रम्य संध्याकाळ
Submitted by स्वाकु on 18 October, 2013 - 07:43
तांबड्या घटांनीच व्यापले होते
ते सौंदर्य नभाचे खुलले होते
तो अथांग सागर, सुरेख किनारा
ते लोभस रूप मनी उतरले होते
स्वच्छंदी सागर मनमौजी लाटा
आज मनाचे रंग बदलले होते
मी ही त्या क्षणी जरी बुडून गेलो
चांदणे शशीचे तरंगले होते
जशी विरघळत होती संध्याछाया
तसे माझे 'मी' पण हरवले होते