अवती भोवती कोणीच नाही
अवती भोवती कोणीच नाही, अभाव आपल्या माणसांचा ,
अनोळखी इथले चंद्र तारे, अज्ञात गंध वार्याचा,
रणरणत्या ऊन्हामध्ये सावली पुढे मागे धावत असते,
हताश माझ्या मनाला, तुझ्या आठवणींचीच साथ मिळते
जमतात आभाळात काळे ढग, पाऊस काही डोकावत नाही,
त्रासलेल्या इथल्या मातीचा सुगंध कही दरवळत नाही
हे भकास जीवन सोडून, वाटते तुझ्याकडे परत यावे,
तुझ्या माझ्या श्वासातले अंतर आता कमी करावे
तेव्हाच नव्या उमेदीने नवीन आभाळ शोधू शकेन
तुझा हात हातात घेऊन ऊंच झेप घेऊ शकेन...