....
मराठी भाषा दिनानिमित्त या मायबोलीचा आजपर्यंत चा प्रवास कसा झाला हे पाहूया.
माणसाला रूप,रस, गंध, स्पर्श या प्रमाणेच अजून एक महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे वाणी
या वाणीचा उपयोग करून एकमेकांशी त्यांनी संवाद साधला, देवाणघेवाण केली. त्यातून हळूहळू भाषेची निर्मिती झाली. भाषेमुळे मेंदूची जास्त प्रगति झाली असे म्हणतात.
सुरूवातीला वैदिक काळात प्राकृत, वैदिक संस्कृत नंतर क्लासिकल संस्कृत या भाषा वापरात होत्या. इंडो युरोपिअन वा इंडो जर्मन या भाषेतून सगळ्या भाषांची सुरूवात झाली असे म्हणतात. आज आपण ऋग्वेदापासून सगळे ग्रंथ देवनागरी मधे पाहू शकतो पण ते या रूपात पोचेपर्यंत बरेच बदल झाले आहेत.
प्रत्येक लिखाणाला दोन महत्त्वाच्या बाजू असतात एक भाषा व दुसरी लिपि किंवा स्क्रिप्ट. वेदिक काळात फक्त भाषा होती. लेखी काही नव्हते. मौखिक परंपरेतून सगळे पुढच्या पिढ्यापर्यंत ते पोचले. अगदी सुरुवातीची जे शिलालेख सापडतात, अशोक काळातले, ते बरेचसे ब्राम्ही स्क्रिप्ट व संस्कृत भाषेतले आहेत. आपल्याच लोकांनी ब्राम्हीत लिहिलेले कोरलेले लेख आपण काही वर्षांनी वाचू शकत नव्हतो कारण ती स्क्रिप्ट विसरली गेली होती. ब्रिटिशांनी ब्राम्ही डिकोड केल्यावर इतिहासातील बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या. ब्राम्ही बरोबर थोड्या प्रमाणात खरोष्टी व शारदा याही स्क्रिप्टस वापरल्या गेल्या. प्राकृत भाषेतून पुढे शौरसेनी मागधी व महाराष्ट्री प्राकृत उदयाला आल्या. ब्राम्ही मधेही बरेच बदल झाले . मौर्य कालीन, गुप्त कालीन व त्यानंतर असे साधारण तीन टप्पे सांगतां येतात जेव्हा भाषा व लिपि यात फरक झालेले दिसून येतात. ब्राम्ही तील अक्षरे पाहिली तर त्यात गोलाकार कमी दिसतात त्यामुळे शिलालेख लिहीताना सोपे जात असावे. यानंतरच्या टप्प्यात आली देवनागरी लिपि आणि रिजनल भाषांचा उगम झाला.
जपानमधे बुद्धीझम चा बराच प्रसार झाला आपली खूप मॅन्युस्क्रिप्टस तिथे जपून ठेवलेली आहेत आणि गंमत म्हणजे जपानची एक स्क्रिप्ट बरीचशी ब्राम्ही सारखी आहे.
या प्रत्येक वळणावर जाताना बरीच वर्षे मधे जात होती. भारतात अनेक भाषात देवनागरी स्क्रिप्ट वापरतात. ५०० BCE पासून साधारणपणे ७५०-८०० इ स पर्यंत प्राकृत जास्त वापरात होती. गाथा सप्तशतीतील एक उदाहरण खाली दिले आहे. काहीही अंदाज येत नाही काय लिहिले आहे ते.
सातवाहनांची ती राजभाषा होती. पश्चिम भारतात ती जास्त वापरली गेली. कर्पुरमंजिरी व गाथासप्तशति हे त्यातले प्रसिद्ध ग्रंथ. मराठी ही महाराष्ट्री प्राकृतातून आलेली भाषा आहे.
१२०० च्या शतकात ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदिपिका हा ज्ञानेश्वरांनी लिहिलेला मराठी ग्रंथ आजपर्यंत वाचला जातो.
नदीच्या प्रवाहात जसे इतर प्रवाह येउन मिळतात आणि पात्र विस्तारत जाते तसे या भाषातही इतर शब्द घेतले गेले. प्राकृत मधून मराठ,मागधी, शौरसेनी व इतर अनेक प्रवाह तयार झाले. परकीय आक्रमणांचाही बराच परिणाम भाषेवर झालेला दिसून येतो. मराठीत अनेक अरबी,पर्शिअन व पोर्तुगीज शब्द आलेले दिसतात. तसेच कानडी,गुजराती असे शेजारी राज्यातून मिसळलेले शब्द ही दिसतात.
मोडी स्क्रिप्ट ही देवनागरी बरोबर वापरली जात होती. पुढे छपाई ला ती सोईची नसल्याने ती मागे पडली.
कर्सिव्ह रायटिंग सारखी त्यात अक्षरे जोडून लिहीत.
बखरी साठी जास्त करून मोडी लिपि वापरली जाई. दिसायची छान पण वाचायला थोडी अवघड. हे देवनागरीत आहे.
मराठी च्या अनेक डायलेक्ट्स/ बोलीभाषा आहेत. पु लं नी तुम्हाला पुणेकर व्हायचंय की नागपूरकर यात वऱ्हाडी व पुणेकर भाषेची मजा दाखवली होती. आजकाल टी व्ही वर पण प्रमाण भाषांतील सिरियल च्या जोडीने बोलीभाषांना प्राधान्य दिले जाते आणि बरेच वेळा ते कानाला गोड लागते. संतांनी लिहिलेल्या भक्ति रचना, अभंग, श्लोक,ओव्या, या सगळ्यातून भाषा कशीकशी बदलत गेली ते लक्षात येते.
१०० वर्षांपूर्वी राम गणेश गडकरी यांची नाटकातील भाषा, सावरकर टिळक यांची इंग्रजांना सुनावणारी कडक भाषा, रानडे, आगरकर यांची विचारी भाषा फुले,बाबासाहेबांची भाषा ऐतिहासिक कादंबऱ्यातीलभारदस्त भाषा पु लं नी हसवण्यासाठी वापरलेले भाषा व दुर्गाबाईंची तेजस्वी भाषा हे सगळे मराठी भाषेचे प्रकार वाचत आपण मोठे झालो व आजच्या मराठी पर्यंत येउन पोहोचतो.
काॅम्प्युटरवर देवनागरी यायला तसा वेळच लागला. आता सगळीकडे मराठी की बोर्डस दिसतात पण काही वर्षांपूर्वी शिवाजी, नूतन व इतर काही फाॅण्ट्स होते ज्यात मजकूर लिहून त्याचे फोटो (जेपीजी) टाकावयास लागत. म्हणजे एखादी दुरूस्ती करायची तर मूळ प्रतित बदल करायचा परत त्याची जेपीजी करून वापरायचे असा प्रकार होता. आपल्या मंडळांच्या अगदी सुरूवातीला आपणही ही पद्धत वापरत होतो. आता काम बरेच सोपे झाले आहे.
दर १२ कोसांवर बोली भाषा बदलते म्हणतात. अनेक शब्दांचीच भर पडते व काही शब्द मागे पडतात. वऱ्हाडी, मालवणी, कोकणी कोल्हापूरी, नागपुरी अशा अनेक फ्लेव्हर्स नी समृद्ध होत आपली मायबोली पुढे चालली आहे.
यापुढच्या ५० वर्षात सोशल मिडिआची भाषा ही बोलली भाषा होउ नये म्हणजे मिळवले. Wsap? K. Lol Gtg btw हे आता नेहेमी वापरले जाते. इमोजी चा वापर पण फार वाढला आहे.
पूर्वी जशी इजिप्त किंवा मायन लोकांमधे चित्रे वापरत तशी मराठी यू टर्न करून मागे जाउ नये म्हणजे झाले.
खालच्या इमोजींना आपण मायबोलीपासून लांब ठेवूया......
माहितीपूर्ण लेख. पण शेवटी काय
माहितीपूर्ण लेख. पण शेवटी काय म्हणायचेय ते समजले नाही. माझा आबुदोष
इमोजीचा वापर नको हे सांगायचेय का ?
रानभुली
रानभुली
ईमोजी फक्त सोशल मिडिया वरच रहाव्यात
ते मराठी लेखनात खूप वापरले जाउ नयेत
तुमचे म्हणणे समजले. पण इतकी
तुमचे म्हणणे समजले. पण इतकी चांगली माहिती आणि सुरूवात असलेल्या विषयाचा शेवट अशा मुद्द्यावर का व्हावा ? मायबोलीची वाटचाल म्हणजे मराठीची असेल तर ती कशीकशी विकसित झाली हे वाचायला मिळेल असं वाटलं. मायबोली संकेतस्थळाची असेल तर ते ही वाचायला आवडले असते.
छान माहिती..!!
छान माहिती..!!
चांगली माहिती.
चांगली माहिती.
बंगाली / बांग्ला भाषेची लिपी देवनागरी नसावी. ती अक्षरं वाचता येतात , देवनागरीसारखी आहेत. पण देवनागरी नाही.
मराठीतला पहिला ग्रंथ - लीळाचरित्र ना?
हो... लीळाचरित्र.
हो... लीळाचरित्र. या ग्रंथातून घेतलेला "गूळहारियाचा दृष्टांत" हा १२ वी मराठी मधे धडा होता. लीळाचरित्र ज्ञानेश्वरांच्या आधी चक्रधर स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे.
मराठीतील आद्यग्रंथ
मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजांनी लिहिलेला विवेकसिंधु आहे. तो ज्ञानेश्वरीच्या 100 वर्षे आधी लिहीला गेलाय.
तो ग्रंथ त्यांनी नागपूर जिल्ह्य़ातील आंभोरा या पाच नदींचे संगम असलेल्या ठिकाणी लिहिलेला.
@श्रद्धा , https://vishwakosh
@श्रद्धा , https://vishwakosh.marathi.gov.in/30238/
मुकुंदराज : (चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध). विवेकसिंधूचा कर्ता मुकुंदराज हा मराठी वाड्.मयाच्या इतिहासातील एक वादविषय आहे (विश्वकोषातून )
डीजे - लीळाचरित्र - म्हाईंभट. त्यात चक्रधरांच्या आयुष्यातील घटनांची नोंद आहे.
भरत. धन्स फोर करेक्टिंग मी.
भरत. धन्स फोर करेक्टिंग मी.
फार छान माहिती.
फार छान माहिती.
विवेकसिंधु ह्या ग्रंथाची भाषा
विवेकसिंधु ह्या ग्रंथाची भाषा ज्ञानेश्वरीपेक्षा जुनी वाटते आणि म्हणून कळायला कठीण वाटते.
धन्यवाद तुमचे मुद्दे बरोबर
धन्यवाद तुमचे मुद्दे बरोबर आहेत.
जानेश्वरी हा जुना व आजपर्यंत वापरात असलेला मराठी ग्रंथ
बंगाली ची स्क्रिप्ट थोडी वेगळी आहे. भारतात इतर अनेक भाषात देवनागरी स्क्रिप्ट वापरतात.
देवनागरी प्रामुख्याने हिंदी
देवनागरी प्रामुख्याने हिंदी आणि मराठीसाठी वापरली जाते. बाकी कोंकणी, सिंधी असे काही छोटे भाषक गट ही लिपी वापरतात.
हीरा, मी पाहिलेलं सिंधी फारसी
हीरा, मी पाहिलेलं सिंधी फारसी सारख्या लिपीत होतं. उजवीकडून डावीकडे.
बंगाली भाषेची जी लिपी आहे
बंगाली भाषेची जी लिपी आहे तिला आसामी बंगाली लिपी म्हणून ओळखत होते. पण आबुगेदा असं तिचं नाव आहे हे गुगलने सांगितले.