"सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण, निरामय आणि निर्विकार शुन्यच होते. या शुन्यातून ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली. पण जे ब्रह्मदेवालाही निर्माण करायला जमलं नाही ते माणसानी करुन दाखवलं. त्यानी गुंता निर्माण करुन पुन्हा सगळ्याचं शून्य करुन दाखवलं. आणि ब्रह्मासारखं एकदाच निर्मिती करुन तो गप्प बसला नाही. तो गुंता करतच गेला. कारण त्याला सुटसुटीत जगण्यापेक्षा गुंत्यातच जास्त मोकळं वाटतं. नशीबातल्या गुंत्यात गुरफटला असुनही तो समाधानी नसतोच. मग दुस-याच्या गुंत्यात गुंतून तो गुंता वाढवायला पाहतो. ज्याला हे शक्य नसतं तो अंतर्मनातले गुंते शोधत बसतो आणि मग सोडवत बसतो... का वाढवत बसतो, कोणास ठाऊक? "
........असं आमच्या चाळीतल्या ढमढेरेवहिनी एकदा म्हणाल्या होत्या.
कोण कुठल्या चाळीतल्या ढमढेरेवहिनी काय म्हणाल्या याचा आमच्याशी काय संबंध? असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ‘ढमढेरे वहिनी’ या नावावर जाऊ नका. त्यांच नाव ढमढेरे असण्याऐवजी ‘ब्रह्मवादिनी गार्गी’ असतं तर लोकांनी त्यांचं तत्वज्ञान डोक्यावर घेतलं असतं. चूक लोकांची नाही म्हणा. जर सॉक्रेटेसचं पुर्ण नाव ‘श्री. सॉक्रेटेस बाजीराव ढमढेरे’ असतं तर लोकांनी अनुल्लेखानी मारण्याइतकंही महत्व दिलं नसतं. पण खरं सांगायचं तर ‘कोणी म्हणलय’ हे महत्वाचं नसतंच, तर ‘काय म्हणलय’ हे असतं. आणि म्हणुन म्हणतो की ढमढेरे वहिनी म्हणतात ते खरं आहे.... ‘माणुस गुंता सोडून जगु शकत नाही, सोडवुन तर नाहीच नाही.’
आमच्या चाळीत तर एकसेएक गुंतेवाईक आहेत. भोपळेचं कागदोपत्री नाव असलेल्या खोलीत, आगलावेंच्या भाच्याचे पोटभाडेकरु सदाभाऊ राहतात; कारण सदाभाऊंच्या खोलीत मूळभाडेकरु असलेल्या भाच्याचे आगलावेमामा राहतात आणि भोपळे आगलावेंच्या खोलीत पोटभाडेकरु आहे. पण मी ह्या असल्या किरकोळ गुंत्यांविषयी नाही तर ह्यापेक्षा भयानक क्लिष्ट गुंत्यांविषयी बोलत होतो.
म्हणजे काय तर... एक दिवस अचानक वरच्या मजल्यावरुन कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज यायला लागले, पण प्रत्यक्षात ते कुत्र कोणाला कधी दिसतंच नव्हतं. मग लोकांनी त्या अदृष्य कुत्र्यावर पाळत ठेऊन त्याला भुंकताना रंगेतोंड पकडलं. रंगेतोंड असं म्हणण्याचं कारण की त्या मजल्यावर राहणारा बोंबले कुत्र्यासारखा मेकअप करुन (म्हणजे ‘कुत्रा करतो तसा मेकअप’ असं नाही, तर ‘मेकअप केल्यावर माणुस कुत्रा दिसेल’ असं) भुंकताना सापडला.
तो असं का करतोय? असं त्याला विचारलं तर म्हणाला की "मंग... मी कुत्रा आहे. भुंकनं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आनी तो मी भुंकनारच."
मग लोकांनी त्याच्या गळ्यात पट्टा बांधुन त्याला मनोविकारतज्ञाकडे नेला. त्या तज्ञानी बोंबल्याला विचारलं की कधी पासुन हे असं वाटतय तर म्हणाला,
"....अगदी पिल्लु असल्यापासुन."
तुम्हाला गंमत वाटत असेल, पण आमचं काय झालं असेल विचार करा. बरं आता ते पिल्लुसुद्धा राहिलं नव्हतं. चांगलं धिप्पाड कुत्र झालं होतं. आम्ही तर हातात काठी घेऊनच फिरत होतो थोडे दिवस. पण सगळीकडे हा इलाज चालत नाही. सगळेच गुंते काठीनी नाही सुटत, काही गाठीशी राहतातच. परवाच्या प्रसंगानंतर तर पटलंच आहे मला.
त्याचं काय झालं, परवा बॅंकेत जायची गरज पडली. मी स्वतःहुन पैसे न काढताच माझ्या खात्यातुन (जे काही उरले होते त्यातुनही) पैसे वजा झालेले. बॅंकेच्या ह्या अक्षम्य गुन्ह्याला माफ करणं अशक्य होतं. मी घरातुनच भांडणाच्या मुद्द्यांची उजळणी करुन गेलो. पण भांडायला आलेल्या ग्राहकांचा तपोभंग करायला एक मेनकाच बॅंकेनी तिथे स्वागतिका म्हणुन बसवली होती. "मी आपली काही मदत करु शकते का ?" ह्या तिच्या अत्यंत गोड आणि लाघवी स्वरानंतर माझं तर विश्वच बदललं आणि माझ्यातल्या पराभुत विश्वामित्रानी तिला माझी किरकोळ तक्रार सांगितली. यावर ती म्हणाली,
"मी माफी मागते तुमची. तुम्हाला त्रास देण्याचा बॅंकेचा कोणताही हेतू नाही. तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल बॅंक दिलगीर आहे. आणि दुसरं असं की.... हरामखोरा.... होतस खंय? खंय नायसो झाल्ललं? आणि असां फसवन जाणा बरोबर न्हंय! काय गावलां तुका आमची अशी फसगत करून? आं!!! जलपरी-जलपरी म्हणान माझ्या पाठसुन लाळ घोटेपणा करित हिंडलस, आणी शेवटाक माझ्याच बाप्पाशीचां बल्यांव घेवन नायसो झालंस... तुका काय लाज, लज्जा... आसा काय नाय? ह्यी पोटात जी काय देणगी देवन गेलस, त्येचो हिशेब कोण देतलो?... तू काय तुझो बापूस?... सांग माका.. तुका काय वाटलां, काष्टी सोडुन प्याण्ट घालन हिंडलस तर कोण वळखुचो नाय?... तुझ्या अख्ख्या खानदानाक पुरान र्ह वतलंय ह्यां लक्षात ठेव..."
तिनी जागेवरच माझं मालवणी वस्त्रहरण करुन टाकलं. सगळे लोक माझ्याकडे मीच तिचा खलनायक प्रियकर असल्यासारखे बघत होते. तिच्या असं ह्या बोंबलण्यामुळे माझ्या तर पोटातर गोळा आला होता... पण माझ्या पासबुकाशपथ सांगतो की तिच्या पोटचा गोळा माझा नाही.... ह्या गोळा प्रकरणामुळे सगळे लोक माझ्याभोवती गोळा झाले.... मला वाटलं की बॅंकेचा गार्ड आता मला गोळीच घालणार. पण असं काहीच झालं नाही. उलट मला मॅनेजर साहेबांचा केबीनमधे नेऊन मला बर्फाचा गोळा देण्यात आला. तिथे कळालं की ह्या मेनकेच्या व्यक्तिमत्वात दुभंग आहे. तिला split personality चा त्रास आहे. म्हणजे आपण कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहोत असं वाटण्याचा, गुंतागुंतीचा मानसिक आजार. त्यामुळेच तिची अशी अचानक ‘प्रियकर सोडुन गेलेली मालवणी कोळीण’ होते म्हणे.
त्यामानानी आमच्या बोंबल्याचं बरं होतं मग. बिस्कीटं दिली किंवा काठी आपटली की तो शांत.
मानसशास्त्र तर म्हणतं की सगळ्याच माणसात हे असं व्यक्तिमत्वात दुभंग सुप्त स्वरुपात असतात. काही जणांचे बाहेर येतात, काहींचे येत नाहीत. असणार... बरोबर असणार त्या मानसतज्ञांचं..... !
तुम्ही कुणाला सांगणार नसाल तर सांगतो......
माझ्या बायकोला पण आहे हा त्रास. कधीकधी मला तिच्यातल्या ह्या दुभंगाची खुप भिती वाटते हो. एकदा रात्री दोन वाजता एकदम ओरडत उठली की.... "घ्या सुया, दाभन, काळी पोत, पिवळी पोत, पायपुसनं, खरबुजे मनी, फनी, कंगवा, चैन, बिचवी, कुंकूडबी,स्नो पावडर, मनगट्या, गजगा, पारामनी, दृष्टीमनी, बिब्बे....... "
सकाळ होईपर्यंत भीमरुपी म्हणत दरवाज्यात घाबरुन बसलो होतो मी. म्हंटलं अजुन काही विकायला काढलं हिनी तर पळुन जायचं.... पण सकाळी नॉर्मल वाटत होती. म्हणाली, "अरे स्वप्न पडलं असेल."
(हे असलं स्वप्न? आपण कुठल्यातरी भटक्या वस्तीमधली खरबुजे मनी, स्नो पावडर, मनगट्या, गजगा विकणारी स्त्री आहोत, हे स्वप्न कसं पडेल कोणाला? आणि ह्या वस्तु नक्की काय आहेत, हे पण माहित नाहीये मला. मी तुम्हाला सांगतो... स्वप्न नाही... स्वप्न नाही.... व्यक्तिमत्व दुभंगच असणार हे !! चाळीतली लोकं मला तुमच्याकडे डिस्को मनी किंवा महेबुबा रिंग आहेत का हो? असं विचारत होती.... हलकट माणसं !
मला त्यांचा राग नाही हो, पण कधीतरी हे सगळं मला बायकोकडून विकत घ्यायला लागुन महागात जाणार आहे, याचं दुःख जास्त आहे....)
मी तर एकदम निराश झालोय. नाही बायकोच्या दुभंगासाठी नाही तर माझ्याच जगासाठी. हट्ऽऽऽऽ काय एकसुरी जगतोय मी..! मी, माझ्यामध्ये मी, माझ्याबरोबर मीच... फुस्स! लोक कशी मस्तमस्त दोनदोन... तीनतीन व्यक्तिमत्व घेऊन जगतात. मी ठरवल की आपण पण दुभंगायचं. पण ‘काय व्हावं?’ काही सुचत नव्हतं. चाळीतल्या गोगटे आज्जींनी माझ्या चेह-यावरची चिंता बरोबर हेरली. त्यांनी नेहमीच्या सवयीने खोदून खोदून विचारलं म्हणुन त्यांना डोक्यातला गुंता सांगितला तर म्हणाल्या, "अवघड आहे, पण जमलं तर माणुस होऊन बघा...!"
ह्या आमच्या नेहमीच्या गोगटे आज्जी नसव्यात. त्यांच्यातलं एखाद्या ‘कुजगट बाईचं’ दुभंग असु शकेल. कारण गोगटे नामक महाकुजगट आजी इतका ‘साधासोपा आणि सुसह्य’ टोमणा मारुच शकत नाहीत. असो.
संध्याकाळी ढमढेरेवहिनी भेटल्या. विचार करुन तोंड उघडणारी जी काही थोडीफार माणसं चाळीत आहेत, त्यातल्याच एक. त्यांना ह्या दुभंगाबद्दल विचारलं. त्या ब-याच वेळ स्वप्नातच निघुन गेल्या. मग विचार करता करता त्या इतक्या उत्तेजीत झाल्या की आनंदातिशयानी त्यांना बोलताच येईना. असुरी आनंदाचे कढ आवरल्यानंतर म्हणाल्या,
"किती छान कल्पना आहे. मला आवडेल असं दुभंग घेऊन जगायला. जे माझ्यातली ‘ही’ करु शकत नाहीये ते माझ्यातली ‘ती’ करु शकेल. आणि महत्वाचं हे की ‘माझ्यातला हीला’ त्याची कल्पनाच नसेल, त्यामुळे काही चूकीचं करताना अपराधीपणाची भावनाच नसेल. अगदी निश्चिंत मनानी सूड उगवता येईल."
"सूड..??? तुम्हाला काय व्हायचय नक्की?"
"मला जर split personality मिळणार असेल तर मी माझ्या सासुची सासु होईन....!" असं म्हणुन ढमढेरेवहिनी चक्क उड्या मारत मारत घरी निघुन गेल्या.
ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय…?
तुम्ही पण कधी कुठल्या गुंत्यात हरवुन जाता का हो? तुमच्यातलीच दाबलेली व्यक्तीरेखा कधीकधी बाहेर येते का हो? असं काही आपल्या जगात घडत असेल याची काही कुणकुण तुम्हाला घरच्यांकडून लागलीये का हो? आणि मग जर असलंच तुमच्या व्यक्तिमत्वात दुभंग, असलीच तुम्हाला स्प्लीट पर्सनॅलिटी तर काय जगायला आवडेल तुम्हाला??
मास्तर व्हाल आणि जगाला शिकवाल ?
का क्रांतीकारक होऊन स्वातंत्र्य टिकवाल ?
मोठे शास्त्रज्ञ व्हाल...? किंवा बॅंकेतला कारकुन ?
कोणी आदर्श व्यक्ती.... की असाल कारटून ?
कोण व्हाल ? काय जगाल ?
विचार करा. बघा.... काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच....!
धुंद रवी
माझ्या बायकोला पण आहे हा
माझ्या बायकोला पण आहे हा त्रास. कधीकधी मला तिच्यातल्या ह्या दुभंगाची खुप भिती वाटते हो. एकदा रात्री दोन वाजता एकदम ओरडत उठली की.... "घ्या सुया, दाभन, काळी पोत, पिवळी पोत, पायपुसनं, खरबुजे मनी, फनी, कंगवा, चैन, बिचवी, कुंकूडबी,स्नो पावडर, मनगट्या, गजगा, पारामनी, दृष्टीमनी, बिब्बे....... "
सकाळ होईपर्यंत भीमरुपी म्हणत दरवाज्यात घाबरुन बसलो होतो मी. म्हंटलं अजुन काही विकायला काढलं हिनी तर पळुन जायचं.... पण सकाळी नॉर्मल वाटत होती. म्हणाली, "अरे स्वप्न पडलं असेल."
(हे असलं स्वप्न? आपण कुठल्यातरी भटक्या वस्तीमधली खरबुजे मनी, स्नो पावडर, मनगट्या, गजगा विकणारी स्त्री आहोत, हे स्वप्न कसं पडेल कोणाला? आणि ह्या वस्तु नक्की काय आहेत, हे पण माहित नाहीये मला. मी तुम्हाला सांगतो... स्वप्न नाही... स्वप्न नाही.... व्यक्तिमत्व दुभंगच असणार हे !! चाळीतली लोकं मला तुमच्याकडे डिस्को मनी किंवा महेबुबा रिंग आहेत का हो? असं विचारत होती.... हलकट माणसं !
मला त्यांचा राग नाही हो, पण कधीतरी हे सगळं मला बायकोकडून विकत घ्यायला लागुन महागात जाणार आहे, याचं दुःख जास्त आहे....)
>>>>>>>>>>>>>> वाईट्ट हसलेय!!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
दुभंग व्यक्तीमत्व
"घ्या सुया, दाभन, काळी पोत,
"घ्या सुया, दाभन, काळी पोत, पिवळी पोत, पायपुसनं, खरबुजे मनी, फनी, कंगवा, चैन, बिचवी, कुंकूडबी,स्नो पावडर, मनगट्या, गजगा, पारामनी, दृष्टीमनी, बिब्बे....... "
हसवता हसवता तत्वज्ञान चांगलच
हसवता हसवता तत्वज्ञान चांगलच रुळतय मनात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही सिरीज सुरु केलीत त्याबद्दल आभार.
(No subject)
दुभंगून जाता जाता अभंग झालो
दुभंगून जाता जाता अभंग झालो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण माझ्या प्रश्नांइतकीच तुमची
पण माझ्या प्रश्नांइतकीच तुमची उत्तरंही महत्वाची...!
सबब... कोण म्हणुन दुभंगायला आवडेल ते सुद्धा जरुर कळवा.
मस्त लिहीलेय !
मस्त लिहीलेय !
माझं ठरलं. दुभंग व्यक्तीमत्व
माझं ठरलं.
दुभंग व्यक्तीमत्व होऊन इथे गझला पाडायच्या आणि कुस्त्या मारायच्या !!
"अवघड आहे, पण जमलं तर माणुस
"अवघड आहे, पण जमलं तर माणुस होऊन बघा...!" >>>>> इथे लेख पार आभाळाला जाउन भिडलाय. या ओळी साठी रवीला सलाम!!
तुमचे विनोदी लेखन हे बरेचसे
तुमचे विनोदी लेखन हे बरेचसे पु.लं.च्या शैलीच्या जवळपास जाणारे आहे. (ही टिकेसाठी केलेली तुलना नव्हे, तर कौतुकासाठी लिहिले आहे, कृपया गैरसमज नसावा)
(No subject)
असं हसवणं फक्त तुलाच जमतं
असं हसवणं फक्त तुलाच जमतं रे..
रवी, शेवट खरंच मोठठा गुंता
रवी, शेवट खरंच मोठठा गुंता मनात ठेवुन गेलाय. लेखन आवडलं हे वेगळं सांगायला नकोच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
छान लिहीलय, मस्त गम्भिर विषय
छान लिहीलय, मस्त गम्भिर विषय हलकाफुलका मान्डलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>तुम्ही पण कधी कुठल्या गुंत्यात हरवुन जाता का हो? <<<< हो
>>>तुमच्यातलीच दाबलेली व्यक्तीरेखा कधीकधी बाहेर येते का हो? <<<< येऊ पहाते, पण हापिसातल्या बॉससमोर वा बायकोसमोर मुग गिळून बसल्याप्रमाणे परिस्थितीपुढे गप्पशार निपचित रहाते
>>>असं काही आपल्या जगात घडत असेल याची काही कुणकुण तुम्हाला घरच्यांकडून लागलीये का हो? <<<< त्यान्ची अजुन साक्ष कशाला हवी? हातच्या कन्कणाला आरसा कशाला हवा?
>>> आणि मग जर असलंच तुमच्या व्यक्तिमत्वात दुभंग, असलीच तुम्हाला स्प्लीट पर्सनॅलिटी तर काय जगायला आवडेल तुम्हाला?? <<<< अर्थात "लिम्बुटिम्बु" म्हणूनच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गेली कित्येक वर्षे मायबोलीवर जगतोच आहे की! तरी काही विघ्नसन्तोषी लोक कम्पु करुन "हा हा लिम्बुटिम्बु नसुन" चान्गला थोराड अमकातमका बाप्या आहे हे सिद्ध करण्यात त्यान्चे मायबोलीवरील आयुष्य वेचतात, त्याची थोडी अडचण होते, पण कदाचित तसे सिद्ध करत बसणे हे त्यान्चे शेरलॉकहोम्स वा डिटेक्टिव टाईप दुभन्गव्यक्तिमत्व असे शकेल, नै?
>>>> मास्तर व्हाल आणि जगाला शिकवाल ? <<< तो जन्मजात गुण आहेच, शिवाय नसेल तर पुणेरीपणातुन येतोच! वेगळ कैतरी विचारा
>>>> का क्रांतीकारक होऊन स्वातंत्र्य टिकवाल ? <<< स्वातन्त्र्य? कुणाच? अन क्रान्तिकारक वगैरे.... जरा अवघड आहे! त्यापेक्षा आपण "स्वतन्त्र" आहोत अशा दुभन्ग व्यक्तिमत्वाने जगणे सोप्पे आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>> मोठे शास्त्रज्ञ व्हाल...? किंवा बॅंकेतला कारकुन ? <<< का राव जखमेवर मीठ चोळताय! कारकुन आहोतच, साले दुभन्गात देखिल कारकुनच रहायचो.
>>>> कोणी आदर्श व्यक्ती.... की असाल कारटून ? <<< आदर्श व्यक्ति सिझनल बदलत अस्तात, शिवाय दुभन्गित व्यक्तिमत्वान्च्या आवडीनिवडीप्रमाणेही बदलतात.
असो.
लेख चान्गलाय
मला दुभंग म्हणून डॉक्टर
.....एकदा रात्री दोन वाजता
.....एकदा रात्री दोन वाजता एकदम ओरडत उठली की.... "घ्या सुया, दाभन, काळी पोत, पिवळी पोत, पायपुसनं, खरबुजे मनी, फनी, कंगवा, चैन, बिचवी, कुंकूडबी,स्नो पावडर, मनगट्या, गजगा, पारामनी, दृष्टीमनी, बिब्बे....... "
सकाळ होईपर्यंत भीमरुपी म्हणत दरवाज्यात घाबरुन बसलो होतो मी. म्हंटलं अजुन काही विकायला काढलं हिनी तर पळुन जायचं.... पण सकाळी नॉर्मल वाटत होती. म्हणाली, "अरे स्वप्न पडलं असेल."
>>
भयंकर हसले... काय लिहिलयस, रे.. देवा...
जबरदस्त लिखाण.. मालवणी
जबरदस्त लिखाण.. मालवणी वस्त्रहरण.. हहपुवा...
मस्त.. जबरदस्त.. मला कोण
मस्त.. जबरदस्त.. मला कोण व्हायला आवडेल.. जाउदे बै..![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
(No subject)
भावना, मग ते १०१ मार्क्स
भावना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग ते १०१ मार्क्स विवेक देसाई या मित्राच्या खात्यावर रुजु.
त्यानी फारच धमाल भाषांतर करुन दिलं मला.
जबरी हसलोय, तो मालवणी
जबरी हसलोय,
तो मालवणी मोनोलॉग तर लईच भारी!!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इथे दुभंगच काय पण त्यांना स्वतःलाही लक्षात राहत नाहीत इतके आयडी घेऊन फिरणारे लोक आहेत, त्यांच्यावरही लिही काहीतरी.
दिनेशदा, कुस्त्या खेळायला तुम्हालाही 'पैलवान' व्हावे लागेल
मला माझा मुलगा व्हायला आवडेल.
मला माझा मुलगा व्हायला आवडेल. म्हणजे मी त्याला कधिकधी उगीचच ओरडलो आहे तेव्हा त्याला किती वाईट वाटते ते अनुभवता येइल. आणि मला त्याच्या सारखे सुरांमधे रंग दिसतिल. कारण इथे असेच रंग ओळखण्याची बोंब आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा | 21 May, 2012 -
दिनेशदा | 21 May, 2012 - 11:16 नवीन
माझं ठरलं.
दुभंग व्यक्तीमत्व होऊन इथे गझला पाडायच्या आणि कुस्त्या मारायच्या !!
>>>
एका दगडात चार पक्षी मारतात हे
गझलकार
सावरकरांच्या बाजूचे
त्यांच्या विरुद्ध असलेले
आणि
गामा पैलवान
बेफी, हे काय फक्त चार पक्षी
बेफी, हे काय फक्त चार पक्षी नाहीत, हा तर पक्षांचा थवा आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ठीक आहे, चार पक्षी या ऐवजी
ठीक आहे, चार पक्षी या ऐवजी 'चार प्रकारचे' पक्षी असे वाचले जावे
बेफि, फारच दाबावी लागते हो
बेफि, फारच दाबावी लागते हो उर्मी. खास करुन तूम्ही ती, रेसिपी दिल्यापासून.
खल्ली, वल्ली, गल्ली, सल्ली, नल्ली.... याबरोबर आपली पल्ली पण यमकात जूळवलेली गझल मी केलीय, असे
भास होतात मला.
लई भारी
खल्ली, वल्ली, गल्ली, सल्ली,
खल्ली, वल्ली, गल्ली, सल्ली, नल्ली.... याबरोबर आपली पल्ली पण यमकात जूळवलेली गझल मी केलीय, असे
भास होतात मला>>
Pages