ही खरंतर कविता म्हणून लिहायला घेतली होती, पण गद्द्यासारखी झालीय म्हणून इथे टाकतोय.
======================================================================
उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं
घंघाळभर पाण्यानं भागंना
आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण
खळ्यावर आलू
बांधावर फिरताना जवा
सोग्यानं त्वांड पुसलं
तवा म्होरल्या वावरात मला
ऊसाचं कांडं रवताना
उफाड्याचं सामान दिसलं
आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत
पायताणं तिकडं वळावली
मग दगडं घेऊन गोफणीत
जवारीवरं भिरकावली
तसं म्होरलं वाफं सोडून
सामान मधल्या आळ्याकडं आलं
कंबरचा काष्टा काढून
निऱ्या सावरत ताठ उभं झालं
तोबरा भरुन म्या
ऊसाचा दोष
बाहेरून आले
सांगत बसले
नव-नवा वाद
टांगत बसले
तर्का मधुन वितर्क
नवा भरती केला
दुष्काळाचा दोष
ऊसावरती आला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
दक्षिण अमेरिकेची ट्रीप करायचा आमचा केव्हाचा विचार होता. पण योग जुळून येत नव्हता. काहीना काही कारणाने ट्रीप पुढे ढकलली जात होती होतो. पण अखेर ह्यावर्षी दक्षिण अमेरिकेच्या ट्रीपचा जुळून योग आला. पेरू तसा बराच मोठा देश आहे. मर्यादित सुट्टीमध्ये सगळीच्या सगळी पर्यटनस्थळे बघणे शक्यच नव्हते. त्यामुळे केवळ प्रमुख आकर्षणांना भेट द्यायची ठरली. अर्थात एक मुख्य आकर्षण होते अॅमेझॉन जंगल!!!
सावरा वसुंधरा
जगण्यासाठी जीवन हवं
जीवनासाठी जमीन हवी
हिच जमीन जपण्यासाठी
कर्तव्यात कमी न व्हावी
भविष्यात होणारा धोका
आता लक्षात यायला हवा
पृथ्वी वाचवण्याचा जीम्मा
माणसांनीच घ्यायला हवा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचा सल्ला
नैसर्गिक या दुष्काळात
राजकीय सुकाळ आहे
टिका आणि टिपण्यांचा
बहरलेला अवकाळ आहे
असे ऊकसत बसण्यापेक्षा
परिस्थितीचे भान धरावे
एकमेकांची खेचण्यापेक्षा
एकत्रितपणे काम करावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रचि १:
प्रचि २: कृष्णकमळ
प्रचि ३:
नवं वर्ष सर्वांसाठी आनंदाचं होऊ दे!
प्रतिक्षेची कहाणी
तो येणार म्हणून
ती दिवसभर बसायची
त्याची वाट पाहत
ओले डोळे पुसायची
तीच्यासाठी त्याचं येणं
प्राणप्रिय वाटु लागलं
त्याला विलंब होताच
तीचं मनही दाटू लागलं
तो समाधानाचा अंकुर होता
नव्या दमाची फूंकर होता
तीला प्रतिक्षेत ठेवणारा
तो पाण्याचा टँकर होता
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून गाडगीळ काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते.