मान्यवर मायबोली प्रशासक,
सप्रेम नमस्कार,
राजकारण
कसंही गणित केलं तरीही
ताळे मात्र विचित्र असतात
निवडणूक वेगळी लढवुनही
सत्तेचे मार्ग एकत्र दिसतात,.?
कोण मित्र आणि कोण शत्रु
सहजा-सहजी ना पटलं जातं
जिथे भावनांनाही लुटलं जातं
राजकारण त्यालाच म्हटलं जातं,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आखाडे आकड्यांचे
एकहाती सत्ता घेण्यासाठी
सारेच उत्सुक असतात
मात्र जनता देईल याचे
संकेत कधीच निश्चित नसतात
कित्तेक कित्तेक निकाला अंती
तेच-तेच ठरेल पाढे असतात
अन् डोक्या-डोक्यात भरलेले
आकड्यांचेच आखाडे असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
निकालातुन
कधी अविश्वसनीय बदल तर
कधी विश्वासाला फटका असतो
कुठे विजयाचा,कुठे पराजयाचा
जबरदस्त झटका असतो
म्हणून तर विकासाचं गणित
कधीही ना हूकायला हवं
अन् निकालातुन हेच तरी
प्रत्येकाने शिकायला हवं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
निकाल
मतदारांचा विश्वास मिळवून
कुणी गुलालात सजले जातात
तर कधी झाल्या पराभवामुळे
कुणाचे गुलाल थिजले जातात
कधी पराभव-कधी विजय
हि पंचवार्षिक नवती असते
मात्र आलेला निकाल हा तर
केल्या कर्माची पावती असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रतिक्षा
मतदान पार पडताच
निकालाची ओढ असते
उमेदवांराच्या नावाला
तर्क-वितर्कांची जोड असते
कोण येणार-कोण जाणार
घरा-घरात चर्चा असतात
एक दिवसाच्या प्रतिक्षाही
प्रवासाला दुरच्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भांडण तंटे करताना
प्रत्येकाचीच भावना असते
"हम नही किसी से कम,..."
म्हणूणच तर पाहिला जातो
"किसमे कितना है दम,..."
कुणाचा कट्टर विश्वास असतो
"झूंड मे तो शुअर आते है"
मात्र एकमेकांस भीडताना
"शराफत के फेवर जाते है,..!"
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
वार्षिक आलेख
आतले धडपडतात तर
बाहेरचेही तडफडतात
अन् त्यांचे संघर्ष पाहून
आमचे ह्रदय धडधडतात
काय केले अन् काय घडले
हा विषय ही गाजला जावा..?
अन् विकासाच्या आलेखासह
वादंगी आलेख मोजला जावा,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पेन्शन
सतावते सल तारूण्यातच
उतारवयातील टेंशनची
म्हणून सेवानिवृत्त व्यक्तींना
साथ असावी पेन्शनची
मोडकळीस आयुष्यामध्ये
जणू उमेदीचा सुधार असतो
अन् उतारवयातील पेन्शन
जगण्याचाच आधार असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भांडं
यांनी दिला आहे तर
त्यांनीही घेतला आहे
हा पाठींब्याचा विषय
जोमाने पेटला आहे
एकमेकांचं मन देखील
जराही ना थिजलं आहे
भाऊ माना,मित्र माना
भांडं मात्र वाजलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३