ललित
तो, ती आणी मी..
एक जूनचा कार्यक्रम पार पाडल्यावर आता वेध लागले होते पावसाचे. नाही म्हणायला पेपरात तेव्हढंच छापून येत होतं, मान्सूनचे अंदमानात आगमन वगैरे वगैरे.... पण इथलं काय? म्हणता म्हणता "तो" कोकण किनारपट्टीवरही येऊन पोहोचला... मग बाबा आमच्याइथे येण्यास इतका ऊशीर का रे...
साधारण अशाच काहीश्या भावना प्रत्येकाच्याच मनात होत्या. नकोसा झाला होता जीव. घामानं थबथबणारं अंग, उन्हानं होणारी काहीली..... पार अगदी डोळ्यात प्राण आणून "त्याची" वाट पाहीली जात होती. रस्त्याने बर्फाच्या लाद्या वाहून नेणारी ती बैलगाडी पाहिली की वाटायचं, सरळ धावत जावं अन् लोळावं त्या बर्फावर.
मातीचं आकाश- `आपली माणसं'...
‘नहीं, मुझे बोलना नहीं आता.. हम इन्सान जिस भगवान की पूजा करते है, उसको कभी देखा नहीं. लेकिन आज मैंने भगवान को देखा है.. इन्सान के रूप में.. वो सामने है.. उसके सामने मैं क्या बोलू?.. बस, यही से मैं उसको प्रणाम करता हूँ’.. असे म्हणत गरीबुल्लाहने डोळे पुसले आणि बसल्या जागेवरूनच समोरच्या व्यासपीठावर बसलेल्यांकडे पाहत नमस्कार केला. नंतर काही मिनिटे तो केवळ स्तब्ध, स्तब्ध होता. शेजारी बसलेल्या आपल्या मुलाच्या पाठीवर त्याचा हात आसुसल्या मायेनं फिरत होता आणि पाणावलेली नजरसमोर, व्यासपीठाकडे लागली होती. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू होतं. ते तो एकाग्रतेनं ऐकत होता.
समजा तुम्ही बहिरे झालात.....
तळटीप :
१. हा विनोदाच्या अंगानी जाणारा ललितलेख आहे.
२. हा ललिताच्या अंगानी जाणारा विनोदीलेख नाही.
३. तळटीप वर कशी अशा तांत्रिक चूका काढु नयेत. ती शेवटी आली तर उपयोग नाही, म्हनुन इथेच. शेवटी ‘टीप’ महत्वाची, मग कुठे का असेना. (पटत नसेल तर कुठल्याही वेटर ला विचारा.)
४. असो.
___________
बाहेर काहीही पाहिलं तर ते घरी येऊन लगेच (आणि कधीच) मागायचं नाही, अशी सक्त ताकीद दिलीये मी मुलीला....
........आणि बायकोलाही.
बालम की गलीं में.........!
हां... ये रसमें ये कसमें सभी तोड के,
तु चली आ चुनर प्यार की ओढ के |
या चला,....जाऊंगा,...मै ये जग छोड के |
सात्वीक प्रेमानं भरलेल्या, र्हुदयाच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक, संवेदनशील मनाला भाव व्याकुळ केल्याशिवाय रहात नाही. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, ज्यानी बॉलिवुड्च्या दुनियेला पुराणी यादें
म्हणुन तिन हजाराहून अधिक गाणी दिली. आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ए॓कणारा प्रत्यकजन पुर्णपणे
नाहूण निघेल तो म्हणजे मुकेश यांचा. ( चित्रपट - कटीपतंग)
जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहेरना नही |
जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां,
" A Lot Can Happen Over Coffee"
आपल्यापैकी बर्याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं..
मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात....
असह्य अर्जुन.. अप्राप्य बुद्ध..!
स्टॅटेस्टिक्स... स्टॅटेस्टिक्स... जगात रोज इतकी लोकं उपाशी झोपतात.. इतकी मुलं कुपोषित आहेत.. इतक्या स्त्रिया अन्यायाला बळी पडतात.. हे आकडे माहितीतले. रोजच्या वाचनातले. रोजच्या विचारातले. त्यासाठी कधी हळहळणे तर कधी पेटून उठणे आणि कधी त्यावरच्या उपायांत खारीचा वाटा उचलणे हे ही नित्याचे.
मुंजीचा कानमंत्र
मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।
नभनाट्य
नभनाट्याचा थरार ...
काल विश्वात शुक्र आणि सूर्यानी घडवला तो थरार प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही.
नासानी केली भरपाई आणि टीव्हीवर दाखविलेल्या फिति बघता आल्या.
जगातल्या विभिन्न देशांमधे वेगवेगळ्या रंगाचा सूर्य दिसला- कुठे हिरवा तर कुठे लाल,
शेंदरी,धुरकट पांढरा, निळा,पिवळा असे अनेक रंग !
कुठे तो लाल-काळ्या चट्ट्यांनी वेढलेलाही दिसला, किंवा त्य्यावर काळे डाग दिसले.
भरतात मात्र काहीच जागी ढगांतून डोकावला- ढुअरकट आणि काळा डाग असलेला.
ती दृष्य बघताना विविध रंग आपल्याकडे दिसले नाहीत याची खंत होती-- पण ...
एका क्षणात, कां घडल असं याचा खुलासा पण चमकला.
मौसम है आशिकाना....!
कधी कधी सगळं कही अगदी झक्कास असत.छानसी संध्याकळ होऊन निळ्या
आकाश्याच क्षितिज केशराच्या तेजस्वी रंगाने मखलेलं असत.बावरी सांज चोरट्या पवलांनी चालत येऊ लागते,
आणि अंगाला सुखद स्पर्श करनारा मंद वारा वहत असतो.आशा शांत वातावरणात कुठेतरी ऊंच झोके घेणार्या
पक्षांचा आवाज नाहीतर रानपाखरांची किलबिल ही ए॓कू येते.
असं सारं कही गोड- मनोहारी असतं. पण तरी उगाचच मनात कुठूनशी ए॓क हुरहूर दाठून येते.निळ्या शांत
जलाशयावर वार्याच्या स्पर्शाने तरंग उठावेत तसं मनात काहीसं हलू लागत.आणि वाटतं खरंच आशा वेळी आता