बँकींग

सही करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे आलेल्या अडचणीवर काही उपाय आहे का????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 24 January, 2017 - 05:23

मी फार गुंतागुंतीची सही करतो.जेव्हा लीगल डॉक्यूमेंटला सही लागायला लागली तेव्हा मी सही करायला शिकलो.माझी सही कॉपी करायला येऊ नये म्हणून मी मुद्दाम कॉम्लीकेटेड सही करायला लागलो.
पण मला आता माझ्या सही करण्याच्या पद्धतीत थोडा फरक पडलेला जाणवतोय,बारावित असताना उघडलेली बँक अकांउंटस ,तिथे सॅंम्पल म्हणून असलेली सही व आताची सही यात फरक पडला आहे.मध्यंतरी तंबाखूच्या अतिसेवनाने माझ्या हाताला बधिरता व कंप आल्याने मी जुनी सही सेम टु सेम करु शकत नाही,पर्यायाने बँकेतून पैसे काढताना बर्याचदा मला अडवले जाते.
यावर काही उपाय आहे का? सहीत मायनर चेंज झालेले चालते का?

विषय: 

तडका - सरकारी तिजोरी

Submitted by vishal maske on 10 January, 2017 - 08:46

सरकारी तिजोरी

नोटाबंदी केल्यामुळे
कॅश टंचाई आली आहे
व्यवहार कॅशलेस करताना
जनता त्रस्त झाली आहे

विरोधकांकडून वारंवार
जबर कानपिळी आहे
सरकारची तिजोरी मात्र
माला-माल झाली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नोटांचे अच्छे दिन

Submitted by vishal maske on 30 December, 2016 - 09:58

नोटांचे अच्छे दिन

रांगाच्या रांगा लाऊन पैसे
बँकेत जमा केले आहेत
जमा केलेले कित्तेक पैसे
बँकेमध्येच गुंतले आहेत

कित्तेकांनी तर दावा केला
हि नोटाबंदी फसली आहे
पण अच्छे दिनच्या प्रतिक्षेत
जनता अजुनही बसली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कॅशलेस इंडिया : इ- वॉलेटः युडिओ अ‍ॅप व कार्ड

Submitted by चंपक on 29 December, 2016 - 11:32

नमस्कार मित्रों !

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर, देशात चलनाचा तुटवडा भासु लागला. रोखीने व्यवहार करणार्‍या सर्वच नागरिकांना हा धक्का होता !

परंतु, शिक्षण व नोकरीसाठी परदेशात सात वर्षे राहणार्‍या मला हा अजिबात धक्का नव्हता! कारण त्या सात वर्षात मी युरोप व ऑस्ट्रेलियात कधीही एका वेळी ३० युरो किंवा डॉलर पेक्षा जास्त रक्कम ए.टी.एम. मधुन काढली नव्हती. कारण तेथील बहुतांश व्यवहार कॅशलेस / कार्ड पेमेंट नेच होत असत.

हीच पद्धत भारतात आणण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या योजनेला अनुसरुन एक नवा व्यवसाय सुरु करित आहे!

तडका - नोटाबंदीची फिप्टी

Submitted by vishal maske on 29 December, 2016 - 10:48

नोटाबंदीची फिफ्टी

एका पाठोपाठ एक असे
आळीपाळीने बोलु लागले
नोटाबंदीच्या निर्णयाला
आता रोजच घोळू लागले

आर्थिक व्यवहारांना म्हणे
अजुनही ना सेफ्टी आहे
विरोधकांच्या रडारवरती
नोटाबंदीची फिफ्टी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

NDTV चा कोट्यावधीचा घोटाळा; एक दडपलेली बातमी

Submitted by मिलिंद जाधव on 25 December, 2016 - 12:15

गेली २५ वर्षे मिडीयावर सतत स्वच्छ , मॉरल कंडक्ट, बिझीनेस एथिक्सचा राग आलापणार्या प्रणय रॉय यांचे उद्योग !!

एन्डीटीव्हीच्या मालक श्री प्रणय रॉय व त्यांच्या पत्नी राधिका रॉय ह्यांना आयकर विभागाने ५३.८४ कोटी रु च्या हेराफेरी बद्द्ल पकडल आहे. ही रक्कम ह्या दोघांनी कंपनीच्या एकॉउंट मधुन स्वतःच्या बँक खात्यात टाकलेली होती. ऐनफोर्समेंट डायरेक्टोरेट व दिल्ली पोलिसांची ईकॉनॉमिक ऑफेंस विंग ह्या केस वर काम करत आहे. ह्या दोघांची RRPR Holdings (Radhika Roy Prannoy Roy) नावाची अजुन एक शेल कंपनी सुद्धा आहे. ह्या
कंपनीतील मालकी हक्क (प्रत्येकी ५०% ) ह्या दोघांकडेच आहे.

शब्दखुणा: 

२०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मागच्या सात-आठ वर्षात पुण्यातल्या किंवा एकूणच घरांच्या वाढलेल्या किमतींबद्दल आपण खूप ऐकले/वाचले . अर्थात मी स्वत: योग्य वेळी (म्हणजे किमती प्रचंड वाढलेल्या असताना) घर घेतल्यामुळे सुखी आहेच. परत नवे घर घेण्याचा माझा अजिबात प्लॅन / तयारी /ऐपत नाही. "आता घरांचे दर निम्म्याने कमी होणार" ही गोष्ट मागची बरीच वर्षे ऐकत आलो. मी घर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशीच मला एकाने ही गोष्ट ऐकवली होती.

प्रकार: 

थोडीशी गैरसोय नक्की किती? आणि कोणाची? भाग 2

Submitted by सिम्बा on 21 December, 2016 - 23:25

थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.

,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.

नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

तडका - कायद्याचा खुटा

Submitted by vishal maske on 15 December, 2016 - 07:23

कायद्याचा खुटा

वेग-वेगळ्या ठिकाणी
रोज धाडी पडू लागल्या
रोकड जप्तीच्या घटना
दिवसें-दिवस वाढू लागल्या

काळा पैसा पांढरा करण्या
कित्तेकांचा आटा-पिटा आहे
पण गैरव्यवहार टाळण्यासाठी
कायद्याचा आडवा खुटा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - बँकींग