कशिश तुझ्या नजरेतली, तुझ्या हरेक सौंदर्य टिपण्यातली..
मानली नशा तुझ्या स्मरण्यातली, तुझ्या खुल्या सच्च्या धिटाईतली..
धडक तशी तुझी मनवण्यातली, तुझ्या पटलेल्या सहीदार आरेखन्यातली..
हे तुझ जीवन आहे की तुला खरोखर दिसणारा क्षितीजापारचा रस्ता...दूर दूर पर्यंत ठसक्यातली पावले ती तुझीच.. मिळमिळीत नसलेला तुझा कोणताही निर्णय सर्वांस मान्य.. ढब हा शब्द ही कसा आहे ना..ती ढब, ती चाल असले फालतू शब्द वापरून नाही मोजता येणार तुला...
तुझे जेन्स कारणीभूत असावेत..की हे सर्व या मानवातल्या स्थित्यंतराची सुरुवात असावी.. तुझा पहारेदार नसावा कोणी आत आत्म्यासारखा.. जसा आतापर्यंतच्या प्रत्येक मानवात त्याचा आत्मा पहारा करून, सद्सदविवेक बुद्धीद्वारा निर्णय ठरवतो.. तसा तुझ्यात नसावा.
तुझे पाणीदार डोळे उगाच कधी डबडबलेले मी पहिले नाहीत. चमक सदैव असावी नसावी असा काहीसा चेहरा..ना निरागसतेच्या पलीकडे.. शिवाय ओढलेली चादर नाही निरागसपणाची..
तुला जाणवणारी जळी स्थळी काष्ठी पाषाणी काव्यमयता कुठवर पसरलेली..अथांग सागरासारखी..