आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.
साइटचे नियम पाळून चर्चा करु या.
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची
चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.
गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष कापून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते.
ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’...
माझ्या अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ या मालिकेवर पुस्तके, मिनीसिरिज, डॉक्युमेंटरीज, सिनेमे, पॉडकास्ट यांची छान सजेशन्स आली. ती सगळी एका वेगळ्या धाग्यावर संकलित करण्याची सुचना आली, जी मलाही आवडली. ती सगळी इथे एकत्रित करुन लिहीत आहे.
....
मराठी भाषा दिनानिमित्त या मायबोलीचा आजपर्यंत चा प्रवास कसा झाला हे पाहूया.
माणसाला रूप,रस, गंध, स्पर्श या प्रमाणेच अजून एक महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे वाणी
या वाणीचा उपयोग करून एकमेकांशी त्यांनी संवाद साधला, देवाणघेवाण केली. त्यातून हळूहळू भाषेची निर्मिती झाली. भाषेमुळे मेंदूची जास्त प्रगति झाली असे म्हणतात.
मराठी भाषा दिनानिमित्त या मायबोलीचा आजपर्यंत चा प्रवास कसा झाला हे पाहूया.
माणसाला रूप,रस, गंध, स्पर्श या प्रमाणेच अजून एक महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे वाणी
या वाणीचा उपयोग करून एकमेकांशी त्यांनी संवाद साधला, देवाणघेवाण केली. त्यातून हळूहळू भाषेची निर्मिती झाली. भाषेमुळे मेंदूची जास्त प्रगति झाली असे म्हणतात.
अरबस्तानच्या वाळवंटात घडलेल्या घटनांचा हा गोषवारा जितका रंजक आहे, तितकाच वैविध्यपूर्ण. या भागातली संस्कृती इतर जगापेक्षा निराळी. जगातल्या तीन प्रमुख धर्मांचा उगम झालेली ही भूमी गेल्या हजारो वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरांतून गेली असल्यामुळे येथे इतिहासाला कलाटणी देणाऱ्या असंख्य घटना घडून गेल्या आहेत. या भूमीतून जसे ओसामा बिन लादेन निपजले, तसेच राजे फैसलही. इथल्या अरबांमध्ये एका बाजूला कट्टर इस्लामी विचारांना कवटाळून राहिलेले मूलतत्त्ववादी आहेत, तसेच दुसरीकडे जगाला ' गज़ल ' या काव्यप्रकाराची देणगी देणारे कलेचे भोक्तेही आहेत.