Submitted by सिंथेटिक जिनियस on 24 January, 2017 - 05:23
मी फार गुंतागुंतीची सही करतो.जेव्हा लीगल डॉक्यूमेंटला सही लागायला लागली तेव्हा मी सही करायला शिकलो.माझी सही कॉपी करायला येऊ नये म्हणून मी मुद्दाम कॉम्लीकेटेड सही करायला लागलो.
पण मला आता माझ्या सही करण्याच्या पद्धतीत थोडा फरक पडलेला जाणवतोय,बारावित असताना उघडलेली बँक अकांउंटस ,तिथे सॅंम्पल म्हणून असलेली सही व आताची सही यात फरक पडला आहे.मध्यंतरी तंबाखूच्या अतिसेवनाने माझ्या हाताला बधिरता व कंप आल्याने मी जुनी सही सेम टु सेम करु शकत नाही,पर्यायाने बँकेतून पैसे काढताना बर्याचदा मला अडवले जाते.
यावर काही उपाय आहे का? सहीत मायनर चेंज झालेले चालते का?
तुमच्या सहीत असे बदल झाले आहेत का?
सहीतल्या सुक्ष्म बदलामुळे मला अडवले जातेय यावर काय उपाय आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येस...मलाही हा प्रॉब्लेम येतो
येस...मलाही हा प्रॉब्लेम येतो. १०-१५ वर्षांपूर्वीची सही व आताची सही यात खूपच फरक पडलेला आहे .. माहिती नाही...... मनाच्या जडण घडणी नुसार सहीही बदलते की काय ते!
मग ते ओळख पत्र / पॅन दाखवा, त्यांच्या समोर जाऊन पुन्हा सही करा इ इ करावे लागते.
माझे तर २-३ वेळा झालेय असे
माझे तर २-३ वेळा झालेय असे पण बँकवाल्यांना माझ्यावर भलताच विश्वास दिसतोय. तरीही आता एक अॅफिडेव्हिट करुन सही कायमची बदलुन घ्या. व ती सोप्या पद्धती ची करा.
हितं विचारण्यापेक्षा ब्यांकेत
हितं विचारण्यापेक्षा ब्यांकेत जाऊन का नाही इचारत?
मूळात, व्यक्तिची सही
मूळात, व्यक्तिची सही/स्वाक्षरी सर्ववेळ, सदासर्वकाळ "जशीच्च्या तश्शीच्च" येते ही एक सुशिक्षित अंधश्रद्धा नव्हे काय?
बँकेत जाऊन सही बदली करुन घ्या
बँकेत जाऊन सही बदली करुन घ्या... तसे बर्याचदा करावे लागते आणि त्यात काही अडचण येणार नाही...
कैच्च्याकैच ह तुमचं.
कैच्च्याकैच ह तुमचं. ब्यान्केत काय जायला सांगताय.....

आधीच मोदींच्या नोटाबंदीमुळे कित्ती तो त्रास झालाय, ब्यान्केचे हेलपाटे झालेत दर आठवड्यात चोविस हजार काढताना,
त्यात पुन्हा सही करता जायचे?
किती तो त्रास द्यायचा सर्वसामान्य जनांना ?
सामान्य जनता हलाखीत जगते आहे...
त्यांच्या संतापाचा उद्रेक केव्हाही भडकून दंगल होऊ शकते....
अन तुम्ही ब्यान्केत जायला सांगुन त्यात तेल ओतताय....
बापरे .. मला पहिल्यांदा वाटले
बापरे .. मला पहिल्यांदा वाटले की सरकारने सही करायचाही नवीन नियम काढला की काय..
बाकी मला टेंशन नाही.
माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे जॉईंट अकाऊण्ट आहे.
पैसे भरायचे काम मी करतो आणि काढायचे काम ती करते.
आणि ती ईंग्लिश मिडीयमची असल्याने तिला उत्तम सही जमते.
बँकेत जाऊन सही कॅन्सल करा आणि
बँकेत जाऊन सही कॅन्सल करा आणि सरळ अंगठा नोंदवून या.
सही जुळत नाही, परत बदला वगैरे नसती कटकट रहाणार नाही पुढे म्हातारवयात पण.
नाव माझे सिंथेटिक जिनियस...
नाव माझे सिंथेटिक जिनियस....मी जर अंगठा बहाद्दर झालो तर इज्जतीचा पंचनामाच व्हायचा की
असो,सल्ले दिलेल्यांचे आभार ,एखादे ॲफिडेव्हीट करुन सोपी सही अमलात आणतो.
१. जॉईंट अकाउंट करा
१. जॉईंट अकाउंट करा कोणाबरोबर तरी आणि बॅकेतून पैसे काढण्याचे काम त्यांच्या कडे आउट सोर्स करा.
२. एटीएम मधून दर रोज जितके अलाउड असतील तितके पैसे काढत जा आणि कॅश घरात किंवा इतर कुठे सुरक्षित ठिकाणी ठेवत जा. जास्ती कॅश लागेल तेंव्हा बॅन्केतून काढण्या एवजी ती कॅश वापरा.
३. फक्त कॅश काढताना अडचण येते का ? तुम्ही चेक ने पेमेंट करता तेंव्हा तुमचे चेक्स कसे काय क्लिअर होतात ?
चेक एकदा दोनदाच दिलेत ,पण
चेक एकदा दोनदाच दिलेत ,पण झाले क्लियर ,कसे ते माहीत नाही.सध्या घर बांधतोय त्यासाठी बरीच रक्कम एकरकमी काढायची होती पण सही मॅच झाली नाही म्हणे .ATM मधे सध्या पैसे नाहीत ,असले तर रांगा लागत आहेत.साराच घोळ झाला आहे.
माझी सही प्रत्येकदा वेगळी
माझी सही प्रत्येकदा वेगळी येते, त्यामुळे कधी समस्या आली नाही. वर लिहिल्याप्रमाणे सर्वकाळ, सर्वांची सही सेम टू येते ही अंधश्रद्धा म्हणावी...
ऋ दादा इंग्लिश मिडीयम चा आणि
ऋ दादा इंग्लिश मिडीयम चा आणि सहीचा काय संबंध?
जर बॅंकेत अधिकारी ऑब्जेक्शन
जर बॅंकेत अधिकारी ऑब्जेक्शन घेत असतील तर त्यांच्या सहीत जास्तच फरक पडला असेल ना!
यात अंधश्रद्धा काय आहे?
टग्या, दक्षिण मुंबइतली पोरं
टग्या, दक्षिण मुंबइतली पोरं इंग्लिश मिडियमच्या पोरींचा ऑटोग्राफ घेत असतात. त्यामुळे मुलींना सवय असते.
ऋ दादा इंग्लिश मिडीयम चा आणि
ऋ दादा इंग्लिश मिडीयम चा आणि सहीचा काय संबंध?
>>>>
चांगला प्रश्न!
मराठी मिडियमची मुले सुद्धा आपली सही ईंग्लिशमध्ये करतात. ते सुद्धा सही म्हटले की शक्यतो जाँईंट हॅण्डरायटींग मध्ये करावी लागते. मराठी मिडियमच्या मुलांना एक्सेण्टवाली ईंग्लिश स्पिकींग आणि जॉईण्टवाली ईंग्लिश हॅण्डरायटीग तितकीशी जमत नाही. ईंग्लिश पोराण्ना ती जमते.
ये लॉजिक कूच हजम नही हुआ भाय.
ये लॉजिक कूच हजम नही हुआ भाय.
लेकिन भाय आपुन तो तेरा फ्यान है ना इस्के वास्ते आगे कूच नई बोलेगा
टग्या हे तर आपले प्रेम आहे.
टग्या हे तर आपले प्रेम आहे.
पण प्रत्यक्षातही मी बोलतोय ते लॉजिक लागू होते. आपण जर ईंग्लिश वा सेमीईंग्लिशचे असाल तर आमची परीस्थिती आणि मनस्थिती अचूक हेरू शकणार नाहीत. जेव्हा दहावीतून अकरावीत प्रवेश करतो तेव्हा अचानक सभोवतालचे सारे जग ईंग्लिश स्पिकींग बनते. सारी पाठ्यपुस्तके अचानक ईंग्लिशमधूनच आहेत याचा साक्षात्कार होतो. पेपरात सुद्धा ईंग्लिशच लिहावे लागते. एवढे वर्ष आपण शाळेत आपल्या वेगवान लिखाणासाठी गौरवले गेलो असतो पण काही ईंग्लिश माध्यमाची मुले जॉईंट हॅण्डरायटींगचा वापर करत आपल्यापेक्षा काही पटींनी फास्ट लिहित आहेत ही पराभवाची भावना छळते. मग त्या सहीच्या एका छोट्या तुकड्याचाही आपण दुस्वास करू लागतो. ती कधीच मनापासून केली जात नाही.
मुळात निसर्गाने आपल्याला स्वाक्षरीसाठी अंगठा बहाल केला आहे. प्रत्येकाची स्वाक्षरी वेगळी असावी यासाठी त्यातील रेषा बदलल्या आहेत. तरीही माणसाने आपल्या हट्टीपणाने हे सहीचे फॅड काढले आहे.
कर्सिव्ह रायटींगला जॉईंट
कर्सिव्ह रायटींगला जॉईंट हँडराईटींग हे ह्युमरस नाव दिल्याबद्दल ऋ हे कौतुक!
बादवे मी पण मराठी माध्यम पण इश्वर्कृपेने जॉईंट हँडराईटींग जमते.
रुन्मेषभौ शी सह्मत...
रुन्मेषभौ शी सह्मत... स्वकशेरी पेक्सा पायचा आंगठा बेत्तर
सही जर देवनागरीत केली असती तर
सही जर देवनागरीत केली असती तर ही अडचण आली नसती........

सही "विंग्रजीच्या आहारी" जाऊन रोमन मधे केली की मग अस्सेच घोळ होतात असे बाबामहाराजांचे सांगणे आहे. !
तेव्हा सही रोमनमधुन बदलुन देवनागरीत करू लागा........