दोसा-
२ वाटी ब्राऊन/बासमती तांदुळ
१ वाटी उडद दाळ
१/४ टि.स्पुन मेथ्या
मीठ
चटणी -
१:१:१:१:१ प्रमाणात भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही
हि. मिरच्या, मीठ
फोडणीसाठी-
तेल, लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता
सांबार-
१ वाटी शिजलेली तुर डाळ
१/२ वाटी एमटीआर सांबार पावडर, कमी तिखट वाल्यांसाठी १/३ वाटी
२ वाट्या हि.भोपळ्याच्या १ इंच लांबीच्या फोडी
शेवग्याच्या शेंगा उकडुन
कांदा, टोमॅटो लांब चिरुन
जिरे, मोहोरी, मेथ्या, तेल
गुळ, चिंचेचा कोळ, मीठ, तिखट चवीनुसार
बटाट्याची भाजी-
४-५ मध्यम बटाटे उकडुन फोडी करुन
कांदा उभा चिरुन
१ चमचे आलं, हि.मिरची पेस्ट
जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता, तेल
लिंबु/साईट्रिक अॅसिड
दोसासाठीचे जिन्नस, मीठाशिवाय ७-८ तास भिजऊन मिक्समधुन बारीक करावे. नंतर त्यात मीठ घालुन उबेला ठेवावे. जर हवामान खुप उष्ण असेल तर मीठ घालु नये. बरेच थंड असल्यास शाल पांघरुन बंदिस्त ठिकाणी ठेवावे.
जेव्हा भाजी आणि सांबार करायला घ्याल त्या शेजारी हे पीठाचे भांडे ठेवल्यास अजुन पीठ मस्त फुगते.
चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही, हि. मिरच्या, मीठ मिक्सरवर एकदम बारीक करावे, लागल्यास थोडे पाणी किंवा दही घालावे. वरतुन लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्त्याची
खमंग फोडणी द्यावी.
भाजीसाठी जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता फोडणी करुन कांदा मस्त परतुन घ्यावा मग आलं, हि.मिरची पेस्ट परतुन हळद, मीठ आणि लिंबु/साईट्रिक अॅसिड टाकुन मिक्स करुन बटाट्याच्या फोडी टाकाव्या.
सांबारासाठी जिरे, मोहोरी, मेथ्याची फोडणी करुन कांदा परतल्यावर, टोमॅटो आणि भोपळा शिजवुन घ्यावा. शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवुन भोपळा शिजल्यावर घालाव्या. हळद, चिंचेचा कोळ घालुन परतावे. मग तुरीची शिजलेली दाळ, १० वाट्या पाणी घालावे. त्यात एम्टीआर पावडर, मीठ, गुळ घालुन चांगले उकळु द्यावे. पातळ वाट्ल्यास थोडी अजुन पावडर घालावी.
सगळं रेडी झाल्यावर गरमा गरम दोसे घालावे आणि भाजी, चटणी, सांबार सोबत खावेत.
ब्राऊन राईसचे दोसे पण मस्त होतात, फक्त रंग वेगळा येतो. जमल्यास दोसे घालायचा व्हिडिओ टाकेन.
wow
wow
मस्तंय प्रेझेंटेशन. छोटुकले
मस्तंय प्रेझेंटेशन.
छोटुकले डोसेही छान जमलेत.
फोटूमधे वायव्य दिशेला असलेल्या बशीतला ४था आयटम काय आहे?
मस्त प्रेझेंटेशन. फोटोवर
मस्त प्रेझेंटेशन. फोटोवर वॉटरमार्क काय आहे ?
ती कोणत्यातरी भाताची मूद
ती कोणत्यातरी भाताची मूद वाटते आहे इकाका.
फोटो एकदम भारी आहे
मस्त आहे फोटो, रेसिपी. >>१
मस्त आहे फोटो, रेसिपी.
>>१ वाटी शिजलेली तुर डाळ
१/२ वाटी एमटीआर सांबार पावडर>> नक्की अर्धी वाटी? खूप स्पायसी होत नाही? झणझणीत असते एम्टीआर पावडर.
भारी! चटणीच्या रेस्पीकरता
भारी!
चटणीच्या रेस्पीकरता ठांकु. नेहमी फक्त डाळ्यांचीच करते. आता असे करून पाहते.
वाह मस्त
वाह
मस्त
सुरेख सजवलेत डोसे. मस्तच
सुरेख सजवलेत डोसे. मस्तच
सगळ्यांना धन्यवाद! इब्लिस,
सगळ्यांना धन्यवाद!
इब्लिस, केशर भात आहे तो.
मेधा, सासरचं साडनाव
नवर्याच्या प्रायव्हेट वेबसाईट्वर टाकलं की आपोआप येतो, पण फोटो मीच काढलाय आयफोनच्या कॅमेरातुन.
सायो, मी ति़खट अजिबातच घालत नाही. बदल करते रेसिपीत.
मस्त सजवलंय.. दोसे छान पण
मस्त सजवलंय.. दोसे छान पण भाजी अन चटणी काय सुंदर दिसतायत..
फोटोवर आपोआप वॉटरमार्क कसा येतो ते सांगशिल का मला विपूत?
मस्त दिसतोय अन चव सुध्दा
मस्त दिसतोय अन चव सुध्दा मस्त असणार
तिखट मी ही नाही घालत. फोडणीत
तिखट मी ही नाही घालत. फोडणीत लाल सुक्या मिरच्या घालते मात्र.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त! चटणीची रेसिपी एकदम
मस्त! चटणीची रेसिपी एकदम इंटरेस्टींग वाटत आहे ..
फोटो प्रचंड तोंपासू आहे. मला
फोटो प्रचंड तोंपासू आहे. मला आत्ताच्या आता हे ताटच हवे.
वा. मस्तच फोटो प्रिती.
वा. मस्तच फोटो प्रिती.
वॉव.. अगदी पिक्चर पर्फेक्ट
वॉव.. अगदी पिक्चर पर्फेक्ट जमलेत.
सही !!
सही !!
जबरी आहे फोटो. ब्राऊन राईसचे
जबरी आहे फोटो.
ब्राऊन राईसचे दोसे पण मस्त होतात, फक्त रंग वेगळा येतो. >>> याची रेसिपी देऊ शकशील का ?
वॉव! तोंपासु फोटो.. मवा..
वॉव! तोंपासु फोटो..
मवा.. माझी रुममेट ब्राउन राईस,उडीद डाळ नि मुठभर हरभरा डाळ घालुन भिजवते ७-८ तास .. मग थोडे ओट्स घालुन मिक्सर मधे पीठ करुन घेते..
हो फोटो जबरी आहे चटणी रेस्पी
हो फोटो जबरी आहे
चटणी रेस्पी भन्नाट आहे
मस्त!
मस्त!
चनस, धन्यवाद.
चनस, धन्यवाद.
देखणं प्रेझेंटेशन आहे
देखणं प्रेझेंटेशन आहे झक्कासच!
लय भारि.. कसल सुंदर
लय भारि.. कसल सुंदर दिसतय... आताच भुक लागलि ..
वा ! सांबराचा रंग हि छान
वा ! सांबराचा रंग हि छान आलाय .
मस्त! नेत्रसुखद पण झालेत!
मस्त! नेत्रसुखद पण झालेत!
एक नंबर !! क्लास फोटो !!
एक नंबर !! क्लास फोटो !!
धन्यवाद मंडळी! चटणी जो खातो
धन्यवाद मंडळी!
चटणी जो खातो त्याला नक्की आवडते
करुन पहा नक्की!
मवा, तेच प्रमाण, साध्या तांदळा एवजी, ब्राऊन राईस.
प्रिती, चटणी खूप आवडली. थँक
प्रिती, चटणी खूप आवडली. थँक यू.
दाणे एकदा न भाजताही घातले होते. तीही चटणी मस्त झाली होती
Pages