प्रशासन

तडका - बाल दीन

Submitted by vishal maske on 14 November, 2015 - 08:40

बाल दीन

बालपण सुंदर असुनही
तिथे वन्समोर मिळत नाही
बालपणातुन गेल्याविना
बालपणही कळत नाही

कितीही मोठे झाले तरी
बालपणात मनं झूलवतात
बालदिन साजरे करताना
बालदीन मनं हेलावतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भ्याड हल्ले

Submitted by vishal maske on 13 November, 2015 - 23:34

भ्याड हल्ले

जात पाहिली जात नाही
धर्म पाहिला जात नाही
मरणारांच्या कर्तृत्वाचा
वर्म पाहिला जात नाही

निष्पापांचेही घेतात बळी
डोकेच त्यांचे म्याड आहेत
म्हणूनच तर त्यांच्याकडून
हल्यावर हल्ले भ्याड आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रॉपर्टी

Submitted by vishal maske on 13 November, 2015 - 21:31

प्रॉपर्टी

लोभी माणसांचा उतावळेपणा
कुणाचाही झाकलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा हव्यास
कुणालाही चुकलेला नाही

आपण कमवलेली प्रॉपर्टी कधी
आपल्याच हातुन जाऊ शकते
आता कळून चुकलं आहे की
प्रॉपर्टी जप्तही होऊ शकते,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भाऊबीज

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 20:06

भाऊबीज

ऊत्सव साजरे करताना
आनंद उतप्रोत असतो
प्रेम आणि आपुलकीचा
ऊत्सव हा एक स्रोत असतो

करायचे म्हणून करायचे
नको नुसतेच नावाला
भाऊबीज साजरे करण्या
बहिण जपावी भावाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बळीराजा

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 01:03

बळीराजा

कधी येणार बळीचं राज्य
सुखही सारं गोठलं आहे
दुष्काळ आणि महागाईनं
वामन होऊन लुटलं आहे

फास घेतोय,विष पेतोय
बळ का गळतंय बळीचं
मरू नको रे बळीराजा
सांगणं हे तळमळीचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - घरची लक्ष्मी

Submitted by vishal maske on 10 November, 2015 - 22:59

घरची लक्ष्मी

मानवी जातीला घातक अशा
मानवी भावना ठरल्या आहेत
अन् मुलीचा हेवा करून इथे
कित्तेक स्रिया मारल्या आहेत

स्री जातीचा हेवा करणे
हि गोष्टच अवलक्षणी आहे
आई-आजी,बहिण-मुलगी
हिच घरची लक्ष्मी आहे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - मनोगत दिव्याचे

Submitted by vishal maske on 10 November, 2015 - 08:50

मनोगत दिव्याचे

मातीवरती पहूडलो
मातीमध्ये बुडलो मी
लाल तापल्या आव्यातील
आगीमध्ये घडलो मी

अजुन आहे खुप काही
जे पोटात गिळतो आहे
तेव्हा कुठे दिवा होऊन
तुमच्यासाठी जळतो आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दिवाळी

Submitted by vishal maske on 9 November, 2015 - 22:58

दिवाळी

आनंद दिल्याने वाढत जातो
त्या क्षणांचा ऊत्सव हा
आनंद द्यावा-आनंद घ्यावा
दिपावलीचा प्रस्ताव हा

असे कुणीच राहू नयेत
ज्यांनी ही खुशी अनुभली नाही
त्यांच्यातही दिवाळी साजरी व्हावी
ज्यांच्यात कुवत राहीली नाही,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आनंदोत्सव साजरे करताना

Submitted by vishal maske on 9 November, 2015 - 10:54

आनंदोत्सव साजरे करताना

फटाक्यांच्या धुम-धडाक्यासह
टिकल्यांचाही थरथराट असतो
आसमंतालाही उज्वल करण्या
रोषनी पावसाचा सुरसुराट असतो

अशी हर्षभरित आतिषबाजी
घरा-घरातुन उधळली जाते
या निमित्ताने दिपावलीच्या
आनंदी काया उजळली जाते

पण आपल्या सुरक्षेच्या समस्या
आता आपल्यालाच कळाव्यात
अन् आनंदोत्सव साजरे करताना
प्रदुषणीय गोष्टी टाळाव्यात,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बिहारी निकाल

Submitted by vishal maske on 8 November, 2015 - 21:49

बिहारी निकाल

कोण कुठे विकास करेल
जनतेला सर्व ठाऊक आहे
पोकळ आश्वासनीय बातांना
जनता आता ना भावुक आहे

जनताही त्यालाच वाव देणार
जो आश्वासनं पाळतो आहे
कारण बिहारी निकाल सुध्दा
आता देशभरात कळतो आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो 9730573783

Pages

Subscribe to RSS - प्रशासन