अगं हरीणी........

Submitted by पल्ली on 20 December, 2007 - 05:55

बाहेर मस्त पाउस पड्त होता...
तू चिंब भिजली होतीस्.....
तूझ्यावरचं वस्त्र तुझ्या नकळ्त
भिजलेलं होतं..
तू त्यातून थोडी थोडी दिसत होतीस...
मी तुला कवेत घेतली,
तूही मिटलेली कळी होतीस.......
मी निघालो मस्तीमध्ये
मस्त पावसांत भटकायला,
दरक्षणी तू जवळ होतीस...
वीज चमकली निनादत
क्षणार्धात तु फुलली होतीस...
संततधार चालु होती,
तुझी थरथर जाणवत होती........
ऊब फक्त तुझी होती,
सुसाट वार्‍याची सय होती.
दूर जाशील तु, घेउन जाईल कुणी दूर
म्हणून मी तुला घट्ट धरले होते,
अंगावरुन तुझ्या थंडगार
थेंब थेंब गळत होते...
अगं हरीणी,
तू माझी हरीणछाप छ्त्री होतीस!

गुलमोहर: 

टाकली का इकडे .... धमालचे एक्दम ऐकायलापण मजा आली ग

पल्लि, एकदम सही लिहिलंय........... फक्त घाईघाईत संपवल्यासारखं वाटलं म्हणजे शेवट तोडल्यासारखा वाटला. ऑफिसमधे हसून हसून पुरेवाट........ प्रिंट काढून pdf बनवून लगेच फॉरवर्ड केली सगळ्याना.

शेवट्च्या एका वाक्यात झटका द्यायचा होता गं.....मलाही तुझ्यासारखंच वाट्लं होतं ...काही सुचव ना....