डोसा
अमेरिकन गठुड!--६
मी ऑस्टिनला आल्यापासून तीन मंदिरांना भेट दिली आहे. पैकी 'ऑस्टिन पब्लिक लायब्ररी' तुमच्या पर्यंत पोहंचवली आहे. राहिलेले दोन मंदिरांन पैकी एक होते व्यंकटशाचे मंदिर. मुलाकडे गाडी आहे ती पाच आसनी, म्हणजे एक ड्राइव्हर आणि चार पॅसेंजर्स. आम्ही आल्याने आमचे कुटुंब सहा जणांचे झाले. मुलगा, सून, जुळ्या मुली, आणि आम्ही दोघे. आपल्या येथे लेकरं मांडीवर घेऊन गाडीत बसता येत नाही. लहान मुलांसाठी विशेष सोय असलेली डीट्याचेबल सीटिंग अरेंजमेंट असते. ती गाडीतील सीटला जोडता येते. त्यातच लहान मुलं बसवावे लागतात, हे लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी केलेला कायदाच आहे. आणि तो सर्वजण पाळतात.
अमेरिकन वरण मुटकुळे
मी खाण्या-पिण्याच्या संस्कृती [ इंदौर ] ची असल्या कारणाने अधून- मधून माझ्या बटव्यात हा विषय सापडणारच ! अमेरिकेत आम्ही दोन्ही प्रकारच जेवण म्हणजे पश्चिमी आणि भारतीय आम्ही बनवतो. दोन –तीन दिवस पश्चिमी डीशेष खाल्ल्या कि तिसऱ्या दिवशी मात्र झणझणीत भारतीय खायची इच्छा होते, पण सुमारे ८-१० तास बाहेर काम करून आल्यावर घर ची इतर काम, भांडी इत्यादी आपली वाट बघत असतात तेव्हां आपलं चारी–ठाव जेवण करणे शक्य होत नाही. इथे रोज धुणं – भांडी करणारी बाई येत नसते, काही लोकांकडे आठवड्याची साफ-सफाई करायला क्लिनिंग कृ असतो .