माझं लाडकं कोकण.-भाग : १ - गोळप (रत्नागिरी)

Submitted by शोभा१ on 9 April, 2012 - 03:29

बुधवार दिनांक २८.०३.१२ ला, ऑफिसमधे, सकाळी ११ वाजता, प्रज्ञाचा फोन आला.
मी : हॅलो.
प्रज्ञा: हॅलो. काय ग झाली का तयारी?
मी: तयारी? कसली तयारी?
प्रज्ञा: अग, शनीवारची तयारी.
मी: शनिवारी काय आहे? (हे विचारतानाच माझे नेत्र समोरच्या दिनदर्शीकेतील, येत्या शनीवारावर स्थिरावले व शोध घेऊ लागले. त्याचवेळी माझ्या मनाने स्मरणशक्तीशी जवळीक साधून, शनिवारी प्रज्ञाशी काही ठरवलेय का याची विचापूस केली. पण मला दूर दृष्टी नसल्यामुळे, शनीवारच्या रकान्यात तारखेखेरीज काही दिसले नाही. आणि स्मरणशक्तीनेही संप पुकारला. हे सगळ फक्त ५ सेकंदात झाले. )
प्रज्ञा: शनीवारी कोकणात जायच आहे ना?
मी : ह्या शनीवारी जायचय? आणि हे तु मला केव्हा सांगितलस?
प्रज्ञा: हे काय आत्ता सांगतेय. Lol Lol
हे ऐकून अनेक प्रतिक्रिया माझ्या मनात उत्पन्न झाल्या. पण मी त्या इथे सांगणार नाही.(परत कोकणात (प्रज्ञाबरोबर)जायची संधी हातची घालवायची नाही मला. :डोमा:) माझ्या डोळ्यासमोर माझ्या एवढ प्रश्नचिन्ह ऊभ राहिल. आता रजा कशी मिळणार? कारण याच महिन्यात ३ दिवस रजा घेऊन झाली होती. तरी प्रज्ञाला, "माझ येण अवघड दिसतय. पण गाडीत जागा ठेव". अस सांगून कामाला लागले. खूप विचार करून, दुसर्‍या दिवशी सरना खरं कारण सांगून. "जर तुम्ही जा म्हणालात, तर मी जाणार आहे. नाही तर मी जाणार नाही" अस सांगितले. सरांनी पण कधी जाऊन, कधी येणार? याची चौकशी करून त्वरीत परवानगी दिली. (तसे आमचे सर फार चांगले आहेत. Proud आणि मला 'स्वर्ग दोन बोटे उरणे' , म्हणजे काय याचा प्रत्यय आला. Happy
तर अशा प्रकारे आमची कोकणात जायची तयारी सुरू झाली. आणि शनीवारी सकाळी ११ वाजता आम्ही प्रवासाला सुरूवातही केली. आता नमानाला घडाभर तेल न ओतता, (आत्ता पर्यंत किती घडे झाले कुणास ठाऊक? :फिदी:) फोटो दाखवते. प्रथम गोळपला (रत्नागिरी जिल्हा) मुक्काम करायचा होता.
ॐ गं गणपतये नम:
१.

२.

३.

४.

५.एका हॉटेलमध्ये जेवायाला थांबलो. तर ही रंगीत कोंबडी, प्रज्ञाला फार आवडली. (बघायला :फिदी:) म्हणून मी तिचा फोटो काढेपर्यंत तिने मला पाणीही पिऊ दिले नाही. Proud

६. हे तुरे कसले?

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४. आकाश भरून आले होते. आता आम्ही रत्नागिरीत पोहोचलो. आणि माझ्या कानात पु.लं.चा आवाज घुमला, "रत्नांग्रिच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या? " Happy

१५.ढगांचे विविध आकार बघत आमचा प्रवास चालू होता.

१६.हे आत्त्याच्या घरातले सदस्य.

१७.

१८.कमळाची पाने.

१९. तुळसी वृंदावन.

२०. कुटुंब वत्सल इथे फ़णस हा, कटी-खांद्यावर घेऊन बाळे. Happy

२१. जास्वंदीचे फ़ुल.

२२.फ़ुलांसहीत परडी.

२३.पांढरी जास्वंद.

२४.

२५. कापूस. (कपाशी)

२६.उन्हामुळे पेरू करपलेले होते.

२७.कैर्‍या.

२८.कौलांवर वाळत असलेली सुपारी.

२९. घर कौलारू आहे. आणि डिश अँटीना पण आहे.

३०. पांढरा चाफा.

३१. तुळशीच्या मंजिर्‍या.

३२. सुपार्‍यांसहीत टोपली.

३३. काजूबियांची टोपली.

३४.वाळ्त असलेल्या रिठया.

३५.जाळी पडलेलं पान. (सागाच आहे ना?)

३६.अननस.

३७.माड आणि पोफळी.

३८. रातांब्याची कोवळी पालवी.

३९.साखर जांभ.

४०. आणि हे त्याच फुल.

४१.हे त्याच झाड.

४२. पिटुकल शहाळं.

४३.मोहोळ.

४४. विहीर.

४५.निवडुंगाच बेट.

४६.

४७.जास्वंदीच फुल.

४८.केळी.

४९.

५०.करड.

५१. गोवर्‍या.

५२.बांबू.

५३.दगडी डोणी.

५४.

५५.जातं.

५६.

५७.

५८. फणसाच्या कुवर्‍या.

५९. खेड्यामधले घर कौलारू.

६०.

६१.लवंगी मिरची.

६२.अबोली.

६३.

६४.कढीपत्त्याची फुले.

६५.

६६.

६७.खायच्या पानांची वेल.

६८.

६९.सकाळचा नाश्ता, बताटे पोहे.चुलीवर केलेले.(रामनवमी)

७०.आत्त्याच्या घरची म्हैस.

७१.आखाडा.

७२. गणपती मंदीर.

७३.दिपमाळ.

७४.

७५.

क्रमशः

गुलमोहर: 

शोभा, छान फोटो. आत्त्याच्या घरातले सदस्य खूप आवडले (त्यांचं घर असून तुझी आत्त्या त्यांच्या घरात रहाते असं ना Wink
ते तुरे भामण नावाच्या झुडपाचे आहेत.
करड म्हणजे काय? आणि दगडी डोणी नाही दिसत फोटो मधे.. आणि ५६ नं ची फुलं कोणती? पहिल्यांदाच बघितली!

वा - कोकणातील सर्व निसर्ग - फुले, झाडे, मांजरी, म्हशी अगदी सुरेख टिपलस की........

(ते पोह्याच्या पातेल्यावरचं झाकण उघडून का नाही ठेवलं Wink Wink - तो सुर्रेख वास इथपर्यंत पोहोचला असता ना मग.....)

कोकण अजून तसंच आहे कि !!
मे महिन्यात एका नगरकर मायबोलीकरणीला, कोकण दाखवायचे आहे. खास आंबे खायला ती आणि
तिचा लेक जाणार आहेत.

सर्वांना धन्यवाद.
ज्याना फोटो दिसत नाहीत ते सर्व, अमानवीय Wink
फक्त म्हशीचा आधी फोटो दिसला!!!>>>>आर्ये, तुला तोच दिसणार. Proud
(त्यांचं घर असून तुझी आत्त्या त्यांच्या घरात रहाते असं ना) >>>>शांकली अगदी बरोबर. अग रात्री झोपायलाही ती दोघ आत्याशेजारी असतात. (त्यामुळे रात्रभर मी व प्रज्ञा जाग्या होते Sad )
करड म्हणजे काय?>>>>>>गवताचा एक प्रकार आहे. गुराचे खाद्य.:स्मित:
५६ नं ची फुलं कोणती?>>>>>>>आपले तज्ञ सांगतीलच. मलाही नाव माहित नाही.
तो मोगरा नाही कुंद असावा..>>>>>असेल. माझ ज्ञान फारच अगाध आहे. Sad (तरी निग.वर असते.)
(ते पोह्याच्या पातेल्यावरचं झाकण उघडून का नाही ठेवलं डोळा मारा डोळा मारा - तो सुर्रेख वास इथपर्यंत पोहोचला असता ना मग.....)>>>>>>>शशांकजी, तिथे जाऊनच पोहे खाऊया की . Lol
फोटोच्या नादात एवढे सुंदर झालेले पोहे, मला गारच खावे लागले. Proud
कोकण अजून तसंच आहे कि !!>>>>>त्यामुळेच ते अजूनही आवडते. Happy

दिसले दिसले ...आता दिसले फोटु!
शोभे...मलाबोलावलंअसतंतरमीपणआलेअसतेकी!
रच्याकने... मंदिराचा परिसर फार आवडला. का कुणास ठाऊक... झकपक संगमरवरी मंदिरांपेक्षा काळ्या पाषाणाची मंदिरं किंवा अशी जुनी मंदिरं जास्त भुरळ घालतात.
आणि ते 'आखाडा' म्हणजे काय गं?

शोभे...मलाबोलावलंअसतंतरमीपणआलेअसतेकी!>>>>>>>>>आर्ये, खरच विचारणार होते तुला. पण तुझ्या लेकाची परिक्षा वगैरे असेल म्हणून नाही विचारल. पुढच्या वेळी नक्की जाऊ आपण. Happy

मंदिराचा परिसर फार आवडला. का कुणास ठाऊक... झकपक संगमरवरी मंदिरांपेक्षा काळ्या पाषाणाची मंदिरं किंवा अशी जुनी मंदिरं जास्त भुरळ घालतात.>>>>>>अगदी माझ्या मनातल बोललीस. मला तर ती शेणाने सारवलेली जमिनही फार आवडते.
ते 'आखाडा' म्हणजे काय गं?>>>गुरांना सहज आत येता येऊ नये म्हणून, दोन उभ्या चिर्‍याना (दगडाचा एक प्रकार) थोडस गोल पोखरून त्यात हे बांबू अडकवून ठेवतात. पण गुरे आता फार हुशार झाली आहेत. ती याच्यावरून उड्या मारून येतात. Lol

कोकणाचं वेगळचं अंग दाखवलं. ऐरवी फक्त हिरवळ दिसते कोकणाची. तू मात्र खूप वेगळ्या पद्धतीचे फोटो घेतले. आणि तेही इतके सगळे फोटो. किती वेळ लागला असेन ना अपलोड करायला !!!! Happy

शोभा, छान काढलेस ग फोटो !
<<<कोकणाचं वेगळचं अंग दाखवलं. ऐरवी फक्त हिरवळ दिसते कोकणाची. तू मात्र खूप वेगळ्या पद्धतीचे फोटो घेतले. आणि तेही इतके सगळे फोटो. किती वेळ लागला असेन ना अपलोड करायला !!!>>> बी, खरंच आहे ! मला अजिबात पेशन्स नाही एवढे फोटो अपलोड करायला , ते काम शोभाच करू जाणे Proud

शोभा, मस्त फोटो आहेत. उन्हाळ्यात कोकणात जायची हिंमत केलीस? पण भरपुर मज्जा करुन आलेली दिसतेस. वरचा १६ & १७ क्रमांकाचा फोटो आवडला मला. Happy

आज दिसले फोटो Happy
काहि काहि तर अप्रतिम आलेत. फुलासहीत परडी आणि क्र ५७ उल्लेखनिय आहेत. Happy
बाकी कोकण सुंदर नाही असं कोणी म्हणणारच नाही.

छानच. अगदी कोकणात पोचवलस बघ.
५६ नंबरच्या फोटोतली फुल चाफ्यासारखीच दिसताहेत. पण चाफ्याच्या एवढ्या छोट्यारोपाला फुल आलेली पाहिली नाहीत कधी.

Pages