बिहारी दणका
लाट आली-आली म्हणता
लाट ओसरत चालली आहे
गुण-गाण गाणारी जनताच
जणू विरूध्दार्थी कलली आहे
दिल्ली पाठोपाठ जणू हा
आता बिहारी दणका आहे
पराभवाचे धक्के सोसण्या
अच्छे दिनचा मणका आहे,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्तेचं घोडं
कधी सत्ता लाटली जाते
कधी सत्ता वाटली जाते
आकड्यांचा मेळ घालत
संयुक्त सत्ता थाटली जाते
कोण कुठून कसं आलंय
हे न सुटणारं तिडं असतं
तुलाही थोडं-मलाही थोडं
असं सत्तेचं घोडं असतं,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
गरळ ओकू
बोल बड्यांचे असले तरीही
बोलण्या मात्र चेले असतात
राजकारण कुठे करता येईल
यावर सर्वांचे डोळे असतात
कधी गरळ ओकावी याचे
वरून आदेश सुटले जातात
आदेश मिळता गरळ ओकूचे
संयमी बांधही फूटले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शिकाल तर टिकाल
कोणाकडून शिकावं याचं
कधीही काही बंधन नसतं
जिथे शिकता येईल तिथे
शिकण्यासाठी स्पंदन असतं
जे-जे शिकता येईल ते
तत्परतेनं शिकलं पाहिजे
जे काही शिकलो ते
दिर्घकाल टिकलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
डाळ खरेदी
बायको म्हणाली नवर्याला
चला बाजार फिरून येऊ
घेऊ द्या श्रेय कुणालाही
आपण डाळ भरून घेऊ
डाळ स्वस्त झाल्यापासुन
बायकोने घाई केलेली आहे
भाववाढ कधीही होऊ शकते
तीचीही खात्री झालेली आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सोनं शॉपींग
बघता-बघता हा हा करत
घरा-घरात बातमी पसरली
बायकोने सांगितले नवर्याला
सोन्याची किंमत घसरली
किंमत सोन्याची घसरल्या पासुन
बायकोचं वागणं-बोलणं पेटलं होतं
सोन्याची शॉपींग करावी लागेल
नवर्याने समजुन घेतलं होतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
बोनस
जेवढा घेण्यामध्ये असतो
त्याहून जास्त देण्यात असतो
वाटला गेलेला आनंद हा तर
आपुलकीच्या मनात असतो
दिला गेलेला बोनस जरी
मुल्यांकनात भेटला जातो
त्याने भेटलेला आनंद मात्र
किंमत बाह्य थाटला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
रोड अपघात
रस्त्यावरून येता-जाता
घ्यावी सदैव काळजी
वाहनधारकांनी वाहन
चालवु नयेत निष्काळजी
स्वत:सह इतरांसाठीही
वाहतुक नियम पाळले जावे
जागरूक राहून सदैव इथले
रोड अपघात टाळले जावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
बस दर-वाढ
प्रवाशांना दैवत समजून
लुट-लुट लुटू लागले,.?
इकडेही संधी-साधू आहेत
आता खात्रीने पटू लागले
प्रवाश्यांची आवक पाहूनच
दर-वाढीचे जाळे विनले जातात
अन् प्रवास करणार्या प्रवाशांचे
जणू दिवसा खिसे हानले जातात,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
वास्तव कमळ बाणाचे
बाण लागता कमळावर
कमळ जागे झाले आहे
फूस्कारतच कमळानेही
बाणास ऊत्तर दिले आहे
दावा आहे एकमेकांचाही
की मीच त्याचा बाप आहे
त्यांच्या बोलण्याचा खरं तर
त्यांच्याच डोक्याला ताप आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३