कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्वाची शहरे असून अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोची-एर्नाकुलमच्या आसपास अनेक विशेष आर्थिक क्षेत्र स्थित आहेत. त्याचबरोबर कोची हे दक्षिण भारतातील एक मोठे नैसर्गिक बंदर असून नौदलासाठी आणि व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी इथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धिकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या संस्थाही इथे आहेत.
पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते.
नोव्हेंबरच्या थंडीतला दिवस होता. जेम्स मरे इंग्लंडच्या क्रॉथॉर्न येथे पोहोचले. ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते आले होते त्यांचे ब्रॉडमूर नावाचे मोठे भव्य घर असावे असे त्याने गृहीत धरले होते. ते त्यांच्या गाडीतून बाहेर पडले आणि उत्साहाने एका मोठ्या खोलीत गेले. ज्यांच्या भेटीसाठी मरे आले होते त्या माणसाचे मरेवर खूप ऋण होते.
'जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान
वार्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान'
असं गोविंदाग्रज कुठल्याश्या प्रतिभेने भारलेल्या अलौकिक क्षणी लिहून गेले असतील कोणास ठाऊक! जगण्याचा अर्थ गवसलेले असे सुवर्ण अश्वत्थासारखे लोक प्रत्येक पिढीत असतात, आणि तरी कालसामर्थ्यापुढे नाजूक पानांसारखंच त्यांना कधीतरी जावं लागतं. स्वतंत्र भारतामधल्या गणितज्ञांच्या पहिल्या पिढीतली दोन सोनेरी पिंपळपाने गेल्या वर्षभराच्या कालावधीत अशीच अज्ञाताच्या चरणी अर्पण झाली. ते दोघे म्हणजे एकमेकांचे परममित्र असलेले 'कोंजीवरम श्रीरंगाचारी शेषाद्री' आणि 'मुदुंबई शेषाचलु नरसिम्हन'.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21
श्रीमद् रायगिरौ
शिवकालीन रायगड नगररचना आणि वास्तू-अभ्यास
लेखक- श्री. गोपाळ चांदोरकर (आर्किटेक्ट)
लेखक श्री. गोपाळ चांदोरकर आता ८५+ वर्षांचे आहेत. हे पुस्तक २०१७ मध्ये प्रकाशित झालेलं आहे. (बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे)
भारत निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली . हा दिवस संपूर्ण देशभरात ''राष्ट्रीय मतदार दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात होणारी प्रत्येक निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाचा घसरणारा टक्का यामुळे निवडणुकीत लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने २०११ पासून भारत सरकारने भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन २५ जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिन" म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
व्हिक्टोरिया राणीचा पुतळा
हिरा यांनी प्रतिसाद देताना उल्लेख केलेला व्हिक्टोरिया राणीचा बसलेल्या स्थितीत असलेल्या राणीच्या पुतळ्याबद्दल ची हि माहिती.