वैशाली, पुणे इथे मागच्या बागेत बसायला जागा कशी मिळवावी?
Submitted by अश्विनीमामी on 18 December, 2017 - 04:53
पुणे तिथे काय उणे, त्यात ते आमचे माहेर. फर्गुसन कॉलेज रोड त्रिभुवनातला भारी रस्ता. इथे वैशाली नामक उपहार
गृह आहे ते आपल्या सर्वांचेच लाडके आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न जागा ं मिळवून आरामात खादाडी करण्याचा आहे.
पूर्वी रस्ता अरुंद होता. तेव्हा पुढे बसाय्ला चार टेबले होती तीही भरलेली नसत. हिवाळ्याच्या दुपारी तिथे बाहेर बसून बारकी हिरवी पिव्ळी पाने वार्याने गळत असताना निवांत बसून गप्पा मारणे व काही बाही खाणे किती ग्रेट. पण ते सूख गेले आता . कैक वर्षे झाली वैशाली व निवांत पणा हे समीकरण च लुप्त झाले आहे.
शेअर करा