होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी मराठी अ‍ॅवॉर्डस मध्ये आशुने टिप्पणी केलीय की सुभेदार श्री यान्ची पत्नी जान्हवी या अनादीकालापासुन पोटुश्या आहेत.:हाहा: यावर कैवल्य म्हणतो काहीही ह आशु!:फिदी:

Evde tomne marle pahijet tya award show la ki te aikun tari yanna serial sampvaychi subuddhi hoil anyway char dhage aale ....ajun५६७ yenya aadhi jaani chi delivary zali mhanje milavle

हो झी अवार्ड प्रोमोमध्ये दाखवतायेत आणि उद्या चला हवा येऊद्या मध्ये पण बाळाने जानुबैला लिहिलेलं पत्रवाचन आहे.

आजकाल तर खुद्द शिरेलीत पण "काहीही हां श्री" वर जोक्स करु लागलेत.

यावर कैवल्य म्हणतो काहीही ह आशु! >>>> काहीही हां आशु नाही रश्मी, काहीही हां प्रधान अस म्हणतो कैवल्य

काल त्या चला हवा येवु द्या मधे सगळ्या सासवा स्कर्ट घालुन आलेल्या. मागच्या वेळी अ‍ॅवार्ड फन्क्शनला पैठण्या होत्या सगळ्यांच्या यावेळी अगदी वेस्टर्नवेअर चांगलीच प्रगती आहे. तशी प्रगती त्या जानूची दाखवली असती तर एव्हाना बाळ शाळेत जायला लागलं असत.

आज हवा येउ द्या मध्ये जानु बोलली की बाळ २०१६ - २०१७ कधी पण येउ शकते. अरे नक्की काय दाखवायचा प्रयत्न करत आहेत हे?

सुभेदार श्री यान्ची पत्नी जान्हवी या अनादीकालापासुन पोटुश्या आहेत. >>>
स्वार्थी सहजीवन >>> Lol

या वरच्या टॉप कोट्स चे कलेक्शन करायला हवे. आधीच्या बाफ वर बेफिंचे ते रखडलेला प्रकल्प ही जबरी होते.

त्या भावी बाळाचे पत्र ही होते, 'चला हवा...' मधे.. >> हो त्याचा ट्रेलर पाहिला आहे (भाऊ कदम ने सादर केलेला ना?). एपिसोड पाहायचा आहे अजून.

अग बायानो, अरे बाबानो, आता जान्हवीचे रखडलेल बाळन्तपण फार्र म्हणजे फार्र महत्वाचे ठरलय. चक्क सकाळच्या ब्रिटीश नन्दीने आजच्या ढिन टान्ग मध्ये प्रसिद्धी दिलीय याला.:फिदी:

जान्हवीच्या सोनोग्राफीचे टेन्शन

सहन न झाल्याने अखेर

केला अवघ्या देहाचा रिमोट

आणि बदलत राहिलो करवट...

जान्हवी! जान्हवी!!

कधी होणारेस तू बाळंत?

कधी होणारेस?

मन्दार देवस्थळी म्हणे आम्ही लवकरच येवू गोड बातमीसह (पेढा की बर्फी) Wink
काल जानूला विचारले की मिठाईचा बॉक्स पाठवला आहे पेढा की बर्फी लवकर कळवा तर ती म्हणे आमच्या दिग्दर्शकांना विचारा Lol Lol

किती ते टर उडवत होते सगळे त्या मालिकेची तरी कळु नये यांना आता तर हसायचाही कंटाळा येतो

हो ना उघड उघड तोंडावर टर उडवत होते, जानीच बाळंतपण, बाबांच्या गुडघ्याच ऑपरेशन, पिंट्याच लग्न..

बाकी जानीच्या सासवांना स्कर्ट अज्जिबात शोभत नाहीत.. काल बाकी कोणाचा नाही पण सुप्रिया पाठारेने घातलेला शॉर्ट स्कर्ट दिसला, मुळीच शोभत नाही.. जीन्स घालत्या असत्या तरी बर्‍या दिसल्या असत्या.. बाकीच्यांच्या स्कर्टांची लांबी कळली नाही..

बाळ २०१६ - २०१७ कधी पण येउ शकता>> हे फारच भितीदायक वाक्य होते.

बाकी हवा वाल्यांनी काल लैच हवा काढली. मज्जा आली. Happy

Pages