वादांचे सिनेमे
कमी खर्चात मोठा धमाका
पब्लिसिटी स्टंटची जादू आहे
सिनेमांवरती वाद घडणे ही
हल्ली फायद्याची बाजु आहे
आता घडणारे वाद देखील
कधी पाहिले जातील प्रेमाने
येतील सिनेमांच्या वादावरती
भविष्यात पुन्हा नवे सिनेमे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
कौटूंबिक सल्ला
कायद्याचा घेऊन आधार
पत्नी करतात बेजार
समाजात वाढतोय म्हणे
पती अत्याचाराचा आजार
ना पतीकडून,ना पत्नीकडून
अत्याचारी खुळ दाटले पाहिजे
पती-पत्नी दोघांनाही
कुटूंब सुखी वाटले पाहिजे,...
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
दैवताचा खोळंबा
बसही राजी झाली नाही
डेपो बाहेर जाण्यासाठी
चालक-वाहकही रूसले
वाढीव पगार घेण्यासाठी
बस बंदच्या आंदोलनाला
राज्यभरात वळींबा दिला
प्रवाशी दैवत मानणारांनी
दैवताचाही खोळंबा केला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
योजनांतली बेगडेबाजी
योजनांचा लाभ घेता-घेता
कित्तेक मनं करपु लागतात
लाभार्थ्यांकडे येण्याआधीच
योजना मात्र झिरपु लागतात
कित्तेक सरकारी योजना या
कागदोपत्री तगड्या असतात
मात्र वास्तवी फिरून पाहिल्यास
कित्तेक योजना बेगड्या असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
वाईन फेवर
दारूबंदीचे नारे देखील
सर्रास इथे स्थावर आहेत
मात्र वाईन निर्मिती मध्ये
हल्ली नव-नवे फेवर आहेत
नव-नवे फेवर पिऊन-पिऊन
लोकही नको तसे झिंगतील
मात्र ही शरमेची बाब देखील
कुणी अभिमानाने सांगतील
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
साठी प्रतिष्ठेची
जेष्ठ नागरिक होण्यासाठी
आता गरज नाही पासष्ठीची
साठीमध्येच मिळु लागेल
वृध्दांना सवलत प्रतिष्ठेची
वेग-वेगळ्या सवलतींनी
साठीतंच सजु लागतील
साठीमध्ये जाण्यासाठी
लोक दिवस मोजु लागतील
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
डिजीटल युगात
त्रासते आहे आज देखील
खेड्यांत दारिद्र्याची दाटी
मात्र सरकारच्या कृपेमुळे
शहरांची होईल स्मार्ट सिटी
शहरांची स्मार्ट सिटी करताना
खेड्यांना लक्षात घेतील का,.?
बदलत्या डिजीटल युगामध्ये
खेड्यांना स्थान देतील का,..?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
स्मार्ट खुटी
कुणाला कसं भुलवायचं ते
त्यांना पक्क ठाऊक असतं
त्यांच्या रंगेल बोलण्यालाही
जनतेचं मन भावुक असतं
जणू दिशाभुल करण्यासाठी
विचार त्यांचा सुपर असतो
विकासकामंही अडवण्याला
स्मार्ट खुटीचा वापर असतो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
विरोध करताना
करायचा म्हणून उगीचंच
विरोध करता कामा नये
विरोधातही तथ्य असावे
निखळ फूसका ड्रामा नये
आपणच लावलेली आगही
आपल्यालाच पोळू शकते
स्वत:च्या कधी दुसर्याच्या
अनुभवा वरून कळू शकते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
हत्या सत्र
इथे-तिथे कुठेतरी
रोजच होताहेत खुन
जीत्या जगत्यांसह
सुरक्षित नाही भ्रृण
कित्तेकांच्या प्राणाच्या इथे
रोज विझत्या बत्या आहेत
मात्र त्या माणसांसह या
माणूसकीच्या हत्या आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३