Submitted by Milesh on 18 December, 2007 - 23:08
प्रेमाच्या शोधात निघालो मी
आपल्याजवळील कल्पनाविश्व बरोबर घेऊन
ती भेटली मला त्या वाटेवर
माझ्या आशेची पालवी बनून
तिचा आवाज मी ऐकला जेव्हा
मनात अनेक तरंग ऊठले
मलाच नव्हते कळत माझे
शब्द घ्यावे कुठुन कुठले
प्रेमाच्या या वाटेवर मी
सैरावैरा धावत सुटलो
कुणीही अडवायला नव्हते मला
सगळ्यांच्या नजरेतून मी निसटलो
काही काळ लोटल्यावर
लक्षात आले माझे मला
मृगजळ होते ते एक
चूकून भेटलो मी तिला
गुलमोहर:
शेअर करा