Submitted by kunjir.nilesh on 20 December, 2007 - 08:23
खरंच आजकाल सुट्टीचा दिवस नकोसा वाटतो...
सोमवारची वाट पाहत, मी रविवार तळमळत घालवतो...
ऑफिसला जाण्याचा मला छंद जणु मला जडलायं...
करु नयेत त्या गोष्टी आता बंद जणु पडल्यात...
हळवी रात्रसुध्दा आजकाल नकोशी झाली आहे...
पुर्वेला खुलणारी कळी आता रोज पहावीशी वाटते आहे...
याचा अर्थ असा नाही की ऑफीसात काम पडलयं...
तिथल्याच एकीवर माझं मन काहीसं जडलंय...!
गुलमोहर:
शेअर करा
सहि रे...
तुझ्या ऑफिसमधे कुणी अजुन असली तर सांग, मी पण जॉइन करतो मग तिकडे...
हे माझे मन नाही मित्रा!!!
अरे भावा!!! हे सर्व माझ्या बाबतीत नसुन माझ्या मित्राची तळमळ दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे
सेम २ सेम..
अरे... सध्या माझ्या भावाचे हे असच चालु आहे बर का..... अगदि शेम २ शेम.... अस्सच...