रमा माधवः एक ऐतिहासिक प्रेमकथा

Submitted by धानी१ on 13 August, 2014 - 09:05

अटकेपार झेन्डा लावणे,पानिपत होणे किन्वा विश्वास गेला पानिपतात असे वाक्प्रचार ज्या काळामुळे रूढ झाले तो काल म्हणजे पेशवेकाळ! या काळाने आपल्याला बरच काही दिल. दिल्लीचे तख्त काबीज करण्याची इच्छाशक्ती,पानिपताची वाताहात ते अगदी पैठणीचा रेशमी थाट्,मोत्याच्या दागिन्यान्चा साज अन आपले लाडके अष्ट्विनायक. म्हणूनच की काय हा पेशवेकाल मराठी माणसाच्या नसान्त , मनात आणि रक्तात भिनलाय. हाच पेशवेकाल चित्रपटातून दाखविण्याच शिवधनुष्य मॄणाल कुलकर्णी यान्नी पेललय! तेही सामर्थ्यापणे!

खरतर रमा-माधव ही प्रेमकथा आहे त्यागाची,समर्पणाची. हीर- रान्झा, रोमियो-ज्युलीएट एवढीच अजरामर. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तिला इतिहासाच, वास्तवाच कोन्दण आहे हे दिग्दर्शिका विसरत नाही. हे विशेष.

छोटी निरगस रमा ते पेशवीण बाई रमा हा प्रवास सुन्दर रन्गवलाय.अडनीड्या वयातील सन्कोच्, थट्टा मस्करी ते निस्सिम प्रेम हे नात्यतले पदर कलाकरनी अलगद उलगडल्या सारखे वाटतात. सत्ताधीनता,घराणेशाहीचा मराठी साम्राज्याला असलेला शाप, पानिपताची सल त्यानन्तर्चा मराठ्याच पुनः चाढता आलेख, माधव रावन्ची कारकीर्द या गोष्टी प्रभाव पाडतात.

रमा-माधव यान्च्या वैयाक्तिक आयुष्यातील प्रेमलाप आणि प्रणय प्रसन्ग चितारताना दिग्दर्शिकेने मर्यादेचे भान बाळगले आहे.

रमा-माधव खेरीज करारी पेशवीण बाई - गोपिकाबाई,पतीचे शव पाहिल्याखेरीज सौभाग्य लेणे न उतरवणार्या पार्वतीव्बाई, पतीच्या रन्गेल्पणामुळे खचलेली मात्र तरीही पेशवीण बाई होण्याची महत्त्वाकान्क्षा असणरी आनन्दीबाई या व्यक्तीरेखाना यथोचीत न्याय मिळाला आहे. राघोबादादान्च्या स्वभावाच्या अनेक छटान्मधे प्रसाद ओक ने योग्य रन्ग भरलेले आहेत. नानासहेब पेशव्यानी सैन्याचे वर्‍हाड केले ही बाब ध्यानात घेता त्यान्च्या मृत्यु ननतर त्यान्ची दुसरी विधवा बायको दाखविण्याचे भान पटकथेत आहे.

कला,भाषा,अभिनय या सर्वच बाबतीत चित्रपट सरस ठरतो. मात्र काही वेळा पेशव्यान्चे वैभव्, युद्धभूमीवरील रान्गडेपणा आणि मराठी मातीचे सॄष्टी सौन्दर्य टिपण्यास कॅमेरा(मन) कमी पडला अस जाणवत रहात. गणरायाची आरतीही तितकी भारावून टाकत नाही.

आणि शेवटी......
आजच्या आधुनिक जगात नवर्‍याशी हवा तेव्हा सम्पर्क करता येत असूनही उशीरा आला म्हणून खट्टू होणार्या मला तरी चित्रपटने आत्मपरिक्षण करायला भाग पाडल. खरच प्रेम हे शब्दान्च्या पलिकडे एक तरल्,पवित्र, ह्रुदयन्गम नात आहे हे मनोमन पटत. ही पवित्र भावना,पणवलेले डोळे आणि गलबललेल मन घेउन मी चित्रपट्गृहातून बाहेर पडले.

एवढ मात्र वाटत रहिल की, मराठी चित्रपटाला १०० कोटीन्च बजेट असत तर रमा माधव सुद्धा मुघले आझम किन्वा जोधा अक्बर होउ शकला असता. य विचाराने जीव अगदी चुटपुटला.

त.टी: इतक्या सुन्दर भान्वना घेउन मी बाहेर पडले तर खरे पण पुण्यच्या रिक्शावल्यानी नेह्मीचा मग्रूरपणा दखवून मूड चा बेरन्ग केला. कसा ते न विचारलेलेच बरे. सूज्ञास सान्गणे न लगे.
या कडे दुर्लक्ष करत,

मी मात्र अजून सन्गतेय स्वतःला कि प्रेम शाश्वत आहे. " प्रेम हेच खरे, इतुकेच खरे"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतीम चित्रपट आहे. जरूर पहावा. मराठी साम्राज्याची पताका एक शतकाहून अधिक काळ देशभर फडकत ठेवणार्‍या पेशव्यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा हा एक छोटासा भाग निर्माता-दिग्दर्शक-कलाकारांनी सुंदर सादर केला आहे.

खूप सुंदर... चित्रपट सुंदर असेलच पण ही ओळखही खूप छान जमली आहे. अगदी मनापासून लिहिलं आहेस धानी...
चित्रपट नक्कीच बघणार.

श्रुती मराठे आणि सोनाली कुलकर्णी यांचे diction (संवादफेक) कसे आहे? ह्या दोघी जणी बोलायला लागल्या की बये इतकी छान गोड दिसतेस जरा नीट बोल की! असं वाटत रहातं. मृणाल कुलकर्णी ने जर ते करून दाखवलं असेल तर तिचे खूप कौतुक आहे!

डीविनीता,गोगो प्रतिसादबद्दल धन्यवाद. जिज्ञासा सोनली आणि श्रुती ला काही प्रसन्ग आलेत वात्याल मात्र त्यातही त्या छाप पाडतात.
बस्के, जरूर पठवा आणि त्यान्ची reaction ही जरूर कळवा

धानी१, चांगलं लिहिलंय.
**********
उच्च निर्मितीमूल्यं, उत्तम सेट्स-वेशभूषा-संगीत, चांगली कथा-पटकथा, समजायला सोपे तरी त्या काळाशी सुसंगत वाटणारे संवाद आणि सुरेख अभिनय ह्यामुळे पेशवाईचा काळ पडद्यावर जिवंत करण्यात 'रमा माधव' अत्यंत यशस्वी झाला आहे. मृणाल कुलकर्णीचं मनःपूर्वक अभिनंदन Happy

पेशवाईच्या पटाचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी बाजूला सारुन फक्त रमा-माधवावर फोकस करणे मात्र शक्य झालेले नाही.
रमा-माधवातल्या प्रसंगांपेक्षा कदाचित जास्तच फुटेज इतर घडामोडींना आहे.
पण रमा-माधवामधील प्रसंग अतिशय गोड लिहिले आहेत Happy मुख्य म्हणजे रमा-माधवाला अपत्य झालं नव्हतं, माधवराव बराच काळ आजारी होते ह्यामुळे नक्की दोघांमधलं नातं तितकंसं उत्कट असेल की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडू नये असे काही प्रसंग गुंफून ,चित्रपटाच्या चौकटीत ही प्रेमकहाणी 'बिलिव्हेबल' करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे जाणवते.

लहानगी रमा श्रुती कार्लेकर, तरुण रमा पर्ण पेठे आणि माधवराव-आलोक राजवाडे ह्या तिघांचंही काम चोख झालेलं आहे. खूप सुंदर अभिनय केलाय ह्या तिघांनी. बाकी सगळ्यांनीही उत्तम अभिनय केला आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या पात्रापासून सगळे आपापल्या जागी परफेक्ट ! पण रमा-माधवापेक्षाही थोडा जास्तच लक्षात राहतो तो राघोबादादा-प्रसाद ओक ! रमा-माधवाइतकेच महत्त्व राघोबादादाला मिळाले आहे म्हणूनही असेल कदाचित.

मात्र चित्रपट संपल्यावर रमा-माधवाची प्रेमकहाणी ह्यापेक्षा परिस्थितीपुढे हतबल झालेले दोन दुर्दैवी जीव असे वाटून मन खिन्न झाले. पण पर्वती,शनिवारवाडा, पेठा आणि इतर वास्तुंमुळे आजही खूप रिलेट करता येणारा तो काळाचा तुकडा थिएटरबाहेर पडल्यावरही मनात, दृष्टीसमोर रेंगाळत राहिला हे निश्चित.

* पेशव्यांची वंशावळ आणि त्या काळातील महत्त्वाच्या घटना ह्याबद्दल जुजबी वाचून गेल्यास बरे. तसे न केल्यास चित्रपट बघताना कदाचित थोडा गोंधळ उडू शकेल.

थोरल्या बाजीरावानंतर सार्‍या महाराष्ट्राने एकमुखाने नाव घेतले ते थोरल्या माधवरावांचेच. आता माधवराव याना आपले म्हटले म्हणजे रमा हे नावही आपल्या घरचे झाले हा निसर्गन्यायच म्हणावा लागेल. अशावेळी मग अन्य कुणाच्याही नव्हे तर रमाच्या संसारावर आपली आपुलकीची प्रेमाची नजर जातेच...मुळातच अल्पजीवी संसार, त्यातच नवरा सतत राज्याच्या कारभारात व्यस्त....त्यात कायम मागे लागलेला आजार...कधीही न थांबलेला कुटुंबकलह...ज्येष्ठ कारभारी आज आहे तर उद्या नाही आपल्याबरोबरीने.. .. अशा स्थितीत त्या मुलीने संसार केला आणि तिची सोशीक वृत्तीही स्पष्ट झाल्याने माधवरावापेक्षाही रमाचे चित्र आपल्या मनी जास्त वसले आहे.

"रमामाधव" ह्या नामाला काव्यकिरण लाभले असल्याने याच्याशी निगडीत प्रत्येक कलाकृती वाचकाला असो वा प्रेक्षकाला असो..चटदिशी आपली वाटते...म्हणजे सादरीकरणात त्रुटी असल्या तरी त्यानाही पोटात घेतले जाते आणि कथाकार व दिग्दर्शकाचे उलट आभारच मानले जातात.

मृणाल कुलकर्णी यानी सादर केलेल्या या चित्रपटाला आणखीन एक कंगोरा म्हणजे खुद्द मृणाल यानी सार्‍या महाराष्ट्राला "रमा" दिली....आजही हे नाव घेता क्षणी सर्वप्रथम मागील पिढीतील माझ्यासारख्यांना मृणाल कुलकर्णीच समोर येतात....त्यानीच हा चित्रपट तयार केला म्हणजे त्यातील प्रत्येक चित्राची चौकट प्रेक्षकाला कशी वाटेल याचा अभ्यास त्यानी नक्कीच केला असणार.

धानी यानी छान लिहिले आहे.....चित्रपट पाहिलेला नाही...पण लेख वाचल्यानंतर तो पाहिला पाहिजे असे मात्र वाटत आहे.

..

मी बघितला, अप्रतीम झालाय. पुर्ण पेशव्यांचा काळ डोळ्यापुढे ऊभा राहतो.

माझ्या बारावर्षाच्या मुलाला ही आवडला, थोडे जास्त दिवस माधवराव पेशव्यांना मिळाले असते तर इतिहास बदलला असता ना! Happy असा अभिप्राय होता त्याचा. अर्थातच मी थोडी इतिहासाची पुर्व कल्पना दिली होती
मराठी माणसाने जरुर बघावा हा चित्रपट Happy

अप्रतिम पिक्चर आहे. आवर्जून मोठ्या पडद्यावर बघायला हवा. मला तर पुन्हा बघायला आवडेलं..
सर्वांचा अभिनय आवडला. आलोक - पर्ण दोघांचे विशेष कौतुक.
पिरीयड फिल्मचे दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य मृणाल कुलकर्णी यांनी समर्थपणे पेलले आहे.

मस्त आहे. खूप आवडला.

१२ वर्षांची लेक बरोबर होती. मी म्हणाले "Worth watch" ती म्हणाली "Must watch"

अवांतर - तिला अलोक राजवाडे फारच आवडला. मराठी हीरो एवढा आवडण्याची तिची पहिलीच वेळ Wink

छान लिहलंय.खर तर बघायचा होता. पण एका आठवड्यातच सिनेमाला थियेटर च्या बाहेर पडाव लागल ( सिंघम रिटर्न मुळे) .आज हवा येऊ द्या मध्ये त्यातले कलाकार बघितले सिनेमाविषयी चर्चा ऐकली/पाहिली आणि सिनेमा बघता आला नाही याची फारच चुटपूट लागून गेली :(.

काल त्यांची एक छान व दीर्घ मुलाखत घेतली. रमा माधवसहितच मराठी चित्रपटासंदर्भातील अनेक विषयांबाबत त्यांनी महत्वाची मते प्रदर्शीत केली. त्या मुलाखतीतील एक छायाचित्र सहज म्हणून येथे देत आहे.

IMG_2545.JPG