जशी दूर गेली.....
Submitted by स्वाकु on 28 October, 2013 - 04:17
तुला वाहिली मी फुले आज काही,
झुलू देत नाही हवा ती जराही ||
जशी दूर गेली सखे आज तू ही,
तशी या जिवाची न पर्वा मलाही ||
तिचे श्वास होते खरे प्राण माझे,
तिच्यावाचुनी झोंबतो गारवाही ||
कसा शोध घेऊ, कुणा साद घालू,
न येई तिची हाक आता तिलाही ||
मनी शेवटाची न इच्छा मलाही,
जरी ती कथा पूर्ण झालीच नही ||