नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षी गणपतीच्या वेळी सजावट करत असताना माझा मोठा भाऊ नेहमीच आपली कलाकारी दाखवतो. दरवर्षी नवीन मखर तो स्वतः बनवतो. मला त्याला मदत करण्याची खूप इच्छा असते. पण तो मला फार काही करू देत नाही. त्यामुळे यावर्षी मी ठरविले की आपणही बाप्पासाठी काहीतरी नवीन करायचे. पण काय?? या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळेन. खूप विचार केल्यावर एक आयडीया सुचली.
गेल्यावर्षी बहिणीच्या घरी गेले असता तेथे macrame वापरुन विविध शोपिस बनवायला शिकले होते. त्याचाच वापर करून बाप्पासाठी कंठी बनवायचे ठरविले. त्याचे फोटो पुढे टाकत आहे.
शाळेत जाण्याआधीपासूनच हातात पेन्सिल घेऊन पाटीवर, भिंतींवर रेघोट्या ओढणे, वर्तुळे, चित्रे काढण्यापासून ते हस्तलिखाणाची एक विशिष्ट ढब आत्मसात करण्यापर्यंतचा प्रवास आपणा सर्वांनीच केलेला असतो. त्यात काहींचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर असते तर काहींचे अगदीच गोंधळात टाकणारे. डॉक्टरांच्या हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन्स तर सामान्यांना कळणे अवघडच. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा हस्ताक्षर हा अविभाज्य भाग. पण गेल्या दहा-बारा वर्षांत तंत्रज्ञानात इतके झपाट्याने बदल झालेत की, आता नोकरी, व्यवसाय करताना हाताने लिहिण्याचे काम अतिशय मोजक्या ठिकाणी आहे.
मेहनत करणे... खडतर परिश्रमांनंतर यश मिळणे, हे चांगलंच ! परंतु श्रमाला, यशाला, कलेला, त्याहूनही कलाकाराला ओळख मिळणे ही फार मोठी गोष्ट..
एका शिल्पकाराची गोष्ट
-----------------------------------------------------------------
हल्ली छंद, कलांशी संबंधित स्तिमित व्हायला लावणारे व्हिडीओज पहायला मिळतात. नंतर मात्र ते सापडत नाहीत. असे आपल्याला पहायला मिळालेले व्हिडीओज सर्वांसाठी शेअर करण्यासाठी हा धागा. प्रकाशचित्रं, मोबाईलने घेतलेले व्हिडीओज, प्रचि हे सुद्धा चालतील. स्वतःचे असतील तर मग धावेल.
इथे एक नमुना म्हणून एक व्हिडीओ शेअर करतोय
https://www.facebook.com/sandeshnewspaper/videos/10153691626765380/
असा केक पूर्वी पाहिला नव्हता. जबरदस्त कलाकारी !
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो
..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन
)
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
यावेळी जरा दिवाळीची मोठ्ठी सुट्टी घेऊन घरी आली .. सकाळ संध्याकाळ तर ओके पण दुपार सरता सरत नाही म्ह्णुन हा कामी लावलेला वेळ ..
हॅन्ड्क्राफ्ट साठी गुगलींग केल आणि मग जवळ असलेल्या साहीत्यात थोडी आगाऊची भर घालुन आलेला रिझल्ट तुमच्यासमोर ठेवते आहे .
-> हे ब्रेसलेट - सॅटिन रिबीन वापरुन बनवलेले
![DSC02255.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31605/DSC02255.JPG)
यातली जी वीण आहे ती नेट ची कॄपा .. वापरात नसलेल्या ओढणीचा वापर करुन तयार केलेल हे लाल रंगाच ब्रेसलेट.
तो गोल स्टॅण्ड खरे तर फास्टट्रक वॉच चा डब्बा आहे त्याला मी डोलीच्या धाग्याने गुंडाळले .
एकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना
![IMG_20140807_154250.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20140807_154250.jpg)
घरी बरेच लोकरीचे तुकडे उरले होते. ते वापरुन केलेलं हे भरतकाम ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![2014-05-14-259.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u111/2014-05-14-259.jpg)