लघु कथा
मा. ल. क. - १०
नजर पोहचेल तिथपर्यंत वाळवंटच दिसे. सोनेरी वाळूंच्या लहान लहान टेकड्या खुप सुरेख दिसत. दिवसा अंग जाळणारे लख्ख उन असे तर रात्री शरीर गोठवणारा गारठा असे. मात्र हे सुंदर दिसणारे विस्तीर्ण आणि लहरी वाळवंट वाट चुकलेल्यांचे हमखास जीव घ्यायचे. रस्ते तसेही नसतच वाळवंटात. जे असत ते रात्रीतुन बदलून जात. रस्तेच काय पण वाळूच्या वादळाने टेकड्याही आपल्या जागा बदलत असत. आकाशवाचन करणारा, ताऱ्यांची आणि वाळवंटातील सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती असलेलाच माणूस हे रण पार करु शके. एकदा का दिशा हरवली की मग प्रवास करणाऱ्याला ती परत सापडने अवघड असे. अर्थात सावल्यांचा जाणकार मात्र क्षणात दिशा सांगू शके.
मा. ल. क. - ५
मा. ल. क. - ४
मा. ल. क. - २
मा. ल. क. - १
माझ्या भावाच्या मुलीला नेहमी मी काही ना काही गोष्टी प्रसंगानुरुप सांगत असतो. तिने एकदा हट्ट केला की “मला या कथांचे ई-बुक करुन दे.” त्याप्रमाणे तिला तिस-पस्तीस कथांचे ई-बुक करुन दिले. या कथा नक्की कुणी लिहिल्या हे माहीत नाहीत. अजोंबांकडून वगैरे त्या मी ऐकल्या. मी ते ई-बुक ‘मार्मिक लघू कथा’ म्हणून सोशल साईटवरही टाकले होते. त्यातल्याच काही कथा येथे मा. ल. क. नावाने तुमच्यासाठी देतो आहे. अगोदर ‘अलक’ हा प्रकार आला, मग मायबोलीवर ‘शशक’ प्रकार आला म्हणून हा ‘मालक’ मी मागे ठेवला होता. तुम्हालाही या कथा आवडाव्यात. कथासुत्र माहित नाही कुणाचे आहे पण शब्दांकन माझे आहे.
प्रत्युत्तर (लघु कथा)
प्रत्युत्तर (लघु कथा)
ती फक्त एक वाक्य बोलली आणि मग मी बराच वेळ वाद घातला, तीच काय अन कसं चुकलं हेच सांगत होतो कितीतरी वेळ... "हे असं असतं" हे समजावण्याच्या प्रयत्नांत खूप बोललो मी...
अन ..... तिने काय केलं?
ती फक्त हसली, "बरोबर आहे तुझं " असं म्हणाली आणि निघून गेली...
(पण मी ....अजूनही विचारच करतोय .)
©मयुरी चवाथे- शिंदे
I was arguing so much on her statement, was trying to make her understand the reality…
And……….what she did?
She smiled and said, “You are right…” Then she Left.
(But I am still thinking….)
'शापित जग' (लघु विज्ञानकथा) [दै. दिव्य मराठी, 'मधुरिमा' दिवाळी अंकामध्ये पूर्वप्रकाशित]
समोर हिरव्यागार डोंगरांची रांग... त्याच्यापुढे घनदाट झाडांची वर्दळ पसरलेली आहे.... पक्ष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करत जाताहेत.... एखादा थवा जातो न जातो, तोच दुसरा लगेच मनाला गुदगुल्या करणारा आधीपेक्षाही मधुर किलबिलाट करत जातो.... त्यांच्या किलबिलाटानेच सिद्ध होतं कि बाहेरचं वातावरण किती आल्हाददायक असेल...
असं वाटतं कि लगेच खिडकी उघडावी आणि बाहेरील वातावरणाचा मनसोक्त श्वास घेऊन आस्वाद घ्यावा...
उतारा (कथा)
"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"
प्रकाश परत तेच म्हणत होता.
"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.
"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.
सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.