"सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण, निरामय आणि निर्विकार शुन्यच होते. या शुन्यातून ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली. पण जे ब्रह्मदेवालाही निर्माण करायला जमलं नाही ते माणसानी करुन दाखवलं. त्यानी गुंता निर्माण करुन पुन्हा सगळ्याचं शून्य करुन दाखवलं. आणि ब्रह्मासारखं एकदाच निर्मिती करुन तो गप्प बसला नाही. तो गुंता करतच गेला. कारण त्याला सुटसुटीत जगण्यापेक्षा गुंत्यातच जास्त मोकळं वाटतं. नशीबातल्या गुंत्यात गुरफटला असुनही तो समाधानी नसतोच. मग दुस-याच्या गुंत्यात गुंतून तो गुंता वाढवायला पाहतो. ज्याला हे शक्य नसतं तो अंतर्मनातले गुंते शोधत बसतो आणि मग सोडवत बसतो...
सुख म्हणजे नक्की काय हो ? तुम्ही म्हणाल , हीला काय झालं अचानक. एवढा गहन प्रश्न का विचारते आहे ?
नाही , त्याचं काय झालं, कि आत्ता या क्षणी मला काम करायचा अतिशय कंटाळा आला आहे. थाळीत भरपूर काम आहे [in my plate चं शब्दशः भाषांतर] त्यामुळे कायद्याने time-pass करु नाही शकत. येवढ्यातच सर्व servers धडधड खाली पडायला लागले आहेत [down हो] आणि network team ची पळापळ चालू आहे, त्यामुळे अशी न मागताच अचानक सुट्टी मिळाली याचा मला खुप आनंद झालाय.
नमस्कार वाचहो ,
आजच्या युगात स्री कडे बघण्याचा द्रूष्टीकोन एक भोग्य वस्तु असा झालेला बरयाचप्र्माणात दिसतो,परन्तु स्त्री ही पर्वतीचे रुप आहे.शिवाची शक्ती आहे.शिव शक्ती - शिव या शब्दात ईकार हा शक्ती,उर्जा,चैतन्य दाखवतो.ईकार नसेल तर शव राहिल चेतना रहित.शिवातच शक्तीचा अन्तर्भाव आहे.शक्ती म्हणजे पार्वती,देवी.शिव शक्ती एकरुप आहेत्.जीवनात स्री पुरुष शिव शक्ती चे रुप आहेत,एका शिवाय दुसरा उर्जा/शरीर विरहितआहेत. एकमेकान्च्या अस्तित्वाचा आदर करावा आणि आयुष्य आनन्दाने जगावे.
-जैली.
समजा आज ११ में १९३२ तारीख आहे , तुमची डायरी कशी असेल ?
उदा. माझी डायरी-
काल रत्नागिरी ते मुंबई येण्यासाठी संध्याकाळी ५ ला बोट पकडली , सकाळी ७ ला बोट भाऊच्या धक्क्याला लागली , मग घोडागाडी आणि ट्राम ने गिरगाव ला पोचलो ...............
इ.इ.इ.
समजा आज ११ में २०३२ तारीख आहे , तुमची डायरी कशी असेल ?
उदा. माझी डायरी-
आज सकाळी माझ्या बी एम डब्ल्यू फ्लायिंग कार मधून दिल्ली ते मुंबई प्रवास केला , खूप मज्जा आली ,फक्त ३ तासात घरी.
इ.इ.इ.,...............................
२०१० मध्ये रावण नावाचा सिनेमा काढण्यात आला होता. त्यात श्री. सौ ऐश्वर्या राय यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच्या मुलाखाती बघून मी तो सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला. (ऐश्वर्याला एक मिनिट षोडशवर्षीय मुलीसारखं खिदळायचे किती मिळतात हो?). पण या चित्रपटाचं संगीत आमच्या लई लई फेवरेट रेहमानने दिलं असल्यामुळे गाणी मात्र आम्ही आवर्जून ऐकली. अधून मधून नेहमी रेहमान प्लेलीस्टमध्ये "बेहने दे", "रांझा रांझा" झालच तर "बीरा" ही गाणी येतात. पण परवा अचानक बीरा या गाण्यात कॅलक्यूलेशन मिस्टेक आहे असं माझ्या निदर्शनास आलं.
तर गाण्याचे बोल असे आहेत :
साल १९६१ - निर्माता बिमल रॉय यांचा "काबूलीवाला" प्रदर्शित झाला. रविंद्रनाथ ठाकूरांची (टागोरांची) मुळ जबरदस्त कथा, तिला विश्राम बेडेकरांनी चढवलेला पटकथेचा साज, बलराज सहानी-उषा किरण आणि बेबी फरीदा (जलाल) यांचा अप्रतिम अभिनय आणि या सर्वांवर कळस म्हणून की काय सलील चौधरी यांचे संगीत. असा सगळा सोहळा जमून आल्यानंतर प्रेक्षक भारावतील नाही तर काय ? पण एवढं सगळं असूनही या चित्रपटाचा खरा आत्मा ठरलं मन्ना डे यांनी गायलेलं एक गीत -
माँ का दिल बनके कभी, सिने से लग जाता है तु
और कभी़ नन्हीसीं बेटी, बनके याद आता है तु
जितना याद आता है मुझको, उतना तडपाता है तु
तुझपें दिल कुर्बान
साल १९६४. भारत-चीन १९६२ च्या युद्धाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. निर्माता-दिग्दर्शक चेतन आनंद यांचा या युद्धाच्या पार्श्वभुमीवरचा "हकिकत" प्रदर्शित झाला. एका युद्धपटाला मिळतो तितकाच प्रतिसाद या चित्रपटाला सुरवातीला मिळाला. त्यावेळेला आजच्या सारखी प्रदर्शनाआधीच संगीत प्रसिद्ध करण्याची पद्धत रुळली नव्हती.
एक उदास संध्याकाळ. मुड बिनसण्याचे कारण काहीही असू शकते, पण आपल्याला अगदी एकटंच रहावंसं वाटतयं. मनात विचारांचा कल्लोळ आहे पण आपण नक्की काय विचार करतोय हेच लक्षात येत नाहीये. आपण असेच गच्चीवर एका कोपर्यात कोर्या नजरेने दूर पहात उभे आहोत. हळूहळू अंधाराच्या सावल्या आणखी गडद होतायत. आणि नेमकं अशा वेळी हवेच्या लहरींबरोबर कुठून तरी एक स्वर आपल्या कानांवर पडतो -
शाम-ए-गम़ की कसम, आज गमगी़ है हम
आ भी जा, आ भी जा, आज मेरे सनम
स्वतःच्या नकळत आपण त्या स्वरामध्ये कधी गुरफटत गेलो आपलं आपल्यालाच कळत नाही.