...टाळ्यांचा कडकडाट झाला. कुमारांनी हे सारे आपल्यासाठी अगदी सहज आहे अशा अविर्भावात किंचित हसत हा मान स्विकारला. आणि समोरचा एक कळकट माणूस उठून उभा राहिला.
म्हणाला " मला एक शंका आहे साहेब"
कुमारांनी वर पाहिले. साधे शर्टपँट घातलेला प्रौढ गृहस्थ होता. त्याने त्याची ओळख समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून करून दिली. आडगावच्या का होईना पण कॉलेजचा प्राध्यापक. कुमारांनी त्याला न्याहाळले. प्राध्यापक इतका गबाळा राहतो? त्यानी आपला सारा तिटकारा बाजूला सारला. इथे आता मराठीतच बोलावे लागणार. निश्वास सोडून कुमारांना त्या माणसास बोलण्यास सुचवले.
काल दुपारपासून ती बाथरूमच्या कोपऱ्यात गुडघ्याला मिठी मारून बसली होती. टाईल्सच्या थंडाव्याने हातपाय बधीर होत चालले होते, तरीही घामाने तळवे ओलसर झाले होते.
बाहेर तिचा मोबाईल ठणाणत होता. मुख्य दारावरचे धक्के आणि आरडाओरड अंधूक ऐकू येत होती. "मीरा ss मीरा दार उघड. तुला वाटतंय ते सगळं खोटं आहे. मीराss"
तिने नकारार्थी मान हलवून समोर पाहिलं. काळोखात बिनचेहऱ्याचा तो माणूस अजूनही तिच्याकडे रोखून पहात उभा होता. तो कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. ती तेरा वर्षाची असल्या पासून तो कायम तिच्या मागावर होता...
त्याला संपवण्याचा एकच मार्ग आहे.
प्रा.डॉ. कुमार आज फार खुशीत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेमिनारचा आज शेवटचा दिवस होता. समाजशास्त्रात कुमारांचा दराराच इतका होता की त्यांनी बोलावल्यावर अगदी देशोदेशीचे विद्वान रीसर्च पेपर वाचण्यासाठी आले होते. सारे काही सुरळीत पार पडले होते. काल कुमारांनी आपले अलिकडले संशोधन मांडले. त्यावेळी तर तूफान गर्दी झाली होती. मार्क्सवाद आणि अंतोनिओ ग्रामशीच्या हेजेमनीशी तूलना करीत त्यांनी सांस्कृतिक वर्चस्वाविषयी आपले मत दिले. टाळ्यांचा नुसता कडकडाट चालला होता. देशोदेशीचे बुजूर्ग संशोधक पसंतीने माना डोलवत होते. पेपर संपल्यावर प्रकाशनाबद्दलही विचारणा झाली.

---
रहस्य हा विषयच उत्कंठावर्धक आणि रसपूर्ण! मग गीतारहस्य असो अथवा भारत वर्षाच्या एकुलत्या एक नर्मदा नदीचे उलट्या दिशेने वाहण्याचे रहस्य असो. संपूर्ण विश्व कैक रहस्यांनी भरलेलं आहेत.
"मी ब्रिगेडिअर बाबा जाधव बोलतोय."
"या रविवारी आपण सकाळी दहा वाजता नांदुर्णीला आमच्या घरी या. महत्वाचे काम हातावेगळे करणे आहे. हे काम सोमवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण आपल्या कामाची पर्यायी व्यवस्था करुन यावे. मुक्कामाची सोय आमच्याच घरी केली आहे."
सुस्पष्ट आवाज, तपशीलवार आणि काटेकोर सूचना, आवाजात कमालीची जरब. माझ्या नजरेसमेर एका करड्या शिस्तीच्या सैन्याधिकार्याचा चेहेरा यायला लागला.
तसं मला ब्रिगेडिअर बाबा जाधव फक्त ऐकुन माहिती होते. आण्णा आणि आईकडुन समस्त जाधव घराण्याचा
आज अजून एक बायोडेटा तिच्या हाती पडला. विकेंड आला की ठरलेल्या मुलाला भेटायचं. फुकटची कॉफी प्यायची आणि मग "कळवते" असं म्हणून निघायचं. नकार द्यायला नवीन नवीन कारणं शोधायची.
कित्येक विकेंड तिचं हेच सुरू होतं.
आज पुण्याचं स्थळ होतं.
"सावकाश जा. काही लागलं तर लगेच कळव. आणि छान बातमी घेऊन ये. माझं बोलणं झालय त्याच्या घरच्यांशी.. खूप चांगलं घर आहे.." - आई
"क्लिक व्हायला पाहिजे गं आई... किती वेळा सांगू तुला....जाऊदे चल बाय .."
आमच्या घरातून बाहेर पडलं की रस्त्यावर कुण्णीच नसतं. रस्त्यावरचं पहिलंच घर आमचं, थोडंसं चाललं की रस्ताच वळतो. मग एकदम गर्दी, गडबड, दुकानंच दुकानं. रोजच्यासारखंच आईने माझं बोट घट्ट धरलं होतं. मी ते सोडवलं की ती पुन्हा धरते. ऐकत नाही अगदी. आई नेहमीसारखी घाईघाईत मला काकूंकडे पोचवायला चालली होती. तिथून तिला कामावर जायचं होतं. पण मला उड्या मारत, काचेच्या खिडकीतून दुकानांच्या आत बघायचं होतं. टेडी बेअर, मिकी माऊसचं जे दुकान आहे ना ते मला खूप आवडतं. मी तिथे थांबतेच. मग आई पुन्हा हात धरुन ओढते. आजही आईने तसंच केलं. तिच्या मागे मागे जाताना त्या दुकानाच्या समोर एक मुलगा बसला होता तो दिसला.
परमजितने हातातलं साप्ताहिक रागारागाने भिरकावलं. किती आतुरतेने वाट पाहत होता तो या साप्ताहिकाची. न्यू यॉर्कमधल्या अतिशय प्रसिद्ध साप्ताहिकाने त्याची मुलाखत घेतली होती. शहरातील सर्वोत्कृष्ट तरुण वकील परमजित अरोरा! गेल्या दोन महिन्यात असंख्यवेळा त्यांच्यांशी बोलण्यात, माहिती देण्यात गेले होते. पण प्रत्यक्षात साप्ताहिकाने त्याच्याच कार्यालयात काम करणार्या होतकरु स्त्री वकिलाची मुलाखत छापली होती. परमजित चांगलाच वैतागला. स्वत:ची मुलाखत न आल्याचं त्याला विशेष दु:ख झालं नव्हतं. राग आला होता तो साप्ताहिकाने स्वत:च संपर्क साधून त्याचा वेळ अशारितीने फुकट घालवल्याचा.
बाबुअण्णाला आता रंगरंगोटी करायला जायचे होते. "शिरपतराव" बाबुअण्णा खुशीत आला की श्रीपतीला शिरपतराव म्हणत असे. "आज आमी रात्री उशीर येनार. आज कलेजी आना आनि मस्त जिरं काळीमिरं लावा" बाकी जोडीला रात्रीच्या जेवणाला काय काय आणायचं याच्या सुचना देऊन बाबुअण्णा निघून गेला. श्रीपती तयारीला लागला. एव्हाना दुकानात इतर माणसं आली होती. काम सुरु झाले होते. बाबुअण्णा परतला तेव्हा श्रीपतीने टेम्पो मालाने गच्च भरून तयार ठेवला होता. त्याने पाहिले बाबुअण्णाने केस काळे करून मिशा कोरल्या होत्या. काळ्याही केल्या होत्या. बाबुअण्णाने सर्व माल नीट भरला आहे याची खात्री केली.