Submitted by स्वाती आंजर्लेकर on 26 December, 2012 - 05:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
नाचणीचे (नागली / रागी) पीठ २ वाट्या
बेसन १ वाटी
आलं-लसुण-मिरची पेस्ट
हळद
कोथिंबीर बारीक चिरुन
२ टोमॅटो प्युरी करुन
मीठ
तेल
क्रमवार पाककृती:
तेल वगळुन बाकी सगळे साहित्य पाणी घालुन एकत्र करा
डोशाच्या पीठाएवढे पातळ करा.
नॉनस्टीक पॅनवर थोडे तेल टाकुन डोसे बनवा.
चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ... उद्या लेकीच्या
मस्त ... उद्या लेकीच्या डब्याला करते. थोडे तांदुळाचे पण पीठ घालुन बघते...
छान आहे रेसिपी. थोडेफार
छान आहे रेसिपी. थोडेफार टोमॅटो आम्लेट सारखे. पण नाचणीच्या पिठामुळे पौष्टिक!
डोसा का धिरडं? मी नेहेमीची
डोसा का धिरडं?
मी नेहेमीची धिरडी करताना कणीक, नाचणीचं पीठ (समप्रमाणात) आणि बेसन (साधारणपणे एक तृतियांश) घेते. तांदूळ, ज्वारी अशी पिठं असतील तर तीपण थोडी थोडी घेते. मस्त लागतात
मी आजच करुन बघेन.
मी आजच करुन बघेन.
सोपा आणि मस्त ... मला कुणी
सोपा आणि मस्त ...
मला कुणी सांगेल का नाचणी उष्ण की थंड????
नाचणी थंड
नाचणी थंड
वॉव... मी तर असपण ते चॉकोलेट
वॉव... मी तर असपण ते चॉकोलेट च धिरड समजुन खाईन
नाचणी थंड >>+१
नाचणी थंड
>>+१