अरबस्तानचा इतिहास - भाग ०५
जोसेफ ते मोझेस - इजिप्तचे दिवस
जोसेफ ते मोझेस - इजिप्तचे दिवस
भाऊबंदकी
कुटुंबकलह
पुन्हा स्थलांतर
मूळपुरुष ते आद्यपुरुष
२ ऑगस्ट २००८ चा दिवस.
ओल्मर्ट यांनी आपल्या कार्यालयात झाडून सगळ्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आणि राजकारणी लोकांना बोलावून घेतलं होतं. अमेरिकेने ऐन वेळी कच खाल्ल्यामुळे त्यांनी सगळी सूत्रं आपल्या हाती घ्यायचं ठरवलं होतं. बैठकीत त्यांनी आत्तापर्यंत जमा केलेल्या प्रत्येक पुराव्याची सविस्तर माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली आणि इस्राएलने स्वसंरक्षणार्थ सीरियाच्या हद्दीत जाऊन हा प्रकल्प बेचिराख करावा अशी योजना मांडली. इराकमध्ये केलेल्या कृतीची ही पुनरावृत्ती ठरणार असली, तरी या वेळी वातावरण थोडं वेगळं होतं.
बुश यांनी इस्राएलला सतत आपल्या कार्यालयाच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले. मोसाद आणि पंतप्रधान ओल्मर्ट यांनी सीरियाच्या अनेक लहानमोठ्या अधिकाऱ्यांकडून उपयुक्त माहिती काढून घ्यायचा सपाटा लावला. जमिनीवरचे हेर कमी, म्हणून की काय पण त्यांनी आकाशातले टेहळणी उपग्रहाची हेरगिरीच्या कामावर रुजू केले. रोजच्या रोज असंख्य छायाचित्रं, अणुप्रकल्पाच्या भागातल्या प्रत्येक छोट्यामोठ्या हालचालींची माहिती आणि जोडीला महत्वाच्या अधिकाऱ्यांवर पळत ठेवून मिळणारी अधिकची माहिती मोसादच्या कार्यालयात जमा व्हायला लागली. इस्राएलने याच्या आधारे अमेरिकेलाही आपले टेहळणी उपग्रह सीरियाकडे वळवायला लावले.
०४.०२ - साक्षात्कार