बँकींग

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बोनस

Submitted by vishal maske on 5 November, 2015 - 08:55

बोनस

जेवढा घेण्यामध्ये असतो
त्याहून जास्त देण्यात असतो
वाटला गेलेला आनंद हा तर
आपुलकीच्या मनात असतो

दिला गेलेला बोनस जरी
मुल्यांकनात भेटला जातो
त्याने भेटलेला आनंद मात्र
किंमत बाह्य थाटला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

तडका - पैसा

Submitted by vishal maske on 18 October, 2015 - 21:20

पैसा

पैशासाठी जगतात लोक
पैशासाठी मरतात लोक
पैशांसाठी तर कधी-कधी
माणसांनाही मारतात लोक

पैसे मिळवण्या माणसांमध्ये
नको ती हिंमत आली आहे
माणसं झालेत कवडीमोल
पैशाला किंमत आली आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ऑनलाइन

Submitted by vishal maske on 6 October, 2015 - 23:16

ऑनलाइन

हल्ली वेग-वेगळ्या गोष्टींसाठी
ऑनलाइन महत्व वाढत आहे
कित्तेक कामांचा क्रियाकलाप
ऑनलाइन वरती नडत आहे

हव्या हव्या त्या गोष्टींसाठी
ऑनलाइन आधार घेतला जातो
तर कधी ऑनलाइन मधूनच
कुणाला गंडाही घातला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डेली रूटींग

Submitted by vishal maske on 27 September, 2015 - 21:09

डेली रूटींग

त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात

कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

प्रधानमंत्री मुद्रा योजना.. बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मार्तंड on 5 September, 2015 - 07:45

मोदी सरकारने नुकतीच घोषणा केलेल्या "प्रधानमंत्री मुद्रा योजना" बद्दल माहिती हवी आहे?
ते कर्ज कुठल्या स्वरूपात मिळणार? त्यासाठी कुठल्या बाबींची आवश्यकता आहे? त्याचे नियम काय आहेत? त्याचा फायदा कसा घेता येईल?

विषय: 

तडका - छुप्या संपत्ती

Submitted by vishal maske on 12 July, 2015 - 10:22

छुप्या संपत्ती

कमावण्याला बंधन नाही
हेतु शुध्द असायला हवा
कमावलेला एक-एक पै
नीतीबध्द दिसायला हवा

ज्यांनाही याचे भान आहेत
त्यांच्या श्रीमंतीला मान आहे
नसता छुप्या संपत्ती या तर
काळ्या बाजारची घाण आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चोरी

Submitted by vishal maske on 9 July, 2015 - 11:46

चोरी

वेग-वेगळी चोरी करण्यासाठीही
वेग-वेगळी असते शक्कल नवी
पण काहीही चोरता आलं तरीही
काय चोरावं याची अक्कल हवी

नाम बदणाम करणार्‍या चोर्‍यांनी
माणूस स्वत:च्या नजरेत हरला जातो
मात्र चांगुलपणा कितीही चोरला तरी
चांगुलपणानं चांगुलपणा वाढला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भानगड खर्चाची

Submitted by vishal maske on 18 June, 2015 - 10:45

भानगड खर्चाची

ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो

मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - बँकींग