चारोळी
दू:ख झाले डोळ्यास जेव्हा
पापणीस अश्रू झेलवेना
हळूच तोही उतरला अन्
दू:ख घेउनी वाहीला.........
दू:ख झाले डोळ्यास जेव्हा
पापणीस अश्रू झेलवेना
हळूच तोही उतरला अन्
दू:ख घेउनी वाहीला.........
नवीन दिवस नवीन आशा...
क्षणाक्षणात नवी दिशा
नवीन दिवस नवीन क्षण...
प्रत्येक तणात नवीन मन
नवीन दिवस नवीन छंद...
मनामनात रेशीम बंध
नवीन वर्ष नवीन सन...
युगांयुगे फुलुदे तुमचे जीवन
खरंच आजकाल सुट्टीचा दिवस नकोसा वाटतो...
सोमवारची वाट पाहत, मी रविवार तळमळत घालवतो...
ऑफिसला जाण्याचा मला छंद जणु मला जडलायं...
करु नयेत त्या गोष्टी आता बंद जणु पडल्यात...
हळवी रात्रसुध्दा आजकाल नकोशी झाली आहे...
मी आज आहे...
मी उद्या नसेन...
कधीतरी कुणाच्या बोलण्यातुन दिसेन...
कधीतरी उभा असेन मी वाट पाहत स्तब्ध...
स्वर जपताना, फुलेल माझा शब्दन् शब्द...
आणि प्रेम झाले..............
ते नेहमी अबोधच राह्ते
अनेकांना काय, बहूतेकांना
त्यात नकारच मिळ्तो
मग अशावेळी आधार देतात
ती फाटलेली पत्रे
एका पावसाळ्यात लिहीलेली ती असंख्य प्रेमपत्रे
बाहेर मस्त पाउस पड्त होता...
तू चिंब भिजली होतीस्.....
तूझ्यावरचं वस्त्र तुझ्या नकळ्त
भिजलेलं होतं..
तू त्यातून थोडी थोडी दिसत होतीस...
मी तुला कवेत घेतली,
तूही मिटलेली कळी होतीस.......
मी निघालो मस्तीमध्ये
मस्त पावसांत भटकायला,
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर..
पंचगंगा तिरावर, माझं गं ते कोल्हापूर...
महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर..
परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर..
बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर..
कविता... ???
काय असते ति...??
नेमके तिचे स्वरुप काय...???
ति मनाला का भिडते...??
ति आपलिशी का वाटते...???
नेमका याचा विचार कोणी करत नसेल. मी पण कधी केला नव्हता. पण आज सहज मनात आले म्हणुन लिहावेसे वाटते.
नको पिऊ म्हणतेस
काळीज जळेल म्हणतेस
साकी,
दगडाच काळीज कधी जळत का?
जळाल तरी कुणाला कळतं का?
दारुण अवस्थेतल्या मनाला
दारुनेच बर वाटत
शुद्धीत असलना की उगाच
आठवुन आठवुन मन आटत
भर दोन पेग,
प्याला आपटत 'चिअर्स' म्हणू
प्रेमाच्या शोधात निघालो मी
आपल्याजवळील कल्पनाविश्व बरोबर घेऊन
ती भेटली मला त्या वाटेवर
माझ्या आशेची पालवी बनून
तिचा आवाज मी ऐकला जेव्हा
मनात अनेक तरंग ऊठले
मलाच नव्हते कळत माझे
शब्द घ्यावे कुठुन कुठले