कोची

अरबी समुद्राची राणी

Submitted by पराग१२२६३ on 28 April, 2022 - 23:32

कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्वाची शहरे असून अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोची-एर्नाकुलमच्या आसपास अनेक विशेष आर्थिक क्षेत्र स्थित आहेत. त्याचबरोबर कोची हे दक्षिण भारतातील एक मोठे नैसर्गिक बंदर असून नौदलासाठी आणि व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी इथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धिकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या संस्थाही इथे आहेत.

Subscribe to RSS - कोची