चुकलेच

मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर!!!!!!

Submitted by Mi Patil aahe. on 13 January, 2019 - 01:46

मायबोलीवर आला तो मायबोलीकर झाला पण समजा तुम्ही काही कारणाने मायबोलीवर आलाच नाही तर काय होईल?
कधी प्रश्न पडलाय का?
कुणाला काहीतरी फरक जाणवेल का?
की हा अनुभव/ प्रश्न तुम्हाला आधीच आलाय वा पडला होता,अन् तुम्ही प्रयोग करुन ही पाहीला, मायबोलीवर न येऊन/ब्रेक घेऊन.
तुमच्या जीवनात काही फरक पडला का? त्यामुळे!!!!

संक्रांतीला तुमच्या घरचा परंपरागत स्पेशल मेनू काय असतो?

Submitted by Mi Patil aahe. on 13 January, 2019 - 00:02

संक्रांत म्हटले की मला आठवते ती बाजरीची मऊ भाकरी (तीही कडक असेल तर भारीच) अन् भज्जीची (मिक्स) भाजी(बोर,ऊस,गाजर,हरभरा,---वगैरे, वगैरे)
तिळाची पोळी अन् तूप,दूध हे शक्यतो किंक्रातीला!!!!

नोकरी टिकवायची असेल तर काय करावे?

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 12:07

नोकरी करणाय्रांच आपल बर असत असं लहानपणी खूप ऐकलं आहे,पण त्याचवेळी नोकरी मिळवण्यासाठी,पगार वेळच्यावेळी मिळवण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी चाललेली धडपड करणारी पण दिसली आहेत----
एवढे करूनही नोकरी गेली, कामावरून काढून टाकले किंवा हातच काम सुटलं/ गेल--- आता दुसरं काम शोधतोय!!! अशी बडबडही कानावर पडतं राहते. तेव्हा वाटते हे काय गौडबंगाल आहे नोकरीच?
आमचा घरचा बिझनेस त्यामुळे हे नोकरी प्रकरण म्हणजे आमच्यासाठी "दूरून डोंगर साजरे!"
यातही काम, नोकरी टिकवून ठेवणारी ही काही कमी नाहीत,मग ते नेमके काय करतात, नोकरी टिकविण्यासाठी????

मोबाईल वर कोणती रींगटोन ठेवली आहे, तुम्ही?

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 11:45

मोबाईल अन् रींगटोन हे नातं फार गंमतीशीर वाटत मला!!! काय एक एक रींगटोन असतात, काहींच्या काही!!!
तुमच्या स्पेशल रींगटोनविषयी तुम्हाला काही सांगता येईल का?

३५० रूपयाचा सिक्का ????

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 09:32

श्री गुरुगोविंद सिंग यांच्या ३५२ वी जयंती निमित्त ३५०रूपयाचा सिक्का जो पंतप्रधान मोदींनी जारी केला तो कशाचे द्योतक आहे,असे तुम्हाला वाटते?

शब्दखुणा: 

पैसा कमावला जातो की निर्माण केला जातो?

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 05:54

पैसा, रूपये कमावतात की निर्माण करतात?
तुम्ही कोणत्या प्रकाराने पैसा कमावला,कमावता? की निर्माण करताय, पैसा/रूपये????
खूप पैसा-आडका एखाद्याकडे असतो तर बय्राचजणांकडे तो दक्षिणा देण्याइतपतही नसतो.
मग तो एखादा पैसा कमावतो म्हणजे नेमके काय करतो? किंवा तो एखादा बनण्यासाठी नशिबच लागते की आणखी काही???
तुम्हाला काय वाटते तो एखादा बनण्यासाठी नशिबच बलवत्तर असते?
मग काय तुम्ही नशीबवान नाहीत.कमनशिबी आहात?

शब्दखुणा: 

संक्रांतीचे वाण काय असायचे,आधी;अन् आता काय असावे?

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 00:15

संक्रांतीला मायबोलीवरील माय-भगिनी संक्रांतीचे वाण म्हणून काय लूटणार आहेत,हळदी-कुंक कार्यक्रमात!
दरवर्षी काय-काय लूटले?
या वर्षी काय वाण ठेवणार?
काय वाण ठेवायचे राहून गेले?
काय वाण ठेवायला हवे?
काय ठेऊ नयेत?
कसा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवायला हवा?
काय वाटते,या वर्षी संक्रांती कशी साजरी करावी?
गोड बोलून,की नुसतेच तिळगुळ देऊन!!!!
की आणखी काही भन्नाट कल्पना/आयडिया सुचली आहे/सूचत आहे/सुचली होती पण राहून गेली , मागच्या वर्षी!!!,की सुचतच नाही!
का हळदी-कुंकू कार्यक्रम आवडत नाही, पण काय करणार, करावा लागतो!

आपण चुका शिकतोय, की शाहणपण ? इतिहासातून,पूर्वजांकडून!!!!!

Submitted by Mi Patil aahe. on 6 January, 2019 - 08:23

मासिकपाळी पुरुषदेहप्रधान मानसिकतेला पटत नाही की काय? ज्यातून आपला देह निर्माण झाला ती प्रोसेस इतकी अपवित्र का वाटावी? स्वत:च्या जन्माच दु:ख इतक जिव्हारी लागाव की ती प्रक्रिया (मासिकधर्म/मासिकपाळी) च घाणेरडी,अस्वच्छ, असुरक्षित (अगदी इतकी की तो धारण करणारा देहच कमजोर वाटून त्या देहाला सुरक्षा देण्याच्या नावाखाली बंधनाच्या जोखडात अडकवून ठेवला/ टाकला.) समजून वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धीकरणाची जणू रेलचेलच सुरू झाली आहे.तेही वेगवेगळे नवे-जूने दाखले/उदाहरणे देत,सांगत!!!!! श्रद्धेच भांडवल करत!!! विज्ञान, तत्वांचे खेळ, गणित मांडत!!!!!
हे कितपत योग्य आहे? व का ????

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

"ती" तुम्ही तर नाहीत ना? नाही तर मग कोण आहे,ती व्यक्ती?

Submitted by Mi Patil aahe. on 6 January, 2019 - 05:56

ती व्यक्ती म्हणजे स्त्री, बाई, महिला,नारी,मादा,स्त्रीलिंगी
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा,गडी,नर,पुल्लिंगी
तर "ती व्यक्ती"- सामान्यतः माणूस, मानवप्राणी मधील स्त्रीलिंगी मानली जाते---- व्याकरणदृष्ट्या,विज्ञानानुसार,अध्यात्मानुसार, सामाजिक मानसिकतेनुसार!
निसर्गाने तिला निर्माण केले,असे विज्ञान सांगते.
ब्रम्हदेवाने/परमात्म्याने/ईश्वराने तिला निर्माण केले असे अध्यात्म सांगते.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मला सांगा मी नक्की काय विचारलं (लिहीलं)?, कविता की प्रश्र्न!!!!!

Submitted by Mi Patil aahe. on 4 January, 2019 - 13:21

मला सांगा देव म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा महिला म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा मंदीर प्रवेश म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा हे सारे वाद म्हणजे नक्की काय असतात?
?????????????????????????????????????
मला सांगा ईश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा स्त्री म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा देवळात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा ही सारी भांडण म्हणजे नक्की काय असते?
???????????????????????????????????
मला सांगा परमेश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा बाई म्हणजे नक्की काय असते?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चुकलेच