रुद्राक्ष ला एकट्यालाच रंगवायचे नव्हते, त्याच्या मित्रांसाठीही चित्र हवे होते. म्हणुन त्याच्या मित्रांसाठीही चित्रे रंगवायला दिली. आणि सगळ्यांनी रंगवली मात्र एकेकट्याने तेही आपापल्या घरी. तरी इथे सगळ्यांची एकत्र टाकत आहे. अजुन काही चित्रे रंगवुन यायची आहेत. आली तर इथे टाकेन. तुर्तास इतकेच.
रुद्राक्ष आणि मित्रमंडळांची रंगरंगोटी.
१. रुद्राक्ष (वय वर्ष ५.५)
रंगवायला जलरंग मिळणार म्हणून आरोही खूष झाली. त्या बदल्यात सुट्टीतल्या पाच दिवसांपैकी अडीच दिवसांचा अभ्यास आधीच पूर्ण केला. वेळेवर न दमवता स्वतः आणि वाढलेले सगळे जेवून पण दाखवले. शेवटी गणूला रंगवला तो असा.
गणपती बाप्पा मोरया !
एरवी रंगीत पेन्सिल्स जास्त आवडतात. पण सध्या जलरंगाशी खेळ सुरू असल्याने बाप्पांवरही जलरंगांचा प्रयोग झाला आहे.
क्रेयॉन्स आणि रंगीत पेन्सील वापरून रंगवलं आहे. कुठे कोणता रंग द्यायचा ह्याबाबत माझ्याशी सल्ला मसलत केली. उंदीर मामा ला काळा रंग दे असं सांगितल्यावर " जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन असतो" असं मलाच वेड्यात काढलं गेलं !
हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
हा माझ्या पाल्येचा म्हणजे अंकिताचा प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स आणि प्लास्टिक ब्लेड!
म्हणजे पहिल्यांदा डार्क कलर करून नंतर खेळण्यातल्या प्लास्टीक ब्लेडचा वापर करून शेडींग करायची संपूर्ण कल्पना तिची आहे.
सगळ्या ताई-दादांचे रंगवलेले गणपती बघुन आम्हांला अजुन एक गणपती रंगवायची हुक्की आली.
हा गणपती तब्बल १० मिनीटे घरच्या गणपतीसमोर ठिय्या देऊन रंगवला आहे.
तरी "रस्त्याला पण कलर द्यायचा" यावरुन थोडे रडे झालेच.
तर हा नवीन बाप्पा -
हा आधीचा --