धरी ती अबोला...

Submitted by स्वाकु on 28 October, 2013 - 04:25

धरी ती अबोला मला राहवेना,
जसे गूढ आभाळ ते पाहवेना ||

मिटूनी तिचे ओठ ती का रुसावी?
गुन्हा काय झाला मला ही कळेना ||

पहाटे विझूनी दिवा रात गेली,
कसे हासवावे मला ही जमेना ||

जरी लोचनी राग होता तरी ही,
तिचा तो दुरावा मला मानवेना ||

धरी कान माझे जरी चूक नाही,
तशी ती खुलावी मला सांगवेना ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users