दार्जीलिंग सहल - भाग ५ झू आणि एच. एम. आय.

Submitted by दिनेश. on 28 March, 2016 - 15:43

दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963

दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965

दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन http://www.maayboli.com/node/57976

दार्जीलिंग सहल - भाग ३ - बोटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/58000

दार्जीलिंग सहल - भाग ४ - मॉल रोड, टायगर हिल http://www.maayboli.com/node/58009

पुढचा टप्पा होता पद्मजा नायडू झू. आणि हिमालयन माऊंटनेयरींग इन्स्टीट्यूट अर्थात एच. एम. आय.
हे दोन्ही एकाच आवारात आहेत आणि त्यांचे तिकिटही कॉमन आहे.

या झू च्या गेट पासून थोडी दूर गाडी थांबवावी लागते आणि तिथे पार्किंग नाही. झू मधेही बरीच चढ उतार करावी लागते. प्राणी ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या जागाही तीव्र उताराच्या आहेत. हिमालयात आढळणारे प्राणी, जे आपल्याला क्वचितच बघायला मिळतात, ते तिथे आहेत. आणि असे उतार म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक निवास असल्याने ते अगदी मजेत आहेत.

एरवी सहसा झू मधले प्राणी दयनीय दिसतात, पण हे तसे नाहीत. आणि त्यांची नक्कीच उत्तम काळजी घेतली
जाते, कारण त्यांची तब्येतही उत्तम आहे. ब्ल्यू शिप, मारखोर असे काही हरण वर्गातले प्राणी आहेत. पण खरे आकर्षण आहे ते मार्जार कूळातील प्राण्यांचे. पट्टेवाला वाघ आणि बिबळ्या आहेतच पण ब्लॅक पँथर, स्नो लिओपार्ड
पण आहे. सगळ्यात देखणे जनावर ते क्लाऊडेड लिओपार्ड.

पण माझे दु:ख म्हणजे मार्जार कूळातील प्राणी पिंजर्‍यात असल्याने त्यांचे स्पष्ट फोटो काढताच आले नाहीत.
तूमच्यासाठी तिथल्या फलकांचेच फोटो देत आहे ( त्या फलकावरचे फोटोही बहुतेक तिथल्या प्राण्यांचेच आहेत. )
हरण वर्गातले प्राणी जोडीने असले तरी मार्जार कूळातले मात्र एकांडे शिलेदार आहेत. त्याशिवाय रेड पांडाही
आहे. तो इतका क्यूट आहे कि जसा खेळण्यातला टेडी बेअरच.

त्याशिवाय अत्यंत देखणे पक्षी आहेत तिथे. तेही फार हेल्दी आहेत. पण त्यांच्या फोटोंचाही प्रॉब्लेम आहे.
एकतर ते जाळीच्या पिंजर्‍यात आहेत किंवा काचेच्या. दोन्ही ठिकाणी कॅमेरा फोकस करणे कठीण. आणि ते पक्षी महा चंचल. एक क्षण स्थिर बसत नव्हते. त्यांच्या मानाने मळकट रंगाच्या असणार्‍या त्यांच्या माद्या ( प्रत्येकी एकच )
मात्र खुडूक बसल्या होत्या. त्यांचेही जमतील तसे फोटो काढलेच.

या सगळ्या जागी फिरणे म्हणजे डोंगर चढणे आणि त्यातच आणखी जरा वर एच. एम. आय. आहे. हिमालयातील
प्र्वतारोहणाचे प्रशिक्षण देणारी हि नामवंत संस्था. हिचे नाव बरेच ऐकून होतो. आणि तिथूनही जरा आणखी वर
त्यांचेच एव्हरेस्ट संग्रहालय आहे. अप्रतिम संग्रह आहे तिथे. आजवर झालेल्या एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेया
गिर्यारोहकांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह आहे तिथे. त्या वस्तू नुसत्या बघणेच अत्यंत रोमहर्षक आहे. त्यांनी वापरलेली अवजारेच नव्हे तर बूट, टेंट ही तिथे आहेत. या सर्व वस्तू पुर्वी फारच ओबडधोबड असायच्या आणि
अगदी अलीकडच्या काळातील वस्तू खुपच चकाचक आहेत. त्यांच्यात बर्‍याच तांत्रिक सुधारणाही झाल्या आहेत.

तिथेच सर्व हिमालय पर्वतराजींचे मॉडेल ठेवले आहे आणि त्या त्या शिखराच्या नावापुढचे बटण दाबले कि, त्या
मॉडेलमधील त्या शिखराच्या वरचा दिवा लागतो.

पण.... या संग्रहालयात फोटोग्राफीला बंदी आहे... त्यामूळे....

१) हे गेट

२) आत शिरल्यावर

३) गोल्डन फेजंट

४) हिमालयन ताहर

५)

६) मारखोर

७)

८) प्राणी फार जवळ असले तर ते असे वरच्या बाजूनेच बघावे लागतात.

९)

१०) हमसे जो टकरायेगा... ब्ल्यू शिप

११)

१२) याक

१३)

१४)

१५) अत्यंत देखणे जनावर, क्लाऊडेड लिओपार्ड.. इथे तूम्हाला फलकाच्या फोटोवरच समाधान मानावे लागेल, पण माझी त्याच्यावरून नजर हटत नव्हती.

फक्त थोडी झलक...

१६) हा बिबळ्या, पण पूर्ण वाढलेला होता.

१७) बार्किंग डीअर

१८) हिमालयन वूल्फ

१९) एच. एम. आय. चे गेट..

त्यांच्या आवारातला मॅग्नोलिया

यापुढे मात्र फोटोग्राफीला बंदी

२० ) ब्लॅक पँथर, मस्त तुकतुकीत कांती होती याची.

२१) याला म्हणतात मोहात पडणे

२२) स्नो लिओपार्ड.. पण इथेही यावरच समाधान मानावे लागेल.. नैसर्गिक अधिवासात याचे दर्शन फार दुर्लभ आहे.

२३) लेडी अ‍ॅमहर्स्ट ( झाडांमधे हे नाव देखण्या उर्वशीला दिलेय )

२४)

२५)

२५) संभाजी महारांजांसारखाच होता हा !

२६)

२७) रीव्ज फेजंट

२८ ) अत्यंत देखणा हिमालयन मोनल फेजंट.. हा पक्षी मी प्रत्यक्षात बघू शकेन, अशी कधी क्ल्पनाही केली नव्हती मी.

२९) टेम्निक

३०) ग्रे पीकॉक फेजंट

३१) आणि हा रेड पांडा

३२) शेवटी.. हवीच ना !

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. इतक्या कमी वेळात बरंच काही पाहिलंस .. Happy

हिमालयातील प्राणी पक्षी तिकडे आनंदात राहात असलेले पाहून बरं वाटलं..

मस्तं. मी गेले होते तेव्हा अस्वलेही होती, अगदी आत शिरल्या शिरल्या. येथील प्राणी खरच छान जोपासले आहेत Happy

हो खरंच फार सुरेख आहे तो झू. या झू मधिल स्पेशल सेंटरमधे रेड पांडा आणि स्नो लेपर्डची पैदास करण्यात येते.

इथे मी देखिल लिहिलंय आणि फोटोही आहेत.

“The Earth Heroes” Award 2014 करता दार्जिलिंग झू ची निवड झाली होती..

जगभरातील ३०० पेक्षाही जास्त झू मधून ही निवड झाली असून हे पारितोषिक पटकवणारा हा भारतातील पहिलाच झू आहे.

अफाट सुरेख.... कसले भारी पक्षी आणि प्राणी आहेत... >>>>+११११

अतिशय सुंदर फोटो...

“The Earth Heroes” Award 2014 करता दार्जिलिंग झू ची निवड झाली होती. जगभरातील ३०० पेक्षाही जास्त झू मधून ही निवड झाली असून हे पारितोषिक पटकवणारा हा भारतातील पहिलाच झू आहे. >>>>> ग्रेट ....
___/\___

केवढे रुबाबदार आणि देखणे प्राणी. बिचार्‍यांना आयुष्य पिंजर्‍यामध्येच काढावं लागतंय, ह्याचं फार वाईट वाटतं.

आभार,
मामी, ग्रेट न्यूज.. अगदी अभिमान वाटावा अशी. ( पण तिथे कुठे पाटी दिसली नाही तशी. )

प्राणी मात्र खुपच हेल्दी आहेत.

मस्त फोटोज...
हे फोटो पाहून झुरिक झू ची आठवण झाली.
आणि इन्सब्रुक च्या अल्पाईन झू ची ही.. तिथेही आल्प्स क्षेत्रातले प्राणी छान ठेवलेले आहेत.
आपल्याकडेही एवढी छान झू आहेत पाहून बर वाटल...