगळ्याच कलाकृती!!!

ताजमहाल तर अगदीच सुपर्ब!!!

तुमच्या ऑफिसमधली मंडळी भलतिच हौशी आनि उत्साही आहेत. खुप कौतुक वाटले Happy

आणि मॅनेजमेंट चे ही कौतुक Happy

मस्त , मानलं यार तुमच्या डेडीकेशनला , सगळेच देखावे अप्र्तिम ,
ते ताजमहालावरचं कोरीव काम हाताने केलयं का ? तसं असेल तर त्या टीमला माझा साष्टांग दंडवत सांग .
शिवाजी महाराज पण भारी दिसताहेत.

क्रीयेटिव्ह आहेत रे तुमच्या हापिसातले लोक. Happy
फोटोही मस्त आहेत.
आमच्या हापिसचा राक्षस गण आहे. असलं काही नसतं. Proud

योगेश.....

माझे हार्दिक अभिनंदन प्रकल्पात सहभागी झालेल्या तुझ्या ऑफिसमधील सर्व सहकार्‍यांना आवर्जून कळव.

एरव्ही "सांची" सहसा अशा सादरीकरणातून निसटून जाते, पण इथे तुम्ही त्याची निवड न विसरता केली ते पाहून विशेष आनंद झाला. 'हावडा ब्रिज' साठी आईस्क्रीम स्टीक्सचा वापर केवळ कल्पक.

'शिवाजी महाराज' स्मित करीत राज्यकारभार करीत आहेत, हे पाहून खूप मजा वाटली [गागाभट्ट अगदी हुबेहूबच]. लोकमान्य टिळकांचा आवेश भावला, तर राणी लक्ष्मीबाईने मान खाली का घातली हे कळले नाही. बाकी गांधीबाबांचे बेअरिंग मस्त सांभाळले आहे, त्या कलाकाराने.

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो !

ताजमहालावरचं कोरीव काम हाताने केलयं का ?.>>> अफलातुन
हावडा ब्रीज मस्त्च Happy
लाल किल्ला तर काय अगदी सहिच. तु तसेही आत्ताच भेट देउन आलायेस म्हणजे प्रश्णच नाही Wink

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

१९व्या फोटोत वीगमधले गागाभट्ट(?!) सॉलिड विनोदी दिस्तात!>>>>>मृण्मयी Proud

तुझा फोटो नाही तो ह्यात ?>>>>जागू, फोटो मीच काढत होतो. Happy हां नंतर मात्र फोटोसेशन करुन घेतले Wink ते फेसबूकवर टाकलेत बघ. Happy

मी दोन वेळा हा बाफ उघडून पाहिला>>>>:-)

ते ताजमहालावरचं कोरीव काम हाताने केलयं का ?>>>>येस्स श्री Happy ते सगळं कोरीव काम हातानेच केलंय. Happy

आमच्या हापिसचा राक्षस गण आहे. >>>>राक्षस गण Rofl

काम कधी करता रे ?>>>>मालक, हे सगळं कामाचे ९ तास भरून झाल्यावर Happy रात्री उशीरापर्यंत थांबूल. Happy

माझा रिझ्युमी ईमेल करते >>>>:-)

तर राणी लक्ष्मीबाईने मान खाली का घातली हे कळले नाही.>>>>अशोकमामा, तीची तलवार पटकन म्यान होत नव्हती. Proud

लोकमान्य महाराजांच्या काळात त्यांचे सेवक होते तर>>>>>माधव :फिदी:, उतना तो चल्ता है Happy एकाच टिमला दोन वेगवेगळ्या थीम्स होत्या आणि वेळ कमी म्हणुन टिळकांनासुद्धा राज्याभिषेकात सामील करून घेतले. Happy

Pages