बनावट दस्तऐवजाचा तपास
जो फ्रॉड क्लेम करतो त्याला फ्रॉड सिध्द करावा लागतो. करार करताना फसवणुक केली व मा÷या नावाने खोटा करार केला किंवा खोट्या करारावर मा÷या ऐवजी दुसर्याी व्यक्तिने मा÷या खेाटया सहया केल्या. अशा मुख्य तक्रारी असु शकतात. फ्रॉडबाबत व फसवणुकिबाबत दिवाणी कार्यवाही ही करता येते. परंतु तो वेळ खाउ असल्याने अनेकदा अन्यायग्रस्त तक्रारदार हा फक्त चिटींगची केस करण्यासाठी उत्सुक असतो.
अद्भूत
--------------------------------
या भूतलावर काही गुढ रहस्य असते का? शाश्वत - अशाश्वतामध्ये काहीतरी सत्य दडले आहे असे म्हणतात. देव जाणे! पण खरेतर मानवी आयुष्य एक अगम्या गूढ आहे असेही कधी कधी वाटते. खरे खोटे देव जाणे! हा जाणता देव तरी कोण आहे की एका मायावी शक्तीलाच आपण पुर्वग्रहानुसार 'देव' असं संबोधतो? देव जाणे! काही असो....
पण मला वाटते तसेच कोणाला काही अद्भूत सापडेल तर इथे सांगावे ====>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण नित्य व्यावहारांत विज्ञान, शास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असे शब्द सहजपणे वापरतो. तर विज्ञान म्हणजे नक्की काय ? कशाला म्हणायचा वैज्ञानिक दृष्टिकोन ? हे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. प्रयत्नातील त्रुटी मनमोकळे पणाने समोर आणल्यास स्वागत आहे.
विज्ञान आणि वैज्ञानिक शाखा:
क्रमबद्ध आणि तर्कशुद्धरितीने, आपल्या आणि सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान एकत्र करुन, त्या ज्ञानाला (माहितीला) पडताळुन बघता येतील अशा नियम आणि सिद्धांतात बद्ध करण्याच्या प्रक्रियेला विज्ञान (Science) असे म्हणतात. Science हा शब्द मुळ लॅटिन scientia (म्हणजे ज्ञान, कौशल्य) पासुन तयार झालेला आहे. [१-२]
जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन या दोन नावांनी अगदी लहानपणापासून म्हणजे वाचायची गोडी लागल्यापासून माझ्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याकाळी जेव्हा जंगलात आत्ताच्या पन्नासपटींनी वाघ आणि इतर जंगली प्राणी होते. अक्षरश शेकडोंनी मनुष्यहत्या करणारे नरभक्षक होते (चंपावत, ठाकचा नरभक्षक आणि पानारचा बिबट्या यांनी प्रत्येकी तीनचारशे बळी घेतल्याची नोंद आहे), माजावर आलेले मस्तवाल रानहत्ती होते. अशा वेळी कुठल्याही क्षणी आपल्या प्राणावर बेतू शकते याची पूर्ण जाणीव असतानाही हातात एक साधी दुनळी बंदूक घेऊन पायी जंगलात फिरणारे हे दोघे म्हणजे माझ्यासाठी सुपरहिरोज होते...
प्रचि १:

प्रचि २:
हा लेख चुकून दोनदा प्रकाशित झाल्याने इथला भाग काढून टाकला आहे.
प्रशासक व नेमस्तकांना विनंती आहे की ही दुसरी प्रत काढून टाकावी!
ह्या प्रतीस कुणीही प्रतिसाद देऊ नये.
नैनिताल सरोवर, नैनादेवी मंदिर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत प्राणिसंग्रहालय, रज्जूमार्गाने वर जाऊन दुर्बिणीतून दूरदर्शन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे नैनिताल गावात आहेत. सारीच स्थळे उत्तम आणि जरूर पाहावीत अशी आहेत. सरोवरातील वल्ह्याच्या नौकेतून मारलेला सुमारे तासभराचा फेरफटका तर अविस्मरणीय. आम्ही सर्वच गोष्टीत खूप रस घेतला. प्राणीसंग्रहालय तर आम्हाला बेहद्द आवडले. तिथून बाहेर पडल्यावर आमच्या बसमधील सर्व मुलांनी, मग पोलिसचौकीसमोर एका ओळीत उभे राहून पिपाण्या फुंकत आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या भागात उत्तराखंडातील इतक्या वनस्पती पाहिल्या पण एक कळीची वनस्पती राहूनच गेली. आम्हाला मात्र संपूर्ण प्रवासात इथे तिथे सर्वत्र ती दिसतच राहिलेली होती. सदाहरित आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची.
मोगर्याच्या झाडासारखेच हिरवेगार, बुटके झुडूप. मुळात हिरव्या-पोपटी रंगाच्या कळ्यांचे झुपके, फुलत फुले मोठी होतात तसतशी पांढरी होऊ लागतात, नंतर उमलत विकसत जात असता त्यांना निळी जांभळी छटा चढू लागते. अशा सर्व अवस्थांतले गुच्छ बाळगणारे झुडूप मग खूपच देखणे दिसू लागते. ह्या झुडुपाला म्हणतात हायड्रन्झिया.