गेल्या दोनवर्षाप्रमाणेच याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला. पहिल्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक राज्य दिले होते आणि त्या राज्याची संस्कृती सादर करावयाची होती. दुसर्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक सण दिला होता आणि त्याचे सादरीकरण करावयाचे होते. यावर्षीही अशीच काही हटके थीम आम्ही घेतली होती आणि ती म्हणजे भारतातील ऐतिहासिक्/पुरातन वास्तु सादर करायची. यात आठ टिम होत्या आणि त्यातील एक एक टिमला ताजमहाल, लाल किला, सांची स्तूप, सुवर्णमंदिर, हावडा ब्रीज, महाराष्ट्रातील किल्ला, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया अशी नावे आली होती. याच बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातील एक नाट्य सादर करावयाचे होते. सर्वच टिमने अत्यंत कमी वेळात (फक्त ३ दिवसात) हा सारा देखावा (रोजचे काम सांभाळुन) सादर केला. यातील सगळी कलाकुसर ऑफिस कामाच्या तासानंतर केली आहे. ताजमहालचे सगळे डिटेल्स त्या टिमने रेडिमेड न आणता स्वत: केल्या आहेत.माझ्या टिमने लाल किल्ला उभारला होता. अशा तर्हेने गेल्या तीन वर्षाप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा झाला.
गेल्यावर्षीच्या फोटोंची लिंक इथे पहा.
आमचा लाल किल्ला
(यात थर्माकॉल विकत आणुन कटिंग करून ब्रशने रंगवला आहे. कुठेही स्प्रे पेंटिंग नाही. :-))
प्रचि ०१
प्रचि ०२हावडा ब्रीज
(आईस्क्रीम स्टिकपासुन बनवलेला)
प्रचि ०३
प्रचि ०४ताजमहाल
(सगळी कलाकृती टिम मेंबर्सनी हातानेच केली आहे.)
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८इंडिया गेट
प्रचि ०९
प्रचि १०सांची स्तूप
प्रचि ११
प्रचि १२गेटवे ऑफ इंडिया
प्रचि १३सुवर्णमंदिर (अमृतसर)
प्रचि १४किल्ला
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०लोकमान्य टिळक
प्रचि २१झांशीची राणी
प्रचि २२दांडी यात्रा
प्रचि २३
सुंदर फोटो!!! सगळ्याच कलाकृती
सुंदर फोटो!!! सगळ्याच कलाकृती आवडल्या. लाल किल्ला, हावडा ब्रिज आणि ताजमहाल विशेष आवडले.
१९व्या फोटोत वीगमधले गागाभट्ट(?!) सॉलिड विनोदी दिस्तात!
वॉव! ऑसम _/\_ महान आहेत सगळेच
वॉव! ऑसम
_/\_
महान आहेत सगळेच कलाकार
वा जिप्सि खुप छान सिन आहेत.
वा जिप्सि खुप छान सिन आहेत. तुमच्या ऑफिसमधली लोक हौशी आहेत सगळी. तुझा फोटो नाही तो ह्यात ?
मला सगळंच आवडल एक अस सांगता
मला सगळंच आवडल
एक अस सांगता नाही येणार
दोन वेळा कमेंट दिली कारण मी दोन वेळा हा बाफ उघडून पाहिला
मस्त!! एकदम कल्पक!!
मस्त!! एकदम कल्पक!!
मस्त सगळ्याच कलाकृती
मस्त
सगळ्याच कलाकृती आवडल्या. टोपी वर !!!
वॉव.. तुझ्या ऑफिसात तर एक से
वॉव.. तुझ्या ऑफिसात तर एक से एक उत्साही कलाकार आहेत रे!!
सर्व झाँकी आवडल्या..
ऑस्सम!!! काय सही आहेत सगळ्याच
ऑस्सम!!!
काय सही आहेत सगळ्याच कलाकृती!!!
ताजमहाल तर अगदीच सुपर्ब!!!
तुमच्या ऑफिसमधली मंडळी भलतिच हौशी आनि उत्साही आहेत. खुप कौतुक वाटले
आणि मॅनेजमेंट चे ही कौतुक
मस्त , मानलं यार तुमच्या
मस्त , मानलं यार तुमच्या डेडीकेशनला , सगळेच देखावे अप्र्तिम ,
ते ताजमहालावरचं कोरीव काम हाताने केलयं का ? तसं असेल तर त्या टीमला माझा साष्टांग दंडवत सांग .
शिवाजी महाराज पण भारी दिसताहेत.
खूपच भारी आहे सगळ. एकदम
खूपच भारी आहे सगळ. एकदम उत्साही जनता दिसते हापीसात.
क्रीयेटिव्ह आहेत रे तुमच्या
क्रीयेटिव्ह आहेत रे तुमच्या हापिसातले लोक.

फोटोही मस्त आहेत.
आमच्या हापिसचा राक्षस गण आहे. असलं काही नसतं.
जिप्सी अगदी मनापासुन धन्यवाद
जिप्सी अगदी मनापासुन धन्यवाद हे शेअर केल्याबद्द्ल, एकदम मस्त अनुभव ( तुमच्या फोटोंवरुन घेतला
)
मस्त एकदम !
मस्त एकदम !
खुपच छान आहेत सगळे
खुपच छान आहेत सगळे फोटो....
खरच सगळे फारच हौशी आहेत सगळे....
कमाल आहे ...जबरी ... काम कधी
कमाल आहे ...जबरी ...
काम कधी करता रे ?
ताजमहाल अप्रतिम बनला आहे.
ताजमहाल अप्रतिम बनला आहे. तुमचा लाल किल्ला आणि तो दुसरा किल्ला पण आवडला रे.
सूपर्ब रे जिप्स्या..........
सूपर्ब रे जिप्स्या..........
लय भारी
लय भारी
मस्तच!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!
सुंदर कल्पना आणि अप्रतिम
सुंदर कल्पना आणि अप्रतिम सादरीकरण... मस्तच
सही$$$ माझा रिझ्युमी ईमेल
सही$$$
माझा रिझ्युमी ईमेल करते
मस्त ....................
मस्त ....................
वा! भारी
वा! भारी
बढीया....
बढीया....
योगेश..... माझे हार्दिक
योगेश.....
माझे हार्दिक अभिनंदन प्रकल्पात सहभागी झालेल्या तुझ्या ऑफिसमधील सर्व सहकार्यांना आवर्जून कळव.
एरव्ही "सांची" सहसा अशा सादरीकरणातून निसटून जाते, पण इथे तुम्ही त्याची निवड न विसरता केली ते पाहून विशेष आनंद झाला. 'हावडा ब्रिज' साठी आईस्क्रीम स्टीक्सचा वापर केवळ कल्पक.
'शिवाजी महाराज' स्मित करीत राज्यकारभार करीत आहेत, हे पाहून खूप मजा वाटली [गागाभट्ट अगदी हुबेहूबच]. लोकमान्य टिळकांचा आवेश भावला, तर राणी लक्ष्मीबाईने मान खाली का घातली हे कळले नाही. बाकी गांधीबाबांचे बेअरिंग मस्त सांभाळले आहे, त्या कलाकाराने.
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो !
लोकमान्य महाराजांच्या काळात
लोकमान्य महाराजांच्या काळात त्यांचे सेवक होते तर
ताजमहालावरचं कोरीव काम हाताने
ताजमहालावरचं कोरीव काम हाताने केलयं का ?.>>> अफलातुन

हावडा ब्रीज मस्त्च
लाल किल्ला तर काय अगदी सहिच. तु तसेही आत्ताच भेट देउन आलायेस म्हणजे प्रश्णच नाही
जिप्स्या निव्वळ
जिप्स्या निव्वळ अतिसुंदर..
कौतुक कोणत्या शब्दात करू?
खुप सही.. ताजमहाल आनि तुमचा
खुप सही.. ताजमहाल आनि तुमचा लाल किल्ला खास आवडला..
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
१९व्या फोटोत वीगमधले गागाभट्ट(?!) सॉलिड विनोदी दिस्तात!>>>>>मृण्मयी
तुझा फोटो नाही तो ह्यात ?>>>>जागू, फोटो मीच काढत होतो.
हां नंतर मात्र फोटोसेशन करुन घेतले
ते फेसबूकवर टाकलेत बघ. 
मी दोन वेळा हा बाफ उघडून पाहिला>>>>:-)
ते ताजमहालावरचं कोरीव काम हाताने केलयं का ?>>>>येस्स श्री
ते सगळं कोरीव काम हातानेच केलंय. 
आमच्या हापिसचा राक्षस गण आहे. >>>>राक्षस गण
काम कधी करता रे ?>>>>मालक, हे सगळं कामाचे ९ तास भरून झाल्यावर
रात्री उशीरापर्यंत थांबूल. 
माझा रिझ्युमी ईमेल करते >>>>:-)
तर राणी लक्ष्मीबाईने मान खाली का घातली हे कळले नाही.>>>>अशोकमामा, तीची तलवार पटकन म्यान होत नव्हती.
लोकमान्य महाराजांच्या काळात त्यांचे सेवक होते तर>>>>>माधव :फिदी:, उतना तो चल्ता है
एकाच टिमला दोन वेगवेगळ्या थीम्स होत्या आणि वेळ कमी म्हणुन टिळकांनासुद्धा राज्याभिषेकात सामील करून घेतले. 
Pages