अटकेपार झेन्डा लावणे,पानिपत होणे किन्वा विश्वास गेला पानिपतात असे वाक्प्रचार ज्या काळामुळे रूढ झाले तो काल म्हणजे पेशवेकाळ! या काळाने आपल्याला बरच काही दिल. दिल्लीचे तख्त काबीज करण्याची इच्छाशक्ती,पानिपताची वाताहात ते अगदी पैठणीचा रेशमी थाट्,मोत्याच्या दागिन्यान्चा साज अन आपले लाडके अष्ट्विनायक. म्हणूनच की काय हा पेशवेकाल मराठी माणसाच्या नसान्त , मनात आणि रक्तात भिनलाय. हाच पेशवेकाल चित्रपटातून दाखविण्याच शिवधनुष्य मॄणाल कुलकर्णी यान्नी पेललय! तेही सामर्थ्यापणे!
पुण्यात राहून पर्वतीला गेला नाही असा पुणेकर सापडणे अवघडच. सिमेंट क्राँकिटच्या वाढल्या जंगलामुळे पर्वती टेकडी लांबून दिसणे जरा अवघडच बनली. पूर्वी लांबून सहजरित्या दिसणारी पर्वती बांधकामांमुळे दिसेनाशी होत आहे. संध्याकाळी व्यायामासाठी येणारे असंख्य पुणेकर व पर्यटकांमुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पर्वती गजबजलेली असते. टेकड्यांवरील अवैध बांधकामांचा मध्यंतरी प्रश्न उभा राहिला होता. या टेकडीला सुद्धा हा प्रश्न सतावू लागला आहे. अशा या पर्वती टेकडीवर केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत.