डॅन गिब्सन यांनी मक्केच्या वर्णनात आलेल्या ' हरित भूमीचा ' आणि ' झाडांनी भरलेल्या शेताचा ' उल्लेख बघितल्यावर मुद्दाम मक्केच्या आसपासच्या भूमीचे मातीचे नमुने आपल्या काही सहाय्यकांना तपासायला दिले. त्याचे निष्कर्ष असे आले, की अतिशय प्राचीन काळापासून या भागात शेतीयोग्य जमीन उपलब्ध नव्हती. मातीत कोणत्याही प्रकारचे परागकण, पोषणद्रव्य किंवा झाडांचे प्राचीन अवशेष त्यांना मिळाले नाहीत. मक्केला अतिशय प्राचीन काळापासून जास्तीत जास्त १० सेंटीमीटर प्रतिवर्ष इतकाच पाऊस पडल्याचे उल्लेख आहेत.
आजच्या काळात अरबस्तानच्या रेताड वाळवंटात मोठमोठाली महानगरं वसलेली असली, तरी प्राचीन काळी या भागात वस्ती करणं अतिशय दुरापास्त होतं....पण काहीही झालं, तरी हे वाळवंट होतं भारत आणि आग्नेय दिशेकडच्या प्रगत साम्राज्यांच्या आणि युरोप-लेव्हन्ट भागातल्या संस्कृतींच्या बरोब्बर मधल्या भागात. या दोन संस्कृतींमध्ये यथावकाश व्यापाराचे मार्ग प्रस्थापित झाले आणि या मार्गावरची गावं हळू हळू पुढारत गेली. पूर्वेकडून मसाले, धान्य, मौल्यवान रत्न पश्चिमेकडच्या देशात जायला लागली. समुद्रमार्ग जोखमीचा आणि लांबचा असल्यामुळे खुश्कीच्या मार्गाचाच पुढे बऱ्यापैकी विकास झाला.
मागच्या काही दिवसांमध्ये सुदैवाने इस्लामच्या इतिहासाचा मागिव घेणाऱ्या काही संशोधकांची गाठ पडली आणि त्यांच्याकडून मला बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर आजवर मला माहित नसलेली माहिती मिळत गेली. हे संशोधक वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकी करतात, ' इस्लामिक फाउंडेशन ' चं काम करतात, दुर्मिळ हस्तलिखितं अथवा उत्खननात सापडणाऱ्या चीजवस्तूंवर संशोधन करून नवनवी माहिती उजेडात आणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इस्लामचा एकांगी विचार न करता या तुलनेने अर्वाचीन पण आज समस्त जगात विस्तारलेल्या धर्माच्या अनुत्तरित प्रश्नांचा विवेकबुद्धी शाबूत ठेवून मागोवा घेतात.
चायनीज कम्युनिस्ट पार्टीला ( CCP ) १ जुलैला १०० वर्ष पूर्ण झाली. चीनमध्ये याचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. ट्विटरवर या सेलिब्रेशन विरोधात #100YearsOfDarkness हा हॅशटॅग जोरात चालला. चायनीज कम्युनिस्ट पार्टी विरुद्ध अनेक लोकांनी या हॅशटॅग अंतर्गत मोहीम चालवून या पार्टीची काळी बाजू जगासमोर मांडलीय. चायनीज कम्युनिस्ट पार्टीने या १०० वर्षात जगाला काय दिलं याचा आढावा या लेखमालेत घेऊया.
कोरोनामुळे सध्या घरीच आहे. अभ्यास करून कंटाळा आल्यावर असंच काहीतरी वेगळं वाचावं म्हणून रस्किन बॉन्ड वाचत होतो . एका कथेचं नाव होतं - old graveyard at sirur....( By C.A Kincaid ) सिरुर वाचून जरा उडालोच... सिरुरची कथा ते पण रस्किन बॉण्ड च्या पुस्तकात?? छे छे हे दुसरं काहीतरी असेल म्हणून पुढे वाचायला सुरुवात केली .. forty miles from POONA आणि आश्चर्य सत्यात उतरलं हे पुणे नगर रोडवरचंच शिरूर ... तर कथा होती अशी की पुण्याच्या एका इंग्रज अधिकार्याला शिरूरला असताना स्थानिक लोक एका ठिकाणी नमस्कार करून जाताना दिसले .
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 जून 2021 रोजी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करण्याची प्रथा अलिकडील काळात अतिशय दुर्मिळ झालेली आहे. यंदाही तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीची निवड केली गेली होती. आपल्या मूळगावी परौख येथे जाण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्ली ते कानपूर असा 438 किलोमीटरचा प्रवास रेल्वेगाडीने केला. अलिकडील काळात भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला.
तुम्ही कधी डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा बीबीसी अर्थ ह्या वाहिन्यांवर ‘प्राईड कॅप्चरिंग’ बघितलं आहे का?? मला कल्पना आहे काही लोकांनी तरी नक्कीच बघितलं असेल!! ‘प्राईड कॅप्चरिंग’ म्हणजे एक किंवा दोन नर सिंहांनी (मेल लायन) दुसऱ्या एका सिंहाच्या कळपातील एक किंवा दोन नर सिंहांचा (मेल लायन) पराभव करून त्या कळपावर पर्यायाने त्या कळपातील मादी सिंहांवर (फिमेल लायन) आपलं प्रभुत्व प्रस्थापित करणे ह्याला ‘प्राईड कॅप्चरिंग’ म्हणतात!! प्राईड कॅप्चर केल्यावर नर सिंह सगळ्यात पहिले कुठली गोष्ट करतो माहितीय?? तो आधीच्या नर सिंहांपासुन झालेले जे लहान लहान पिल्लं असतात त्यांना निर्दयतेने मारून टाकतो!!
२९ मे रोजी प्रचंड रक्तपात सुरु असताना मेहमत आपल्या खास जॅनिसेरी अंगरक्षकांसह शहरात शिरला. त्याने आपल्या आजूबाजूला सुरु असलेल्या विजयी उन्मादात जेव्हा शहराच्या भूमीवर पाहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा त्याच्या मनात अनेक भावना उचंबळून आल्या. त्याने जे काही करून दाखवलेलं होतं, ते त्याच्या आधीच्या एकही मुस्लिम सम्राटाला जमलेलं नव्हतं. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती पंथाचा मेरुमणी, जगातल्या महत्वाच्या श्रीमंत शहरांपैकी एक आणि भौगोलिक दृष्ट्या अतिमहत्वाच्या शहरावर अवघ्या विशीत त्याने ताबा मिळवून दाखवलेला होता.