पुणेकरांची आवडती ‘पर्वती’
Submitted by ferfatka on 13 February, 2014 - 04:34
पुण्यात राहून पर्वतीला गेला नाही असा पुणेकर सापडणे अवघडच. सिमेंट क्राँकिटच्या वाढल्या जंगलामुळे पर्वती टेकडी लांबून दिसणे जरा अवघडच बनली. पूर्वी लांबून सहजरित्या दिसणारी पर्वती बांधकामांमुळे दिसेनाशी होत आहे. संध्याकाळी व्यायामासाठी येणारे असंख्य पुणेकर व पर्यटकांमुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पर्वती गजबजलेली असते. टेकड्यांवरील अवैध बांधकामांचा मध्यंतरी प्रश्न उभा राहिला होता. या टेकडीला सुद्धा हा प्रश्न सतावू लागला आहे. अशा या पर्वती टेकडीवर केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत.