भ्याड हल्ले
जात पाहिली जात नाही
धर्म पाहिला जात नाही
मरणारांच्या कर्तृत्वाचा
वर्म पाहिला जात नाही
निष्पापांचेही घेतात बळी
डोकेच त्यांचे म्याड आहेत
म्हणूनच तर त्यांच्याकडून
हल्यावर हल्ले भ्याड आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रॉपर्टी
लोभी माणसांचा उतावळेपणा
कुणाचाही झाकलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा हव्यास
कुणालाही चुकलेला नाही
आपण कमवलेली प्रॉपर्टी कधी
आपल्याच हातुन जाऊ शकते
आता कळून चुकलं आहे की
प्रॉपर्टी जप्तही होऊ शकते,.!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.
यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).
घरची लक्ष्मी
मानवी जातीला घातक अशा
मानवी भावना ठरल्या आहेत
अन् मुलीचा हेवा करून इथे
कित्तेक स्रिया मारल्या आहेत
स्री जातीचा हेवा करणे
हि गोष्टच अवलक्षणी आहे
आई-आजी,बहिण-मुलगी
हिच घरची लक्ष्मी आहे,...
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
उरा-उरात
नभी निर्गमता नारायण
प्रसन्न होऊन जातं मनं
सुख शांती समृध्दीने
ओथंबुन हे येतं मनं
दरवळतो हा आनंद सारा
मना-मनात अन् घरा-घरात
प्रेम वाढते,वाढते आपुलकी
उरा-उरातुन,उरा-उरात,.!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
गीतकार "खरा जादूगर"
गाणं हिट करण्यासाठी
ते गायकाने गावं लागतं
तोंड हालवत का होईना
नायकाला नाचावं लागतं
तेव्हा कुठे ते लोकांत जाऊन
त्यावर प्रसिध्दीचा जोर असतो
मग प्रचिती येऊन जाते की
गीतकारच खरा जादूगर असतो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
हा लेख जवळपास सहा महिन्यांपूर्वी पेपरवर लिहून काढला होता. तो लिहितानादेखील सलग नव्हता. सध्या हातात असलेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून मी लेख संगणकावर आणताना त्यात थोडी सुसूत्रता आणली. तरीही हा लेख अपूर्ण आहे कारण माझ्या मनात पडलेला प्रश्न अजून सुटलेला नाही. हा असा अपूर्ण लेख मायबोलीवर प्रसिद्ध करावा की नाही असा विचार बरेच दिवस रेंगाळत होता. पण आज दिवाळीच्या दिवशी असं वाटतंय की शेवटच्या मुक्कामापेक्षा अनेकदा प्रवास अधिक महत्वाचा असतो. ह्या दिवाळीला “तमसो मा ज्योतिर्गमय” असं म्हणत हा प्रवास प्रसिद्ध करत आहे.
___________________________________________________________________________
दिवाळी
आनंद दिल्याने वाढत जातो
त्या क्षणांचा ऊत्सव हा
आनंद द्यावा-आनंद घ्यावा
दिपावलीचा प्रस्ताव हा
असे कुणीच राहू नयेत
ज्यांनी ही खुशी अनुभली नाही
त्यांच्यातही दिवाळी साजरी व्हावी
ज्यांच्यात कुवत राहीली नाही,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
बिहारी निकाल
कोण कुठे विकास करेल
जनतेला सर्व ठाऊक आहे
पोकळ आश्वासनीय बातांना
जनता आता ना भावुक आहे
जनताही त्यालाच वाव देणार
जो आश्वासनं पाळतो आहे
कारण बिहारी निकाल सुध्दा
आता देशभरात कळतो आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो 9730573783
सत्तेचं घोडं
कधी सत्ता लाटली जाते
कधी सत्ता वाटली जाते
आकड्यांचा मेळ घालत
संयुक्त सत्ता थाटली जाते
कोण कुठून कसं आलंय
हे न सुटणारं तिडं असतं
तुलाही थोडं-मलाही थोडं
असं सत्तेचं घोडं असतं,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३