मुर्दाड माणसं,...!
माणसांचा मर्म इथे
माणसांना राहिला नाही
स्वार्थात माणसांनी
माणूसही पाहिला नाही
असंवेदनांचे इथे
का गर्दाड माणसं,.?
माणसांशी वागताना
झाले मुर्दाड माणसं,.!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
तयारी विस्ताराची
जेवढा क्षण आनंदी
तेवढाच डोकेखाऊ
मंत्रिमंडळ विस्ताराचा
होतो वारंवार बाऊ
आपल्यांसह इतरांचीही
नाराजी दुर सारावी लागते
विस्ताराची तयारी मात्र
गुलदस्त्यात करावी लागते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सुखी कुटूंबाचा मेरू
शुल्लक शुल्लक गोष्टींचाही
भयान वनवा पेटू शकतो
अन् कुटूंबातील कलह कधी
जीवा वरतीही ऊठू शकतो
कुटूंबामध्ये वावरत असताना
कुणी भलता माथेफीरू असतो
पण एकमेकांना समजुन घेणे
हा सुखी कुटूंबाचा मेरू असतो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
असहिष्णूतेच्या वादात
कुणाला दिसली नाही
कुणाला थोडी वाटली
असहिष्णूतेच्या वादामध्ये
अनेकांनी ऊडी घेतली
असहिष्णूतेचा अर्थ देखील
कुणा-कुणाला ज्ञात नाही
पण फाटक्यात पाय घालण्याची
सवय त्यांची जात नाही
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आवाज सत्याचा
आधी काय चालु होतं
आता काय चालु आहे
सत्य सारं उघड पण
आवाज मात्र हळू आहे
सारं काही उघड असुन
बहूमताची सोबत नाही
पण सत्याचा आवाज मात्र
दाबल्याने दबत नाही
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
राष्ट्रप्रेमाचे लक्षण
आपल्या देशाचे राष्ट्रगीत
सदैवच भव्य-दिव्य असते
राष्ट्रगीताचा सन्मान करणे
देशवासियांचे कर्तव्य असते
आपल्या देशावरचे प्रेम
सन्मानाचे रक्षण असते
अन् राष्ट्रगीताचा आदर हे
राष्ट्रप्रेमाचे लक्षण असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
देवाच्या नावाखाली
देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात
माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात
चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सल्ले
कधी फूकटचे असतात
कधी विकतचे असतात
असे एकमेकांना सल्ले
अगदी निकटचे असतात
कधी सल्ले महत्वाचे
कधी कल्ले असतात
तर कधी सल्ल्या मार्फत
घमासान हल्ले असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
ऑनलाइन
नव-नवे माणसं,
नव-नव्या ओळखी
नव-नव्या गप्पांची
रोज नवी पालखी
सोशियल मिडीयावर
इन करून साइन
भेटू लागले रोज
माणसं ऑनलाइन
रोज होतात भेटी
रोज होतं बोलणं
तरी देखील कठीण
दुराव्याला झेलणं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
~!!! उठ बाई तु जागी हो,... !!!~
का वैचारिक प्रगतीची
अजुनही दिरंगाई आहेस
समाजही सांगतो आहे
की बाई तु बाई आहेस
बाईला समानता देणं
गलिच्छ मानलं जातंय
तुझं बाई पण आजही
का तुच्छ मानलं जातंय
का बाईकडे पाहताना
समाज झालाय आंधळा
बाईविना खरं तर हा
समाज होईल पांगळा
आजही नाकारलं जातं
बाई तुझ्या स्वातंत्र्याला
आजही बंदी आहे तुझ्या
त्या मंदीरातील प्रवेशाला
घरा-घरात बसली आहेस
थोडसं बाहेर येऊन बघ
प्रश्न आहे तुझ्या हक्काचा
सावित्रीची लेक होऊन जग
बाई तु समानतेचा लढा दे
पुरोगामित्वात सहभागी हो
दुसर्यांची वाट पाहूच नको
आता ऊठ बाई तु जागी हो
विशाल मस्के