जशी सांज ....

Submitted by स्वाकु on 18 October, 2013 - 03:08

जशी सांज दु :खापरी श्वेत होती
तशी भावनांच्या वेदनेत होती

सखे भावनांचा तुला ठाव नाही
तरी का मनाचे वेध घेत होती

तुझी साथ नाही तरी आस होती
तुझी आस ती आसरा देत होती

कधी तू मनाला हाक देत होती
कधी आसवांना दूर नेत होती

कधी संथ झाले जरी श्वास माझे
पुन्हा भेटण्याची वेळ येत होती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सल्ला:
पहिल्यांदा कविता काय असते ते समजून घ्या. थोड्याफार उत्तम कविता वाचा. मग कविता लिहा.
कविता जमली आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले की गझल येईलच.

धन्यवाद समीर. मी मुक्तछंदात कविता लिहील्या आहेत. पण अजुनही शिकतो आहे. क्रुपया अभिप्राय देत रहा. मी नक्की चांगल लिहीण्याचा मनापासून प्रयत्न करीन...