उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!!
कशिश तुझ्या नजरेतली, तुझ्या हरेक सौंदर्य टिपण्यातली..
मानली नशा तुझ्या स्मरण्यातली, तुझ्या खुल्या सच्च्या धिटाईतली..
धडक तशी तुझी मनवण्यातली, तुझ्या पटलेल्या सहीदार आरेखन्यातली..
हे तुझ जीवन आहे की तुला खरोखर दिसणारा क्षितीजापारचा रस्ता...दूर दूर पर्यंत ठसक्यातली पावले ती तुझीच.. मिळमिळीत नसलेला तुझा कोणताही निर्णय सर्वांस मान्य.. ढब हा शब्द ही कसा आहे ना..ती ढब, ती चाल असले फालतू शब्द वापरून नाही मोजता येणार तुला...
दुपारी दीड-दोनची वेळ, प्रचंड, रखरखीत उन्हाळा आहे; सगळं काही एकदम स्तब्ध. रविंद्रनाथ म्हणतात तशी, 'दिवसाच्या पोटात असलेल्या रात्रीसारखी' दुपार! काहिली इतकी भयंकर आहे की कसलीही सहज कृती, साधा विचारही शक्य नाही, एक प्रकारची ग्लानी आली आहे.
आणि तेवढ्यात कानावर सूर येतात......
'फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, हमसे इक और मुलाकात का वादा कर लो'. मोजकीच वाद्ये, सुंदर चाल आणि 'वादा' शब्दावर गंमत करणारा महंमद रफी नावाचा कोणी. सगळा त्रास, शीण, थकवा संपतो, मन जणू सर्व शारिर संवेदनांच्या पलिकडे जाते, वाळवंटातील ओअॅसिस अजून दुसरे काय असते?
धुळ्यातील माझं काम आटोपुन मी परत जळ्गांवला निघालो होतो. नासिक - जळ्गांव गाडी फलाटावर लागली, मी गाडीत चढलो. जवळ्पास सगळीच आसनं भरली होती. एक अगदीच शेवटचं आसन रिकामं होतं, मी तेथर्यंत जाण्याचा कंटाळा केला. हळुहळु नवीन प्रवासी गाडीत चढावयास सुरुवात झाली तसा मी मागे सरकु लागलो.
नुसतं नसून असण्यासारखं आहे..
जथ्थे नुसते कारे कारे फुललेले..
व्यथा जिथे तिथे कातळात नुसती कोरलेली...
तिढा कायमचा नुसता मांडलेला..
सलोख्यास क्लेश भासते नुसते गूढ...
गूढ मांडणी नुसती सजलेली..
आणि
नुसतं.. भरून येतं..
पुरे.. ते.. जे माहित करून घेतलेलं..
कवितेतील ’त्रिवेणी’ म्हणजेच ’हायकू’ हा काव्यप्रकार मला नीटसा कळतच नाही.
विचार करायला गेलो तर आणखीच गोंधळ उडतो.
तीन ओळींचा आकृतीबंध ! यमक कसं जुळवायचं ? ३ ओळीत सगळं कसं मांडायचं ?
हे भलतंच त्रांगडं आहे.... त्रांगडं !!!...... व्वा !! हा शब्द बरा वाटतो नाही ?
म्हणजे कसं,
३ ओळीत लिहायचं
पण त्रिवेणी नाही म्हणायचं
विचारलंच कोणी तर
’त्रांगडं’ झालं सांगायचं
(चुकून यमक जुळलं वाटतं ;))
तर .... पहा आता हे त्रांगड्याचे नमुने.
त्रांगडं
(१) "खूप कविता लिहिल्यास.
आता काव्यसंग्रह छाप" .... मित्र
मी बँकॉक -अँग्कॉर वॅत(कंबोडिया) -बँकॉक अशी ट्रिप प्लॅन करीत आहे .२२ ते २५ मे.बँकॉक हून ट्रेनने जाणार आहे सेयम रीप व परत्.आणखी कोणी माहिती देवू शकेल का?
असं कधी तुमच्या आयुष्यात घडलं आहे का?...
दिवस रात्र खपून, घाम गाळून बनवलेल्या व तळहाताच्या फोडासारखा जपलेल्या आणि सर्व चाचण्यातून पार पडलेल्या तुमच्या प्रोग्रॅमचा आज दाखवण्याचा कार्यक्रम आहे. क्लायंटची माणसं मुलीला चालून दाखवायला सांगत आहेत.. माफ करा.. उत्सुकतेने प्रोग्रॅमची वैशिष्ट्ये पहात आहेत, तुमच्या ऑफिसची मंडळी त्यांच्या चेहर्यांवरचे हावभाव टिपत आहेत. तुम्ही डेमो देत उभे आहात. स्वतःचं टेन्शन घालवायला, तुम्ही मधे मधे फालतू विनोद करताय, त्याला लोक फिसफिसून दाद देताहेत. तुम्हाला कृतकृत्य होतंय. तुमच्या कर्तृत्वाचा आलेख जिराफासारखा उंच उंच जाताना दिसतोय.
........ आणि......... ठॅप!
माजलेले रण खोल कुठे..
आणि गावागावात हवा जड होऊ लागलीय.. मनाला बोचणारं वारं उघडउघड दिसू लागलं...
दूर अंधारातील खोलीतून येणारे स्वर पार पोहचले आहेत..नकोश्या त्या जन गर्तेत..
शब्द सुचणारी रूचक भाषा नव्हती तरी तिथे पोहचण्यात भाषेला निर्बंध नाहीत..
सूर येति विरून जाति.................................................................................................
दीन हृदय हुंकार विरतो आहे
मज स्वर वार सहन होत नाही...
गजांनी बंद ऋतूंचे जीवन हेतुपुरस्सर विणलेले..
घेरणारे वादळ .........
त्याला छेदणारे पावसाचे थेंब
आणि मी भांबावलेल्या आठवांनी तुझ्याशिवाय..
तसं....; फुलपाखरू मला येऊन समजावते दु:ख तुला कशाचे
मी अबोल मातीकडे पाहतोय.. भिरकावून घेतोय कोणाकडून..
छाती थरथरते माझी फुलपाखराच्या निघण्याने
परका नसलो तर सांगितले असते क्षणभरात मी
उडी घेऊन निजलो होतो त्या पाण्यातच....
फिरून आलो त्यासमच उद्वेगाने..तुला भेटायला परिपूर्ण बुद्धिरूपाने
बस... ते फुलपाखरू शरीर मजला नाही आता..............