बुधवार दिनांक २८.०३.१२ ला, ऑफिसमधे, सकाळी ११ वाजता, प्रज्ञाचा फोन आला.
मी : हॅलो.
प्रज्ञा: हॅलो. काय ग झाली का तयारी?
मी: तयारी? कसली तयारी?
प्रज्ञा: अग, शनीवारची तयारी.
मी: शनिवारी काय आहे? (हे विचारतानाच माझे नेत्र समोरच्या दिनदर्शीकेतील, येत्या शनीवारावर स्थिरावले व शोध घेऊ लागले. त्याचवेळी माझ्या मनाने स्मरणशक्तीशी जवळीक साधून, शनिवारी प्रज्ञाशी काही ठरवलेय का याची विचापूस केली. पण मला दूर दृष्टी नसल्यामुळे, शनीवारच्या रकान्यात तारखेखेरीज काही दिसले नाही. आणि स्मरणशक्तीनेही संप पुकारला. हे सगळ फक्त ५ सेकंदात झाले. )
प्रज्ञा: शनीवारी कोकणात जायच आहे ना?
"ग्रीष्म" — दाहक-मनमोहक
सध्या जिवाची काहिली करणारा दाहक उन्हाळा सुरू झालायं. अशा या कडक उन्हाळ्या घराबाहेर पडायलाही नकोसं वाटतं. पण हा उन्हाळा थोडासा सुसह्य होतो तो जागोजागी बहरलेल्या लाल, पिवळ्या, निळ्या रंगाच्या पुष्पांनी सजलेल्या वृक्षांनी. अगदी कडक उन्हातही डोळ्यांना थंडावा देण्याचं काम हि फुले चोख बजावतात. चला तर मग याच बहरलेल्या फुलांना पाहुन ग्रीष्माची दाहकता थोडी कमी करूया.
कुठही लांब जायचं नव्हत ... जवळच ठिकाण म्हणजे अंबरनाथ च हे प्राचीन शिवमंदिर.. खूप लहान असताना गेलेलो ..
आता परत जाऊया म्हणून बाईक काढली.. मिपाकर "सूड" सोबत होता.
इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता.
बापूकुटी - सेवाग्राम
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
लहानपणी प्रायमरी च्या भूगोलाच्या पुस्तकात भेटलेला पनामा कालवा,पुढे कधी
आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
पण साधारण वीसेक वर्षापूर्वी आमच्या ऑफिसची एक शाखा जेंव्हा आम्ही मध्य
अमेरिकेच्या दक्षिणेकडचा शेवटला देश्,'पनामा' या चिमुकल्या देशात उघडली
,तेंव्हापासून पनामा ची वरचेवर गाठ पडू लागली. सुरुवातीला वर्षातून २,४
वार्या घडत. आता लेकच तिच्या परिवारासकट तिकडे सेटल झाल्यामुळे दरवर्षी
एक तरी ट्रिप होतेच.
दरवेळी पनामा कालव्याला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही. कितीदा पाहिले तरी
त्याबद्दल वाटणारे कौतुहल ओसरत नाही.
योरॉक्सच्या "शाल्मली"ला भेटायला आली "कांचन" फॅमिली.
अंजनी, उर्वशी, गायत्री इ. आहेतच, त्यासुद्धा सावकाश येतील भेटायला.
"पांढरा कांचन" (Bauhinia acuminata)
प्रचि ०१
प्रचि ०२
"जांभळा कांचन"
गेल्या महिन्यात कोल्हापूरला गेलो असताना घेतलेले काही फोटो...
१. कैलास गडाची स्वारी मंदिर..
२.
३.
४. मंदिरासमोरील पितळेचा पूर्ण भरीव नंदी...
सध्या कामानिमित्त आफ्रिकेतील लायबेरिया देशातील मोन्रोव्हीया पोर्ट येथून निघून स्कॉट्लंडला जात आहे. वाटेत हॉलंड येथे डेन हेल्डर पोर्ट मध्ये ३-४ दिवस थांबणार आहे. ह्या प्रवासाचे फोटो इथे देत जाईन..
१. आमची बोट मोन्रोव्हीया पोर्ट मध्ये येताना...
२. अखेर धक्याला लागली...
प्रचि ०१:
प्रचि ०२:
प्रचि ०३:
फोटोग्राफीतील प्रयोग - कुठला फोटो चांगला आलाय ?
कोकणवारीत एकेठिकाणी हे कोळीमहाशय दिसले - सगळ्या फोटोग्राफर्सना हे अगदी सवयीचे असेल की आपण कॅमेरा एखाद्या प्राणी/किटक/ पक्ष्यावर रोखायचा अवकाश हे लगेच गायब तरी होतात किंवा प्रचंड हालचाल तरी करतात - आपण कॅमेरा बाजूला करायचा अवकाश - लगेच ही मंडळी स्थिर होतात.
यामुळे पहिला एक फोटो अग्दी घाईघाईने काढला - म्हटलं जसा येईल तसा येउ देत - पण हालचाल करायच्या आत फोटोत यायलाच पाहिजे हा .......
प्र चि१