दोसा-
२ वाटी ब्राऊन/बासमती तांदुळ
१ वाटी उडद दाळ
१/४ टि.स्पुन मेथ्या
मीठ
चटणी -
१:१:१:१:१ प्रमाणात भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही
हि. मिरच्या, मीठ
फोडणीसाठी-
तेल, लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता
सांबार-
१ वाटी शिजलेली तुर डाळ
१/२ वाटी एमटीआर सांबार पावडर, कमी तिखट वाल्यांसाठी १/३ वाटी
२ वाट्या हि.भोपळ्याच्या १ इंच लांबीच्या फोडी
शेवग्याच्या शेंगा उकडुन
कांदा, टोमॅटो लांब चिरुन
जिरे, मोहोरी, मेथ्या, तेल
गुळ, चिंचेचा कोळ, मीठ, तिखट चवीनुसार
बटाट्याची भाजी-
४-५ मध्यम बटाटे उकडुन फोडी करुन
कांदा उभा चिरुन
१ चमचे आलं, हि.मिरची पेस्ट
जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता, तेल
लिंबु/साईट्रिक अॅसिड
दोसासाठीचे जिन्नस, मीठाशिवाय ७-८ तास भिजऊन मिक्समधुन बारीक करावे. नंतर त्यात मीठ घालुन उबेला ठेवावे. जर हवामान खुप उष्ण असेल तर मीठ घालु नये. बरेच थंड असल्यास शाल पांघरुन बंदिस्त ठिकाणी ठेवावे.
जेव्हा भाजी आणि सांबार करायला घ्याल त्या शेजारी हे पीठाचे भांडे ठेवल्यास अजुन पीठ मस्त फुगते.
चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही, हि. मिरच्या, मीठ मिक्सरवर एकदम बारीक करावे, लागल्यास थोडे पाणी किंवा दही घालावे. वरतुन लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्त्याची
खमंग फोडणी द्यावी.
भाजीसाठी जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता फोडणी करुन कांदा मस्त परतुन घ्यावा मग आलं, हि.मिरची पेस्ट परतुन हळद, मीठ आणि लिंबु/साईट्रिक अॅसिड टाकुन मिक्स करुन बटाट्याच्या फोडी टाकाव्या.
सांबारासाठी जिरे, मोहोरी, मेथ्याची फोडणी करुन कांदा परतल्यावर, टोमॅटो आणि भोपळा शिजवुन घ्यावा. शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवुन भोपळा शिजल्यावर घालाव्या. हळद, चिंचेचा कोळ घालुन परतावे. मग तुरीची शिजलेली दाळ, १० वाट्या पाणी घालावे. त्यात एम्टीआर पावडर, मीठ, गुळ घालुन चांगले उकळु द्यावे. पातळ वाट्ल्यास थोडी अजुन पावडर घालावी.
सगळं रेडी झाल्यावर गरमा गरम दोसे घालावे आणि भाजी, चटणी, सांबार सोबत खावेत.
ब्राऊन राईसचे दोसे पण मस्त होतात, फक्त रंग वेगळा येतो. जमल्यास दोसे घालायचा व्हिडिओ टाकेन.
धन्यवाद चिन्नु
धन्यवाद चिन्नु
लय भारी. फोटो एकदम तों.पा.सु.
लय भारी. फोटो एकदम तों.पा.सु.
Pages